वाघधारा , प्रतिनिधी – कैलाशी जीतमल मसार ही आदिवासी अल्पभूधारक शेतकरी महिला असून कैलासी कडे तीन बीघा कोरडवाहू शेती मका व गहू हे मुख्य उत्पादन आहे.याशिवाय त्यांच्याकडे 5 शेळ्या, 2 म्हशी आणि 1 गाय आहे. या माध्यमातून ती आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह चालवते.त्याच्या कुटुंबात 2 मुले आणि 1 मुलगी अशा एकूण 5 लोक आहेत.
2019 मध्ये कैलाशी देवी वाघधारा संस्थेने स्थापन केलेल्या महीला सक्षम समूह सहभागी झाल्या.आदिवासी खेड्यातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी ,आत्मनिर्भर, आणि नेतृत्व विकास या साठी सक्षम महीला समूह स्थापन केला गेला आहे, तसेच आधुनिक काळात सेन्दीय शेती, सेंद्रिय खते, सेंद्रिय औषध आणि एकात्मिक शेती पध्दत किती महत्त्वाचे आहे याविषयीचे महत्त्व या महीला सक्षम समूहाला वाघधारा संस्थेची क्षेत्रकार्यकर्ता प्रेमलता निनामा यांनी कैलासी मसार हीला सांगितले.
महिन्याच्या मासिक बैठकीच्या माध्यमातून,वाघधाराच्या प्रेमलता निनामा यांनी या सक्षम आदिवासी समूह महिलांशी वेळोवेळी संवाद साधला आणि त्यांना एकात्मिक शेती अवलंबण्यास आग्रह केले. त्यानंतर कैलाशी मासार यांनी परसबाग आणि एकात्मिक शेतीकडे कल सुरू केला, ज्यामध्ये वागधारा च्या क्षेत्रकार्यकर्ता प्रेमलता निनामा यांनी त्यांना गांडूळखत कंपोस्ट खत व सेंद्रिय औषध बनविण्याचे प्रशिक्षण दिले आणि आपल्या आरोग्यासाठी सेन्द्रीय परसबाग कीती व कसे आवश्यक आहे याबद्दल देखील माहिती दिली.
कैलासी पुढे असे सांगतात की वाघधाराने गठित केलेल्या लक्ष्मी माता समर्थ गटाच्या बैठकीत नियमितपणे हजेरी लावून मला बरीच माहिती मिळाली. त्यामध्ये कोणकोणत्या सरकारच्या योजनां आहेत व आपण कोणकोणत्या योजनेत सहभागी होवू आणि पात्र आहोत माहिती मिळाली. मी व माझे पती वृध्द पेन्शन योजनेत सहभागी होवू शकतो असे मला वाघधरा च्या प्रेमलता निनामा यांनी सांगितले व पिंपळखुट ब्लॉकमधील ई-मित्राकडे अर्ज करून मला व माझे पती जितमल मसार यांना वृद्धावस्था पेन्शन योजनेचा फायदा मिळवून दीला . आत्ता आम्ही दोघेही पती-पत्नीला दरमहा 700/- रुपये मिळतात आणि आतापर्यंत आम्हाला या योजनेंतर्गत (नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ पर्यंत) 7000/- मिळाले आहे. आणि आम्हाला लोकांशी कसे बोलायचे, आमच्या समस्यांचे निराकरण कसे करावे, पंचायतीत महिला गटांचा सहभाग काय आहे याबद्दल वाघधारा कडून माहिती मिळाली आणि आपण आपल्या समस्या मांडू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला .
कैलाशीला वाघधाराने भाजीपाला बियाण्यांची किट दिली होती.त्यात टोमॅटो, वांगे, मिरची, पालक, कोथिंबीर, कांदा, चवळी , भोपळा, कोहळा, दोडका इत्यादी भाजीपाल्याचा समावेश होता. कैलाशी यांनी घरी उपलब्ध जागेत सेन्द्रीय परसबाग लावली आणि या भाज्यांचा आहारात समावेश केले. ऑगस्ट ते एप्रिल या काळात बाजारातून कोणतीही भाजी खरेदी केली नाही आणि 9 महिन्यांत 9000 रुपयांची बचत केली आणि भाजीपाला साठी बाजारावर अवलंबून राहावे लागले नाही. वाघधाराच्या मार्गदर्शनाने कैलाशी यांनी परसबाग लावून बाजाराचे अवलंबन कमी केले.
कैलाशींनी परसबागेत फक्त हिरव्या भाज्या खाल्ल्याच पण तर टोमॅटो, वांगे, मिरची, पालक, कोथिंबीर, कांदा, कारले, दोडका याचे परसबागेतील बियाण सुध्दा राखून संवर्धन करुन ठेवले.वाघधाराने दिलेल्या कांदाच्या बियाणे किटमुळे १ क्विंटल कांदा चे उत्पादन माझ्या परसबागेत झाले असे कैलाशी सांगतात .पुढे त्या म्हणतात की वाघाधरीत सामील होण्यापूर्वी मी परसबाग लावत नव्हती आणि बाजारातूनच भाजीपाला विकत घेत होती त्यामुळे पैसा प्रवास खर्च आणि वेळ जायचा.परंतु आता सेंद्रिय परसबागेत विविध प्रकारची भाजीपाला आहे आणि भाजीपाला अगदी ताजा चविष्ट परसबागेत उपलब्ध आहे त्यामुळे माझी बचत झाली आहे .ह्याचे मी श्रेय वाघधारा संस्थाला देत आहे.
आम्ही गावात भाजी विकली नाही कारण गावात सगळे जवळचे लोक गावात राहतात.
आम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊ शकत नाही कारण त्या लोकांनी माझ्या परसबागेसाठी पाण्याची सोय केली आहे.
म्हणून त्यांनी त्यांच्या पोषण बागेतून विनामूल्य भाजीपाला दिलेला आहे.
आणि देण्याची किंमत आपण त्याची तुलना पैशांशी करू शकत नाही.
आणि कैलासी म्हणतात की परसबागे मुळे आहारात विविधता आली आहे.
हे सर्व वाघधाराच्या प्रयत्नांचे फलीत आहे.मी वाघाधाराचे आभारी आहे.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
हे ही वाचा.. कांदा पिकाने आणले केसरबाई बामनिया च्या जिवनात आनंद अश्रू…
मधू कामरू डामोर यांची आत्मनिरभर्तेकडे वाटचाल
हे ही वाचा…समाजवादी अर्थव्यवस्था व कल्याणकरी राज्य संकल्पनेची पायमल्ली…
First Published on MAY 03, 2021 15:59 PM
WebTitle – Kailashi Jitmal Masar has reduced market dependency 2021-05-03