मॅक्स महाराष्ट्र चॅनलचे युट्युब अकाउंट दुसऱ्यांदा हॅक झाल्याचे ऐकण्यात आले. काही महिन्यांच्या अवधीत दुसऱ्यांदा युट्युब चॅनल हॅक होणे ही चिंतेची बाब आहे. हे अकाउंट हाताळणाऱ्या लोकांच्या निष्काळजीपणामुळे हे घडण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वीच घडलेल्या घटनेवरून जर मॅक्स महाराष्ट्र टीम काही शिकायला तयार नसेल तर अवघड आहे. हॅकिंग हा उंदरा मांजराचा खेळ आहे. या खेळात हॅकर नेहमीच एक पाऊल पुढे असतात त्यामुळे वरील सगळी काळजी घेऊनही आपले अकाउंट सुरक्षित राहील याची १००% खात्री देता येत नाही. डिजिटल जीवनाचा हे वास्तव स्वीकारून आपण माहिती तंत्रज्ञानाचा वापर आयुष्यात केला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे.
आपण खालील ४ स्तरावर काळजी घ्यावी लागेल
आपले फेसबुक, जीमेल अकाउंट वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून हॅक केले जाऊ शकते. तुमच्या मोबाईल किंवा पीसी मध्ये तुमच्या नकळत स्पायवेअर इन्स्टॉल करून किंवा फिशिंग, सोशल इंजियरिंग द्वारे अकाउंट हॅक केले जाऊ शकते. त्यासाठी आपण आपल्या मोबाईल, पीसी आणि इमेल अकाउंटची काळजी घेतली पाहिजे. आपल्या सोशल मीडिया अकाउंट व्हेरिफिकेशन साठी वापरले जाणारे ईमेल अकाउंट, युट्युब चॅनलशी संबंधित जीमेल अकाउंटची सुरक्षित केले पाहिजेत. त्यासाठी आपण खालील ४ स्तरावर काळजी घ्यावी लागेल
आपले जीमेल, फेसबुक अकाउंट सुरक्षित करण्यासाठी खालील काळजी घ्या.
१. सोशल मीडिया आणि युट्युब चॅनल संबंधित फोन नंबर आणि जीमेल अकाउंट शक्यतो व्यक्तिगत किंवा व्यावसायिक कामासाठी वापरू नका. असे फोन नंबर आणि इमेल अकाउंट कोणासोबतही शेअर करू नका.
२. इमेल, मेसेंजर किंवा एसएमएस मध्ये आलेल्या बिनकामाच्या लिंकला क्लिक करू नका. असे मेल फक्त सब्जेक्ट वाचून डिलीट करा. ट्रॅश बॉक्स वेळोवेळी रिकामा करा.
३. थर्ड पार्टी एप किंवा वेबसाईट ऑथेंटीकेशनसाठी सोशल मीडिया, युट्यूब अकाउंट संबंधित इमेलचा वापर करू नका.
४. कोणत्याही फोन वरून फेसबुक किंवा इमेल अकाउंट व्हेरिफिकेशनच्या नावाखाली आलेला एसएमएस किंवा मेल मधे आलेला ओटीपी क्रमांक, पासवर्ड मागण्यात आल्यास अजिबात देऊ नका.
५. आपले पासवर्ड ब्राऊजर मधे जतन(सेव) करून ठेऊ नका.
६. सोशल मीडिया, ईमेल अकाउंट लॉगिन काम झाले की लॉगआउट करा.
७. इंटरनेट कुकीजच्या माध्यमातून हॅकिंग टाळण्यासाठी ब्राऊजर incognito/privacy मधे वापरा
पासवर्डसाठी खालील प्रमाणे काळजी घ्या.
१.सोशल मीडिया, इमेल आयडीचे पासवर्ड दर वेळोवेळी बदलावा.
२. पासवर्ड कमीतकमी १२ डिजिटचा असावा. त्यात स्पेशल सिम्बॉल
उदा. @, #, ^,* वगैरे चिन्हांचा, स्मॉल, कॅपिटल लेटर्सचा, नंबरच्या मिश्रणाचा वापर करावा.
३. पासवर्ड मध्ये स्वतःचे नाव, फोन नंबर किंवा अर्थपूर्ण शब्दांचा वावर टाळावा.
४.पासवर्ड मोबाईल किंवा कम्प्युटर मधे कुठेही सेव करून ठेऊ नये. तसेच डायरी वगैरेचा सुद्धा लिहून ठेऊ नका.
५.टू फॅक्टर ऑथेंटीकेशनचा वापर करा.
आपल्या मोबाईल आणि डेस्कटॉपची काळजी खालील प्रमाणे घ्या.
१. आपल्या मोबाईल, डेस्कटॉप मधे शक्यतो बिनकामाचे एप्स टाकू नका. फक्त कामा पुरतेच एप्स इन्स्टॉल करा.
२. फोनचे एप्स आणि ओपीरटिंग सिस्टम वेळोवेळी अपडेट करा.
३.आपला डेस्कटॉप विंडोज, मॅक किंवा लिनक्स वापरत असाल तर ऑपरेटिंग सिस्टम वेळीवेळी अपडेट करा.
४.चांगले अँटीव्हायरस आणि फायरवॉल वापरा.
५. ऑपरेटिंग सिस्टमला कठीण पासवर्ड असू द्या.
६. आपले पासवर्ड ब्राऊजर मधे जतन(सेव) करून ठेऊ नका.
७. सोशल मीडिया, ईमेल अकाउंट लॉगिन काम झाले की लॉगआउट करा.
८. इंटरनेट कुकीजच्या माध्यमातून हॅकिंग टाळण्यासाठी ब्राऊजर incognito/privacy मधे वापरा.
सायबर सिक्युरिटी ही डिजिटल युगातली खूप मोठी समस्या आहे. सामान्य माणूस हा याबाबत अनभिज्ञ आणि उदासीन असल्याने दिवसेंदिवस हे गुन्हे वाढत आहेत. डिजिटल युगात संपर्क, माहितीची देवाण घेवाण आणि आर्थिक व्यवहार वेगवान होतात ही एक जमेची बाजू असताना दुसरीकडे मात्र वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे आर्थिक गैरव्यव्हार, माहितीची चोरी, माहितीचा विध्वंस, ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढीस लागले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चारित्र्यहनन, जातीयवादाचे गुन्हे सुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे.
हॅकिंगचे नवेनवे प्रकार समोर येत आहेत. कोणत्याही एप्लिकेशन मध्ये असणाऱ्या कमतरता शोधून हॅकर आपले इप्सित साध्य करत असतात त्यामुळे आपण वापरत असलेले एप्लिकेशन आपले पासवर्ड व ईतर माहिती हॅकरला पुरवण्यास कारणीभूत ठरू शकतात. हॅकिंगचे अनेक प्रकरणं उघड न होता बिनभोभाट सुरू असतात. त्यांना झिरो डे अटॅक म्हणतात. एप्लिकेशन मधील या कमतरता दूर करण्यासाठी अपडेट येईपर्यंत हा धोका कायम असतो. मागच्या महिन्यात उघड झालेला व्हाट्सएच्या माध्यमातून हॅकिंग करणारा पेगसस स्पायवेअर हे त्याचं एक उदाहरण आहे.
लाईव्ह मिंट न्यूजपेपरच्या एका बातमीनुसार २०१७ मधे जवळपास ५० लाख सायबर गुन्हे घडलेले असताना त्यापैकी केवळ २१,७९५ गुन्हे दखलपात्र ठरले आहेत. या गुन्ह्यांबाबत पोळीसांची भूमिका ही बहुतेक प्रकरणात चालढकल करणारी असते. पण शेवटी हॅकिंग हा उंदरा मांजराचा खेळ आहे. या खेळात हॅकर नेहमीच एक पाऊल पुढे असतात त्यामुळे वरील सगळी काळजी घेऊनही आपले अकाउंट सुरक्षित राहील याची १००% खात्री देता येत नाही. डिजिटल जीवनाचा हे वास्तव स्वीकारून आपण माहिती तंत्रज्ञानाचा वापर आयुष्यात केला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे.
लेखन – नितीन दिवेकर
(लेखक आयटी क्षेत्रात तज्ज्ञ आहेत.)
हेही वाचा.. मोबाईल हेरगिरी
हेही वाचा.. व्हाटसेप पॉलिसी: सोशल मिडिया एप्सवरील तुमचा डाटा सुरक्षित आहे का?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)