आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया चे जनक,आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया चे पहिले डायरेक्टर जनरल सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांची आज २०८ वी जयंती, त्यांच्या जयंती दिनी त्यांना त्रिवार नमन !
त्यांच्या जयंती दिनी जाणून घेवूया त्यांच्या जीवनाविषयी काही महत्वपूर्ण गोष्टी.
सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांचा जन्म २३ जानेवारी १८१४ रोजी लंडन मध्ये झाला.लंडन मध्ये आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या वयाच्या १९ व्या वर्षी ते ब्रिटिश सैन्यात व १९३४ मध्ये भारतात बंगाल इंजिनियर्स मध्ये रुजू झाले.धम्म लिपी आज साऱ्या जगात ज्यांच्या मुळे जीवित राहिली व तुमच्या आमच्या पर्यंत ज्यांच्यामुळे पोहचली असे जेम्स प्रिंसेप यांची भेट सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांच्या सोबत झाली. तेव्हा जेम्स प्रिन्सेप धम्म लिपी व अनेक शिलालेखांचा शोध घेत होते आणि यातूनच सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांना भारतीय इतिहासाची आवड निर्माण झाली.
स्वतःचा पगार खर्च करत केले उत्खनन
ब्रिटिश सैन्यात काम करीत असताना वाराणसीतील सारनाथ येथे मातीत गाडलेल्या काही अवशेषांकडे त्यांचे लक्ष गेले,
इथे या मातीच्या ढिगाऱ्याखाली एखादी प्राचीन मोठी वास्तू असावी असा त्यांचा समज झाला,
त्या ढिगाऱ्याचे उत्खनन करण्यासाठी त्यांनी वरिष्ठांकडे परवानगी व निधी मागितला,वरिष्ठांनी परवानगी तर दिली पण निधी मात्र दिला नाही.
अतिशय जिज्ञासू व धेय्यवेडे सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांनी स्वतःचा पगार खर्च करत उत्खनन चालू केले व त्या उत्खननातून तब्बल १४५ फूट उंचीचा स्तूप जगासमोर आणला हा स्तूप बघून सर अलेक्सझांडर कन्नीन्घम नतमस्तक झाले. रॉयल एशियाटिक सोसायटी चे तत्कालीन सचिव जेम्स प्रिन्सेप यांनी त्यातील शिलालेखांचे लिप्यांतर करून हा धम्मेक स्तूप असून गौतम बुद्धांनी येथे पहीले प्रवचन दिले असा उल्लेख यात आहे असे सांगितले.
भारतातील प्रमुख बौद्ध स्थळांचा शोध आणि इतिहास उत्खननातून शोधून काढला
हुआन त्सांग या चिनी बौद्ध भिक्खूच्या प्रवास वर्णनातून सर अलेक्सझांडर यांनी अनेक बौद्ध स्थळे शोधण्याचा प्रयत्न केला.
सांची येथील स्तूप, त्याची चारही तोरणे, अनेक शिल्पाकृती, उत्खननातून बाहेर काढल्या.
काही अर्हत आणि सारीपुत्त व मोग्गलान यांच्या अस्थी शोधून काढल्या.
येथील सर्व स्तूप पुनर्जीवित केले. कुशीनारा येथील गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण स्थळ,
तेथील १५०० वर्षे जुनी गौतम बुद्धांची महापरिनिर्वाण मुद्रेतील मूर्ती,
यांच्यासह भारतातील प्रमुख बौद्ध स्थळांचा शोध आणि इतिहास उत्खननातून शोधून काढला.
१८४६ चे गव्हर्नर जनरल लॉर्ड कँनिंग यांना सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांनी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करत भारतात अर्कॉलॉजी सर्वे ऑफ इंडिया सुरू करण्याचा आग्रह धरला व १८६१ साली भारतात आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली. अर्कॉलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाचे पाहिले डायरेक्टर जनरल म्हणून सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीनंतर त्यांनी भारतात उत्खननास खूप चालना दिली व भारताचा दैदिप्यमान असा इतिहास जगासमोर येण्यास मदत झाली.
बोधगयेतील सम्राट अशोक यांनी बांधलेले वज्रासन व बुद्धांच्या पवित्र अस्थी १८८१ मध्ये उत्खनन करून सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांनी शोधून काढल्या.फ्रान्सिस बुकानन – हॅमिल्टन यांनी १८११ ते १८१२ मध्ये नालंदा येथे उत्खनन केलेले होते पण पुढे तब्बल २० वर्ष उत्खनन करून ही वास्तू आजवरचे सर्वात मोठे, प्राचीन, बौद्ध नालंदा विश्व विद्यापीठ आहे असे सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांनी शोधून काढले.
आजही आधुनिक शास्त्रज्ञांना मार्गदर्शक व पूरक
सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांनी पुढे अयोध्येत उत्खनन केल्यानंतर सद्यस्थितीत असणारे मंदिरे व मशिदी हे पूर्वीचे बुद्ध विहार असल्याचा दाखला दिला जे नंतरच्या काळात उत्खननांत सापडलेल्या कासौटी स्तंभ व त्यावरील शिल्पकला त्या गोष्टींना पुष्टी देते.
सर अलेक्सझांडर हे इतके दूर दृष्टीचे होती की त्यांनी जे आदर्श दिले आहेत ते आजही आर्किऑलॉजी सर्वे ऑफ इंडियाच्या आधुनिक शास्त्रज्ञांना मार्गदर्शक व पूरक आहेत.
अलेक्सझांडर कन्नीन्घम यांना स्केचेस काढण्याची आवड होती ते जेव्हा जेव्हा जिथेजिथे उत्खनन करत तेव्हा तेव्हा तिथल्या वास्तूंचे ते अगदी सूक्ष्म निरीक्षण करून हुबेहूब स्केच काढत असत त्यांचे तेव्हाचे स्केचेस आजही जगभरात अभ्यासले जातात. सर अलेक्सझांडर यांनी सम्राट अशोक यांचे शिलालेख व स्तंभलेख अगदी तंतोतंत उतरवून काढले आहेत.
ग्रंथसंपदा
सर अलेक्सझांडर यांनी अनेक पुस्तके लिहिली जी खालीलप्रमाणे आहेत.
लडाख: फिजिकल, स्टॅटिस्टिकल, हिस्टॉरिकल विथ नोटिसेस ऑफ द सराउंडिंग कंट्रीज (१८५४).
भिलसा टॉप्स, अ हिस्ट्री ऑफ बुद्धिझम (१८५४).द एनसेंट जिऑग्राफी ऑफ इंडिया ( १८७१)
आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया व्ह्याल्युम १ (१८७१).आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया व्ह्याल्युम २.
(१८७१).फोर रिपोर्ट मेड ड्यूरिंग द इयर्स १८६२/६३/६४/६५ (१८७१).आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया व्ह्याल्युम ३ (१८७३).
कॉर्पस इंस्क्रिप्शनम इंडिकॅरम व्ह्याल्युम १ (१८७७) (भारतीय इतिहास व भारतीय पुरातत्वाचे मानदंड समजले जाणारी पुस्तक मालिका)
द स्तूपा ऑफ भारहूत (१८७९).द बुक ऑफ इंडियन ईराज (१८८३).कॉइंस ऑफ एनसेंट इंडिया (१८९१).
महाबोधी (१८९२).कॉइंस ऑफ मेडीईव्ह्ल् इंडिया (१८९४).रिपोर्ट ऑफ टूर इन ईस्टर्न राजपुताना (१८८२).
पुढे १८८५ मध्ये सर अलेक्सझांडर कन्नीन्घम अर्कॉलॉजी सर्वे ऑफ इंडिया मधून
व २८ वर्ष ब्रिटिश सैन्यात काम केल्यानंतर मेजर जनरल म्हणून निवृत्त झाले.
बौध्दसंस्कृतिचा समृध्द वारसा ज्यांचे नाव स्मरण केल्या शिवाय पुढे सरकणार नाही
अश्या, थोर, ज्ञानी, दूरदृष्टी, पुरातत्वशास्त्रज्ञ, इतिहासकार,महान अश्या सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांना
त्यांच्या २०८ व्या जयंती दिनी त्रिवार नमन.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जेव्हा हिटलरने माफी मागितली
Thich nhat hanh:थिच न्यात हन्ह बौद्ध दृष्टिकोणास मूर्तरूप देणारे भिक्खू
तस्नीम मीर: Tasnim Mir अशी बनली जागतिक क्रमवारीत अव्वल
टेलीप्रॉम्प्टर म्हणजे काय? कसे काम करते? नरेंद्र मोदी यांचे भाषण चर्चेत
जय भीम पिक्चर आणखी एक विक्रम,ऑस्कर अकादमी कडून सन्मान
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 23, 2022 19: 35 PM
WebTitle – Sir Alexander Cunningham