मुंबई:सोमवारी दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑफलाईन घेऊ नये या मागणीसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन केले होते.सोशल मीडियात सक्रिय असणाऱ्या विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ (Hindusthani Bhau Vikas Phatak) ने या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकावले असल्याचा आरोप करण्यात आला होता.या आंदोलनाप्रकरणी हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती.
विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ ला न्यायालयाने त्याला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ ला सोमवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप आहे. त्यानंतर न्यायालयात विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊची बाजू मांडणारे त्यांचे वकील महेश म्हणाले की, आम्ही न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. आमचा हेतू योग्य होता, आम्ही विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो होतो. दुर्दैवाने त्याचा गैरवापर झाला आणि त्याचे रूपांतर दंगलीत झाले. तपासात आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करू, असे वकिलाने सांगितले. मुंबईतील धारावी पोलिस ठाण्यात विकास जयराम पाठक आणि इकरा खान यांच्या नावे IPC कलम 353, 332, 427, 109, 114, 193, 145,146,149, 188, 269, 270 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थानी भाऊ चं खरं नाव काय?
हिंदुस्थानी भाऊ चं खरं नाव विकास जयराम फाटक असं आहे.
विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ चं शिक्षण किती झालं आहे?
हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक याचं शिक्षण सातवी पर्यंत झालं आहे.
इयत्ता सातवी मध्ये असताना त्यानं आपलं शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबाची जबाबदारी उचलली.असं लोकसत्ताने आपल्या बातमीत म्हटलंय.
खारचा रहिवासी विकास फाटक हा सोशल मीडियावर लोकप्रिय झाला जेव्हा
त्याचा गलिच्छ भाषेतील शब्दांसह कारमध्ये बसलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता.
लोकांना त्याची ही शैली खूप वेगळी आणि मजेदार वाटली.
आपल्या या शैलीमुळे त्याने अनेकवेळा वादांनाही निमंत्रण दिले आहे.
फाटक यापूर्वी ठाण्यातील एका स्थानिक वृत्तपत्रासाठी क्राइम रिपोर्टिंग करत होता.
हिंदुस्थानी भाऊचे यूट्यूब, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया अकाउंटवर तीन लाख फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे यूट्यूबवर अपमानास्पद मजकूर पोस्ट केल्यामुळे त्याचे खाते निलंबित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी, अपमानास्पद भाषा वापरणे आणि हिंसेला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्याचे Instagram खाते निलंबित करण्यात आले होते.
बिग बॉसमध्ये मिळाली होती संधी
विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ टीव्हीच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्येही दिसला आहे. 2019 मध्ये, त्याने स्पर्धक म्हणून शोच्या 13व्या सीझनमध्ये भाग घेतला होता. फाटक एकदा त्याच्या व्हिडिओ शूट करण्याच्या शैलीबद्दल म्हणाला की “मी ही संशैली यासाठी सुरु केली कारण मला इतरांसमोर तसे करताना अवघडून जाते.”
आपले आदर्श कोण असावेत याचा विचार विद्यार्थी पालक वर्गाने जरूर केला पाहिजे.
बजेट 2022 सोप्या भाषेत:15 सर्वात मोठ्या गोष्टी माहित हव्या
पुष्पा बॉक्स ऑफिस कलेक्शन: चित्रपटाची हिंदी आवृत्ती 75 कोटीजवळ
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 03, 2022 16: 05 PM
WebTitle – Hindustani Bhau seeks unconditional apology in court