शेतकरी जगला पाहिजे आणि शेती हा भारताचा प्रमुख व्यवसाय आहे .त्यामुळे शेती करणाऱ्या आणि शेतीला पूरक व्यवसाय करणाऱ्या सर्वांच्या प्रति बाबासाहेबांनी अनेक कार्य केले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणात खोती पद्धती प्रचलित होती. 1938 आली कोकण सातारा आणि नाशिक येथील शेतकऱ्यांनी असेंब्ली हॉल वरती जावेळी मोर्चा आणला होता. त्यावेळी बाबासाहेबांनी त्या मोर्चाला मार्गदर्शन केले होते. शेतकऱ्यांचा चरित्रअर्थ योग्यप्रकारे चालावा ,त्यांच्या आर्थिक हिताची व्यवस्था व्हावी शेतमजुरांना किमान वेतन ,मिळावे शेती विषयी शिक्षण आणि संशोधन व्हावे .पिकांच्या आणि जनावरांचे संरक्षण व्हावे ,शेतीसाठी पाणी या धोरणाच्या सरकारने अवलंब करावा .जमिनीचे वाटप व सुधारणा करावी शेती पूरक व्यवसाय म्हणून मत्स्यपालन यासारखे उद्योग याला आर्थिक पाठबळ द्यावे .असे निवेदन त्यावेळी बाबासाहेबांनी सरकारला दिले होते.
शेतीविषयी योजना
बाबासाहेबांनी शेती विषयी काही योजना आखल्या होत्या .त्यातलीच एक महत्वाची योजना म्हणजे दामोदर प्रकल्प .दामोदर ही नदी प्रचंड वेगाने वाहते .या नदीच्या पाण्याचा उपयोग शेती, विज निर्मिती, पाण्यावरील दळणवळण यासाठी करावा असे बाबासाहेबांना वाटले. या नदीला दुखदायी नदी असे म्हटले जात होते. कारण दामोदर नदी चा उगम छोटा नागपूरच्या टेकड्या मधून झाला आहे आणि ही नदी बिहार मध्ये 290 किलोमीटर वाहते आणि नंतर बंगाल प्रांतातून कलकत्ता पासून 48 किलो मीटर खाली हुगळी नदीला मिळते.
540 किलोमीटर प्रवासात दामोदर नदी चे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे खूप प्रचंड वेगाने वाहते आणि पुरामुळे अतिशय हानी करते.
या दामोदर नदीसाठी प्राधिकरण स्थापन करून सोन नदी, महानदी, कोसी, चंबळ आणि दख्खनमधील नद्यांचे काम हाती घेतले.
खोती पद्धती
स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणात खोती पद्धती प्रचलित होती .खोती पद्धती म्हणजे खाजगी सावकारी असते .बाबासाहेबांनी खोती पद्धती नष्ट करण्यासाठी 17 सप्टेंबर 1937 ला विधानसभेत विधेयक मांडले .बाबासाहेबांनी खोती पद्धती कायमची नष्ट करण्याकरता अनेक पातळ्यांवरती प्रयत्न केले .याकामी बाबासाहेबांना अनंतराव चित्रे आणि सुरुवात टिपणीस यांची मदत झाली .चित्रे आणि टिपणीस यांच्यावरती खटले दाखल झाले त्यावेळी बाबासाहेब स्वतः त्यांच्यासाठी न्यायालयात उभे राहिले. आणि युक्तिवाद केला .बाबासाहेबांच्या विचारातून अजून एक अमूल्य विचार समोर येतो आणि तो शेतीसाठी खूप महत्त्वाचा आहे. तो विचार म्हणजे बाबासाहेबांनी त्याकाळी मांडलेला सामुदायिक शेती विचार. सामुदायिक शेती केल्यानंतर शेतकऱ्यांना बरे चे फायदे होतील आणि कमी श्रमात अधिकाधिक उत्पन्न मिळेल हा त्यांचा हेतू होता.
बाबासाहेबांनी शेतीच्या उत्पादकतेवर परिणाम करणारा एक घटक म्हणजे धारण क्षेत्राचा आकार .याबद्दल खूप छान विचार मांडले आहेत .वाढती लोकसंख्या आणि विभक्त कुटुंब पद्धतीचा अवलंब केल्यामुळे शेतजमीन दिवसेंदिवस विभागणी जात आहे .आणि त्यामुळे शेतीची उत्पादकता पण कमी होत आहे. आणि त्यामुळे त्या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता येत नाही .धारण क्षेत्र जर शेतकऱ्यांच्या हिताचे नसेल तर कायद्याने त्याला परवानगी देऊ नये असे बाबासाहेब म्हणत होते.
बाबासाहेबांचा वतनदारी पद्धतीस विरोध होता .वतनामुळे माणूस गुलाम होतो .माणसांमध्ये तडफ,स्वाभिमान राहत नाही.
आणि वतनदारी पद्धत नष्ट केल्याशिवाय बहुजन समाजामध्ये विकास प्रगती आणि परिवर्तन होणार नाही असे बाबासाहेबांचे मत होते.
भूमिहीनांना जंगल खात्याच्या पडीक जमिनी देऊन त्यांना त्या जमिनी कसावयास लावाव्या
जेणेकरून भूमिहीन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत असे बाबासाहेबांना वाटत होते.
आधुनिक शेती
पारंपरिक शेती न करता शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढेल बचत वाढेल शेतीमध्ये गुंतवणूक होईल. तसेच शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण होणे गरजेचे आहे असे बाबासाहेबांना वाटत होते.
कारखान्यात आणि इतर ठिकाणी जे मजूर कष्ट करत आहे.
आणि त्यांना जसे अनेक लाभ मिळतात त्याच धर्तीवर शेतमजुरांना पण त्या प्रकारचे लाभ मिळावेत असे बाबासाहेबांना वाटत होते.
बाबासाहेबांना शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी करायचा होता. शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय जरी असला तरी भारतातील लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून न राहता शेती पूरक इतर धंद्याकडे वळावे असे बाबासाहेबांना वाटत होते .त्याचप्रमाणे शेती उद्योगांमधील छुपी बेकारी ही पण बाबासाहेबांना नष्ट करायची होती .शेतीमध्ये निष्क्रिय भांडवल आणि निष्क्रिय श्रम हे कमी करण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक उपाय योजले होते. शेतजमिनीच्या मानाने शेती वरती अवलंबून असणारे अनेक लोक आहेत. शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी शेती वरती अवलंबून असणाऱ्यांची
राष्ट्रीय सिंचन धोरण
संख्या अधिक आहे .आणि ही संख्या म्हणजेच शेती व्यवस्थेतील छुपी बेकारी आहे. बाबासाहेबांना ती बेकारीकमी करायची होती.
शेती उत्पन्नावर सरकारी जमीन महसूल आकारत असते. आणि या महसुलासाठी अनेकदा शेतकऱ्यांची पिळवणूक होते .विशिष्ट रकमेपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत बाबासाहेब कनवाळू होते. त्या शेतकऱ्यांना महसुलाची माफी मिळालीच पाहिजे असे बाबासाहेबांना वाटत होते. त्यासाठी बाबासाहेबांनी लँड रेवेन्यू कोड कलम रद्द करून जमीन महसूल प्राप्तिकराच्या कक्षेत आणावे असे बाबासाहेबांना वाटत होते.
बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात शेती विषयक अनेक कामे केली आहेत .त्यातली महत्त्वाची कामे म्हणजे बाबासाहेबांनी राष्ट्रीय सिंचन धोरण.हे धोरण ठरवण्यासाठी सरकारला सुचवले होते. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि पाण्यामुळे देश जगतो हे बाबासाहेबांनी सांगितले होते .शेतीला पूरक तांत्रिक संस्थांची निर्मिती करणे काळाची गरज आहे हे बाबासाहेब जाणून होते .बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार दामोदर प्रकल्प हिराकूड प्रकल्प इत्यादी प्रकल्प सरकारने हाती घेतले. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याला सलाम.
#जयंती_विशेष
#उद्धारकर्ता_आपला
#मार्गदर्शक_आपला
#उत्सव_आपला
क्रमशः
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
2 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
3 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
4 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी 5
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी 6
First Published on APRIL 07, 2021 09 : 52 AM
WebTitle – Dr. Babasaheb Ambedkar’s agricultural policy 2021-04-07