निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेस नेत्यांची भेट घेतल्यानंतर ते कॉंग्रेस पक्षात जाऊ शकतात अशी चर्चा आहे. त्याचवेळी, कॉंग्रेसच्या सूत्रांकडून असेही संकेत मिळाले आहेत की, सोनिया गांधी पक्षाच्या स्थायी अध्यक्ष होऊ शकतात. मंगळवारी राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली, या बैठकीत काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी आणि काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल हेदेखील उपस्थित होते.माध्यमांच्या वृत्तानुसार, सोनिया गांधींनीही ऑनलाईन माध्यमातून या बैठकीत भाग घेतला.
सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीबद्दल कॉंग्रेसकडून अधिकृतपणे काहीही बोलले गेले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी मोर्चा बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि यासंदर्भात त्यांनी काही आठवड्यांपूर्वी प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती.
तज्ञांच्या मते ही बैठक पंजाब किंवा उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांबद्दल नव्हती.
असा अंदाज वर्तविला जात आहे.की ही बैठक ‘खूप मोठी’ होती.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची रणनीती आखण्यात प्रशांत किशोर महत्वाची भूमिका बजावू शकतात असे संकेत आहेत.
राहुल गांधी विरोधी पक्षनेते बनू शकतात
कॉंग्रेसच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेता बनविले जाऊ शकते. अधीर रंजन चौधरी यांच्या जागी राहुल गांधींना कमांड दिली जाण्याची शक्यता आहे. बुधवारी संध्याकाळी सोनिया गांधी यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलविली आहे.
अलीकडच्या काळात राहुल गांधी सरकारवर सतत हल्ले करत आहेत.
कोरोना संकटाच्या वेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.
बुधवारी एक बातमी सांगत त्यांनी ट्विट केले की, “जुमले है, लस नाही!”
कॉंग्रेसच्या नेत्याने शेअर केलेल्या त्या बातमीत असे म्हटले आहे की बर्याच राज्यात लसांची कमतरता असूनही केंद्राने त्याला नकार दिला आहे.
प्रशांत किशोर यांनी काम थांबवण्याची केली होती घोषणा
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल जिंकल्यानंतर प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची तीन वेळा भेट घेतली होती.त्यापैकी एका बैठकीला शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांचीही हजेरी होती. राष्ट्रमंच या संघटनेचे संस्थापक यशवंत सिन्हा यांनी ही भेट आयोजित केल्याचे बोलले गेले.मात्र आता प्रशांत किशोर यांच्या कॉँग्रेस भेटीनंतर शरद पवार हे राष्ट्रपतीपदाचा चेहरा असतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस विजयी झाला.त्या निवडणूकीची तृणमूलसाठी रणनीती आखण्यात प्रशांत किशोर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.मात्र त्यानंतर सर्वांनाच धक्का देत प्रशांत किशोर यांनी एक मोठी घोषणा केली होती.निवडणूक व्यवस्थापनाचे काम आणि आयपीएसी (IPAC) सोडत असल्याची घोषणा त्यांनी केली होती.“एक निवडणूक रणनीतीकार म्हणून मी बरीच वर्षे काम केलं आहे.८ ते ९ वर्षांपासून मी या क्षेत्रात आहे.आता मला आयुष्यात वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे.आता ब्रेक घेऊन काहीतरी वेगळं करण्याची वेळ आता आली आहे. मला ही जागा सोडायची आहे, असं त्यांनी एनडीटीव्हीला सांगितलं होतं.
राज्यात विविध पदांवरील 15 हजार जागांवर भरती जाणून घ्या
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 14, 2021, 22: 50 PM
WebTitle – Will Prashant Kishor join the Congress? 2021-07-14