उस्मानाबाद : सत्यभामा सौंदरमल / हेरंब कुलकर्णी – कोरोना काळात महाराष्ट्रात बालविवाह वाढले याबाबत आम्ही कार्यकर्ते ओरडून थकलो पण सरकारने पावले उचलली नाहीत व आज कोरोना काळात बाल विवाह झालेल्या मुलीचा बाळंतपणात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. बालविवाह विरोधी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल Satyabhama Saundarmal यांनी मला उस्मानाबाद जिल्ह्यात अशी घटना घडल्याची माहिती कळवली. उस्मानाबाद जिल्ह्यातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संपर्क करून ती दडपलेली घटना शोधण्याचा प्रयत्न केला,गावापर्यंत माहिती घेतली.अनेकांशी बोललो तेव्हा दुर्दैवाने ती घटना खरी आहे.माहिती अशी आहे.
बाळंतपणा दरम्यान मृत्यू
उस्मानाबाद जिल्ह्यातील अंदुर येथे शेतात राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील मुलगी तिचे वडील इतरांची गुरे राखण्याचे काम करतात. त्या मुलीचा मागील वर्षी बालविवाह लावण्यात आला. तिचे लग्न उस्मानाबाद तालुक्यातील उतमी कायापुर परिसरातल्या एका तरुणाशी लावण्यात आले. अल्पवयीन मुलगी असल्याने किमान तिच्यावर बाळांतपण लादू नये इतकाही विवेक त्या तरुणाला राहिला नाही व ती गरोदर राहून १४ ऑक्टोबरला तिला त्रास व्हायला लागला. सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले व तिचा बाळंतपणा दरम्यान मृत्यू झाला. बाळ मात्र सुखरूप आहे.बाल विवाहामुळे उपोषण बालमृत्यू व माता मृत्यूचे प्रमाण वाढते हे पुस्तकी वाक्य प्रत्यक्ष समोर बघताना अत्यंत वेदना होतात.. स्त्री सक्षमीकरण वगैरे शब्द फोल वाटायला लागतात.
लॉकडाऊन च्या काळात प्रशासनाने बालविवाह थांबवले नाहीत त्याचा हा समोर आलेला परिणाम अस्वस्थ करतो. कदाचित इतरही अनेक मुलींचे मृत्यू होत असतील तर ते पोहोचत नाहीत. बाल विवाहामध्ये मुलगी बाळंतपण सहन करू शकत नाही. तिच्या शरीरावर, मनावर अत्यंत विपरीत परिणाम होतात. अनेकदा बालमृत्यू, मातामृत्यू होतात. हे कटू सत्य या घटनेने अधोरेखित केले आहे.
बालविवाह हे मातामृत्यू आणि बालमृत्यूचे कारण ठरते आहे
अजूनही या घटनेबाबत गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही.अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले म्हणून थेट बलात्काराचा गुन्हा दाखल करायला हवा व त्या बिचाऱ्या मुलीच्या मृत्यू बद्दल सासरचे व माहेरचे यांना जबाबदार धरून आरोपी करायला हवे. दयामाया न दाखवता कठोरपणे कारवाई व्हायला हवी तरच या कायद्याचा वचक बसू शकेल.. उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व मीडिया व सामाजिक कार्यकर्त्या महिला कार्यकर्त्यांनी या प्रकरणात लक्ष घालायला हवे.तिचे बाळ आज उघड्यावर पडले आहे.
बलात्काराच्या घटनांची चवीने चर्चा करणाऱ्या समाजाने बाल विवाहामध्ये
सर्रास मुलींवर रोज होणाऱ्या बलात्कारांची दखल आता घ्यायला हवी.
बालविवाह हा अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्याचा परवाना ठरतो आहे
व मातामृत्यू आणि बालमृत्यूचे ते कारण ठरते आहे हे या घटनेने दाखवून दिले आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आता सर्वप्रथम पहिली भेट उस्मानाबाद जिल्ह्यातील या अभागी भगिनीला दिली पाहिजे.
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजाभवानीच्या शक्तीचा गौरव केला जातो त्याच जिल्ह्यातील अभागी भगिनी नवरात्र सुरू असतानाच मृत्युमुखी पडली आहे ही वेदना अस्वस्थ करते.
आरोपींवर पॉस्को अॅक्ट नुसार कारवाई करण्याची मागणी
बालविवाह विरोधी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी जागल्याभारत शी बोलताना सांगितलं की सदर प्रकरणात बालविवाह प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल झाला आहे परंतू 18 वर्षाखालील कोणतीही मुलगी असेल ल्गन लग्न झालेली किंवा बलात्कार झालेली अशा वेळी गुन्हेगारांवर पॉस्को अंतर्गत कारवाई करणे अपेक्षित आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याची कलमे लावल्याने पोलिसांनी आरोपींना केवळ चौकशी करून सोडून दिलेले आहे.घटना घडलेल्या गावची लोकसंख्या 25 हजाराच्या आसपास आहे.15 अंगणवाड्या दहा आशा हेल्थ वर्कर महिला स्वयंसेविका आहेत.गावात पोलिस पाटील देखिल आहेत.या सर्वांना चोरून हे लग्न होतं आणि नंतर मुलीचा मृत्यू होतो,मुलगी दगावते हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो मात्र सोशल मिडियामुळे हे प्रकरण उघडकीस येतं अशी माहिती सत्यभामा सौंदरमल यांनी यावेळी बोलताना दिली.
टी-20 पाकिस्तानच्या विजयानंतर पाक फॅन ‘सैराट’, हवेत गोळीबार, 12 लोक जखमी
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 25, 2021 22 :10 PM
WebTitle – Child marriage girl dies in childbirth: No case registered