महाड (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी अन् समाज भावना जपत अस्तित्व प्रतिष्ठान (रजि.) मुंबई’च्या माध्यमातून कोकणातील पुरग्रस्तांना स्टिलच्या टाक्या, बादल्या, प्लॅस्टिकचे डब्बे, ब्लँकेट, टॉवेल, चटई, गाऊन, सॅनिटरी पॅड, अन्न धान्य तसेच काही भांडी अन् बिस्किट अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कोकणात महाप्रलयकाळी पावसांने हाहाकार माजवून गंभिर पुरस्थिती निर्माण झाल्यांने तसेच दरड दुर्घटनेमुळे
जीवीतहानी होऊन सर्व जनजीवन विस्कळीत अन् अनेकांचे संसारच उध्वस्त झाले होते.
कोकणावर ओढवलेल्या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले.
कोकणातील पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
महाड क्रांतीभूमी चवदार तळे येथे कार्यरत असलेले पुरग्रस्त कर्मचारी ईश्वर महाडीक यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन, अस्तित्व प्रतिष्ठाननेही महाड, चिपळूण भागातील अनेक नागरिकांना मदतीचा हात देत समस्या जाणून घेऊन,शासनाच्या माध्यमातून ठोस मदत, मुलांच्या शिक्षणासाठी अन् पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देऊन, आरोग्य शिबीरासाठी प्रयत्नशील असल्याचेही सांगितले. महाड, चिपळूण मदतकार्यात डॉ. राजे, डॉ. संतोष मोहिते, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष गमरे, संघर्ष जाधव, अनिकेत पाटणे, दिपक सोनावणे अशा अनेक मान्यवरांनी सहकार्य केले.
महाड क्रांतीभूमी चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन केलेल्या मदतकार्यामध्ये अस्तित्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनय साळुंके, मिलिंद कांबळे चिंचवलकर, प्रमोद नाईक, दिलीप उन्हाळेकर, विनोद पवार, प्रदिप जाधव, दयानंद पोंभुर्लेकर, संदिप महाडिक, संतोष पोंभुर्लेकर, उदय गांगण, मंदेश साळुंके, इम्रान अन्सारी, गौरव साळुंके, रंजन साळिस्तेकर, साक्षांत साळुंके, सुनील साळिस्तेकर, शोभा कांबळे चिंचवलकर आदी कार्यकर्त्यांनी विषेश परिश्रम घेतले.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 10, 2021 13:20 PM
WebTitle – Distribution of essential items to the flood victims in Konkan through Astitva Pratishthan