भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आयोगाचे कामकाज २ ऑगस्टपासून सुरु होणार आहे
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.
१ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता.
या हिंसाचार प्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाचे कामकाज
२ ऑगस्टपासून सुरु होणार असून आयोगासमोर शरद पवार आपला जबाब नोंदवणार आहेत.
शरद पवार यांनी पुण्यातील शनिवार वाडा प्रांगणात आयोजित केलेल्या एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
तसेच त्यांनी भीमा कोरेगावबद्दल काही माहिती दिली होती.त्यानंतर शरद पवार यांचा जबाब नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.
Maharashtra govt-appointed Inquiry commission will record statement of NCP's Sharad Pawar in the Bhima Koregaon violence case. Witnesses' statements to be recorded from August 2 & Pawar will be summoned as well: Ashish Satpute, Inquiry Commission Lawyer
— ANI (@ANI) July 9, 2021
एल्गार परिषदेशी संबंधित असल्याचा तसेच भीमा कोरेगाव हिंसचाराशी संबंध असल्याचा आरोपावरून
मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी Stan Swamy यांना अटक करण्यात आली होती.त्यांचं निधन झालं.
फादर स्टॅन स्वामी हे देशातले नावाजलेले सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.गेले तीन दशक ते झारखंडच्या आदिवासी भागात कार्यरत होते.आदिवासींच्या विस्थापनाबाबत त्यांनी मोठा लढा दिला तसेच झारखंडच्या तुरुंगांमध्ये बंदिवान असणाऱ्या हजारो आदिवासींसाठी कोर्टात आवाज उठवला.
महाराष्ट्र सरकाराने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाद्वारे भीमा कोरेगाव प्रकरणात राष्ट्रवादीचे शरद पवार यांचा जबाब नोंदवण्यात येईल.२ ऑगस्टपासून साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येतील त्यावेळी शरद पवार यांनाही समन्स बजावले जाईल,” अशी माहिती भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी दिली आहे.एएनआयने या संदर्भात वृत्त दिले आहे.
मागीलवर्षी स्टॅन स्वामी यांची प्रकृती खराब असताना कोविड-१९ च्या काळातही ९ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांना झारखंड मधिल रांची येथून अटक करून मुंबईत आणल्यानंतर त्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.त्यावेळी एल्गार परिषद व माओवादी संघटनांशी आपला कसलाही संबंध नाही, असा दावा स्टॅन स्वामी यांनी केला होता.
मुंबईत आणल्यानंतर त्यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते.पार्किन्सन या रोगाने ते दीर्घकाळ आजारी होते,त्यामुळे त्यांना अन्न ग्रहण करण्यासाठी स्ट्रॉ व सीपर चा वापर करावा लागत होता.मात्र कारागृहात आल्यानंतर एनआयए कडून त्यांच्याकडील सर्व साहित्य जप्त करण्यात आले होते,त्यात स्ट्रॉ व सीपर हे सुद्धा जप्त करण्यात आले होते.ते आपल्याला परत द्यावे अशी मागणी तळोजा कारागृह प्रशासनाला केली होती पण तो त्यांना मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली होती.हा मुद्दा माध्यमात आल्यानंतर त्यांना या वस्तु पुन्हा देण्यात आल्या होत्या.
हे ही वाचा.. मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचं निधन
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 09 , 2021 12 : 12 PM
WebTitle – Sharad Pawar’s statement will be recorded in Bhima Koregaon case 2021-07-09