उत्तराखंड : उत्तराखंडमधील एका सरकारी शाळेत जातीय भेदभावाचे प्रकरण समोर आले आहे, हे प्रकरण चंपावत (Champawat) येथील सूखीढांग सरकारी इंटर कॉलेजचे (Sukhidhang Government Inter College) आहे. जेथे तथाकथित उच्च जातीच्या (so-called upper caste) विद्यार्थ्यांनी अनुसूचित जातीच्या महिलेने (Dalit woman) तयार केलेले जेवण मिड डे मिल ( (Mid Day Meal ) खाण्यास नकार दिला. ( Caste discrimination) त्यानंतर या प्रकरणाने देश भरात आपल्या सामाजिक व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगत चर्चेला तोंड फोडले आहे,त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.मुलांच्या मनात त्यांचे तथाकथित उच्चजातीय पालक विष का भरतात? हा देशासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
काय आहे प्रकरण?
चंपावत जिल्ह्यातील सूखीढांग च्या या आंतर महाविद्यालयात शिकणाऱ्या ६० विद्यार्थ्यांपैकी ४० सामान्य श्रेणीतील आणि २० अनुसूचित जातीतील आहेत.काही दिवसांपूर्वीच शाळेतील भोजनमाता (अन्न शिजवणाऱ्या बाई) शकुंतला देवी सेवानिवृत्त झाल्या होत्या.त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीने अनुसूचित जातीच्या सुनीता देवी यांची नवीन भोजनमाता म्हणून नियुक्ती केली.दरम्यान, शनिवारी शाळेतील सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भोजनमाता सुनीतादेवी यांनी तयार केलेले माध्यान्ह भोजन खाण्यास नकार दिला.
मुलांच्या मनात जातीय विष भरण्याचे काम त्यांचे पालकच करतात
या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलीय.सुनीतादेवींच्या हातचे जेवण न खाणाऱ्या
तथाकथित उच्चजातीयांच्या मुलांचे म्हणणे आहे की,
(एससी ) अनुसूचित समाजघटकातील महिलेकडून जेवण बनवले जात असल्याने
त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी मध्यान्ह भोजन खाण्यास मनाई केली.
यासाठी काही मुलांना असे कारण सांगण्यात आले की आपण घरात पूजापाठ करत असल्याने त्यांना हे करता येत नाही.
इतर मुलांनीही हे पाहून हळूहळू जेवण खाणे बंद केले.
अशा रितीने 21 व्या शतकातील सुशिक्षित तथाकथित उच्चजातीय पालक आपल्या मुलांवर संस्कार करत आहेत.
‘जात’ नाही ती ‘जात’ असं का म्हणलं जातं?
आपण कधी कधी चर्चा करताना असं म्हणतो की “जात नाही ती जात” कितीही प्रयत्न केले तरी जात जाणार नाही.
हे उद्धरण अशावेळी पडताळून पाहणे गरजेचे असते.एकीकडे आपण जातींना आरक्षण आहे म्हणून ओरड करतो,
दुसरीकडे अशा जातीतील महिलेला नोकरी मिळाली तर आपण तीला सुखाने जगू देत नाही.
दुसरीकडे आपण म्हणतो जात नाही ती जात.हे बोलणं सोपं आहे.
पण प्रत्यक्षात जात व्यवस्था नष्ट करण्यासाठी आपण काहीही कृती करत नाही.
उलट अशा प्रकरणात हे आणखी ठळक होतं की
आपण उलट जात व्यवस्था बळकट करण्यासाठी खरेतर सतत धडपड करत असतो.मग कशी जाणार जात?
पूर्वजांनी केलेल्या पापांची शिक्षा आम्हाला का?
काही तथाकथित उच्चजातीय लोक थोडं अंतर्मुख होऊन विचार करतात,त्यांना असं वाटतं की आताच्या जगात जात व्यवस्था गौण मानली पाहिजे. आणि आरक्षण सुद्धा बंद झालं पाहिजे.आणि मग असं म्हणताना ते हेही मान्य करतात की जात व्यवस्था ही आमच्या पूर्वजांनी केलेली मोठीच घोडचूक होती.ते पूर्वजांचे पाप होते.इथपर्यंत सगळे मान्य करतात पण पुढे ते असेही म्हणतात की मग आज त्या वेळच्या पूर्वजांनी केलेल्या पापाची शिक्षा आम्हाला का दिली जातेय? खरतर हे नीटपणे समजून घ्यावं लागेल की आजवर इथं कधीच कुणी कुणाला कोणतीही शिक्षा दिलेली नाही. मात्र केवळ टिकात्मक बोलणे सुद्धा अनेकांना घोर शिक्षा वाटते.(आता ज्याना जातीयवादातून जे झेलावं लागतं त्याची तुलना केली तर आपलं टीका ऐकण्याचं दु:ख किती क्षुल्लक आहे हे लक्षात येईल.) परंतु या उदाहरणावरून आपल्या असं लक्षात येईल की पूर्वजांच्या पापाचा दाखला देणारे पिढी दर पिढी हीच चूक करत आले आहेत.परंतु ते खापर पूर्वजांवर फोडून नामानिराळे राहू इच्छितात.
मुलांच्या मनात जातीय विष भरण्याचे काम त्यांचे पालकच का करतात?
तथाकथित उच्चजातीय पालकांना आजही त्यांची जात इतर जातींच्या तुलनेत श्रेष्ठ वाटते.उच्च वाटते.
बरं हे श्रेष्ठ आणि उच्च नेमकं काय हे तपसण्याचे कोणतेही समाजमान्य किंवा सरकारी सुद्धा मापदंड उपलब्ध नाहीत.
केवळ गेली हजारो वर्षे तशी अंधश्रद्धा आपण बाळगत आलो.
आणि ती पिढी दर पिढी आपण हस्तांतरित करत अनेक पिढ्यांना हीच चुकीची शिकवण देऊन
समाजात जात व्यवस्था घट्ट करण्याचे काम केले.
हे करण्यामागे आपली जात इतरांच्या तुलनेत उच्च समजण्याची खुळचट रोगट मानसिकता कारणीभूत आहे.
21 व्या शतकात जग ग्लोबल होऊन अतिशय जवळ आलं आहे.जग मंगळवार पाण्याचा शोध घेत आहे.चीन सारखा देश कृत्रिम चंद्र बनविण्याच्या तयारीत आहेत.रोबोट निर्मिती जुनं तंत्रज्ञान झालं असून आता रोबोट मध्ये स्व-विचार स्वयंप्रेरणा निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.अशा डिजिटल युगात भारतातील जातग्रस्त रोगट मानसिकता असणारे तथाकथित उच्च जातीय पालक मात्र आपल्या मुलांच्या मनात जातीय भेदभावाचे विष भरण्याचे काम करताना दिसून येत आहेत.ही भारतासाठी खरोखर लाजिरवाणी गोष्ट आहे.
आज मनुस्मृती दहन दिन आहे.जात व्यवस्था लादणाऱ्या विषमतावादी धार्मिक नियमांना आजच्या दिवशी तिलांजली दिली गेलीय.मात्र आजही जातग्रस्त रोगट मानसिकता तथाकथित उच्चजातीय भारतीयांच्या मनातून गेलेली नाही,ती जाण्यासाठी स्वत:वर उपचार करण्यासाठी तथाकथित उच्चजातीय नागरिकांनी पाऊले उचलून राष्ट्रनिर्मितीत योगदान दिले पाहिजे.हीच खरी देशभक्ती ठरेल.
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 25, 2021 12: 120 PM
WebTitle – students refused to eat mid day meal made by dalit women in Uttarakhand