तामिळनाडूमधील कुन्नूर येथे हवाई दलाचे एक Mi-17 ( Helicopter ) हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या आपघतात भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि विमानातील १३ जणांचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलाने या अपघाताची चौकशी सुरू केली आहे.
पण हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की ज्या Mi-17 Helicopter हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस रावत होते, त्या हेलिकॉप्टरची खासियत काय आहे, तेच आपण आता जाणून घेणार आहोत.
Mi-17 V-5 मध्यम लिफ्टर विमान हे जगातील सर्वात प्रगत एअरलिफ्ट विमानांपैकी एक आहे. Mi सीरीजच्या हेलिकॉप्टर सोबत आधीही अनेक अपघात झाले आहेत. पण या हेलिकॉप्टरचा रेकॉर्ड जगातील इतर मालवाहू विमानांपेक्षा चांगला आहे.
रशियातील कझान येथील रशियन हेलिकॉप्टरशी संलग्न असलेल्या कझान हेलिकॉप्टरने या हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. या हेलिकॉप्टरचा उपयोग सैन्यदल, शस्त्रास्त्र वाहतूक, फायर सपोर्ट, कॉन्व्हॉय सपोर्ट, गस्त आणि शोध आणि बचाव यासाठी केला जातो. 2008 मध्ये संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाई दलासाठी 80 हेलिकॉप्टरची ऑर्डर दिली होती. त्यांची डिलिव्हरी 2011 पासून सुरू झाली आणि 2018 मध्ये अंतिम युनिट देण्यात आली.
इंजिन आणि मगिरी परफॉर्मस कसा आहे
Mi-17V-5 हेलिकॉप्टर Klimov TV3-117VM किंवा VK-2500 टर्बो शाफ्ट इंजिन लावण्यात आले आहे.
TV3-117VM जास्तीत जास्त 2100 हॉर्स पॉवर निर्माण करू शकते. याचा टॉप स्पीड 250 किमी/ता आणि रेंज 580 किमी आहे.
दोन फ्यूएल टॅंक देण्यात आल्या असून त्या लावल्यानंतर 1065 किमीपर्यंत वाढवता येते.
Mi-17 हेलिकॉप्टरची केबिन बरीच मोठी आहे, ज्यामध्ये प्रवाशांसाठी दरवाजे आणि मागील बाजूस सैन्य आणि मालवाहू वाहनांसाठी एक रॅम्प आहे.
Mi-17 Helicopter 13000 किलो वजनासह उडू शकते.
हे उष्णकटिबंधीय आणि महासागरीय हवामान, तसेच वाळवंट अशा विविध परिस्थितींमध्ये वापरले जाऊ शकते.
हे विमान नाईट व्हिजन, ऑन बोर्ड वेदर रडार, ऑटोपायलट सिस्टीमने सुसज्ज आहे.
केवळ वाहतूकच नाही, तर शस्त्रे आणि सैनिकांची वाहतूक करण्यासाठीही याचा वापर केला जातो.
यात Shturm-V क्षेपणास्त्रे, S-8 रॉकेट, 23 mm मशीन गन, PKT मशीन गन
AKM सब-मशीन गन देखील बसवता येतात. यात तोफखान्यासाठी मशीन गनची पोजीशन देखील देण्यात आली आहे.
IMDb वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय 10 चित्रपटांमध्ये जयभीम ला स्थान
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 10, 2021 19: 30 PM
WebTitle – Mi-17 Helicopter Crash The world’s most advanced helicopter, which crashed while carrying CDS General Bipin Rawat, has these features