ICC U19 World Cup:भारतीय क्रिकेटच्या युवा ब्रिगेडने इतिहास रचला आहे. भारताने विक्रमी पाचव्यांदा ICC U19 विश्वचषक जिंकला आहे. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा ४ गडी राखून पराभव केला. संपूर्ण स्पर्धेतील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या भारतीय संघाने अंतिम सामन्यातही विजयाची घोडदौड कायम ठेवत, छोट्या धावसंख्येच्या सामन्यात इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव केला. या शानदार विजयासह भारतीय कर्णधार यश धुलचे नाव विराट कोहलीसारख्या दिग्गज कर्णधारांच्या क्लबमध्ये सामील झाले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 44.5 षटकांत सर्वबाद 189 धावांत आटोपला.
भारताने हे लक्ष्य 47.5 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले.
अंतिम सामन्यात उपकर्णधार शेख रशीदनेही ५० धावांची अर्धशतकी खेळी केली.
दुसरीकडे निशांत सिंधूही 50 धावांवर नाबाद राहिला.
दिनेश बानाने 5 चेंडूत नाबाद 13 धावा केल्या आणि षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
बाना ने धोनीसारखा षटकार मारला
ICC U19 World Cup सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर प्रथम गोलंदाजी करताना भारताने इंग्लंडला 44.5 षटकांत 189 धावांत रोखले.
यानंतर टीम इंडियाने 47.4 षटकांत 6 विकेट गमावून लक्ष्य गाठले.
या शानदार विजयासह भारतीय कर्णधार यश धुलचे नाव विराट कोहलीसारख्या दिग्गज कर्णधारांच्या क्लबमध्ये सामील झाले.
भारत पाचव्यांदा विश्वविजेता ठरला
U19 विश्वचषक स्पर्धेतील भारताची ही आठवी आणि सलग चौथी अंतिम फेरी होती ज्यात त्यांनी पाचव्यांदा विजेतेपद पटकावले.
भारत हा एकमेव संघ आहे ज्याने 8 U19 विश्वचषक फायनल खेळताना 5 विजेतेपदे जिंकली आहेत.
टीम इंडियाने यापूर्वी 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकला होता.
भारताने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 14 ICC अंडर-19 विश्वचषकांपैकी 8 वेळा अंतिम सामना खेळण्याचा विक्रम मजबूत केला आहे.
रघुवंशीने सर्वाधिक धावा केल्या
ICC U19 विश्वचषक 2022 मध्ये भारतासाठी सर्वात जास्त धावा करणारा अंगकृष्ण रघुवंशी होता, त्याने 5 सामन्यात 55.60 च्या सरासरीने 278 धावा केल्या. त्याच वेळी, विकी ओस्तवाल हा स्पर्धेतील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता, त्याने 6 सामन्यात 13.33 च्या सरासरीने 12 बळी घेतले. बावाने U19 विश्वचषक 2022 मध्ये युगांडा विरुद्ध नाबाद 162 धावा केल्याच शिवाय स्पर्धेतील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्याही नोंदवली.
दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट क्रिकेट खेळले आणि अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली पण, टीम इंडियाने सामना जिंकला. टीम इंडिया संपूर्ण अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये अजिंक्य राहिली आणि अंतिम सामना जिंकण्यापूर्वी दक्षिण आफ्रिका, आयर्लंड, युगांडा, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा पराभव केला.
Instagram कंपनी स्वतः म्हणतेय,Take a Break! जाणून घ्या कारण
बजेट 2022 सोप्या भाषेत:15 सर्वात मोठ्या गोष्टी माहित हव्या
पुष्पा बॉक्स ऑफिस कलेक्शन: चित्रपटाची हिंदी आवृत्ती 75 कोटीजवळ
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 06, 2022 14: 38 PM
WebTitle – ICC U19 World Cup: India won the World Cup for the 5th time