भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 130 वि जयंती.देशभरात आणि जगातही कोरोनाचे सावट गंभीर असल्याने अनेकांनी मागीलवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध online उपक्रम राबवून साजरे करण्याचे ठरवले आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य कर्तुत्व आणि विचारांचा आदर जगभरात केला जातो.असाच आदर कॅनडा या देशाने केला असून या देशात मागीलवर्षापासून दरवर्षी आता “डॉ. बी. आर. आंबेडकर समता दिन” साजरा करण्यात येत आहे.
डॉ बाबासाहब आंबेडकर यांना कॅनडा च्या भूमीत सन्मान समता दिन
कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया राज्याने यूनाइटेड किंगडमच्या ( ब्रिटनच्या) राणी एलिज़बेथ द्वितीय यांच्या सहमतिने ,14 एप्रिल हा दिवस ‘डॉ बी आर आंबेडकर समता दिवस’ (Dr. B. R. Ambedkar Equality Day ) जाहीर केला आहे. कॅनडातील ‘चेतना एशोशिएशन’ आणि जय विर्दी यांनी यासाठी प्रयत्न केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव जगभरात होत असल्याने त्यांना विश्वरत्न असे संबोधले जाते.
“डॉ. आंबेडकरांचा जन्म भारतात झाला असला तरी, समानतेसाठीचे त्यांचे ध्येय संपूर्ण जगासाठी संबंधित आहे, अशा शब्दात बर्नबीचे कौन्सिलर साव धलीवाल यांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रती आपल्या भावना कौन्सिल मीटिंग मध्ये व्यक्त केल्या.
“आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही समानतेच्या तत्व मूल्यांचे स्मरण व्हावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र शहरातील मध्यवर्ती ठिकाणी वैचारिक चर्चा होणाऱ्या विचार-विनिमय हॉल मध्ये स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे” असे कौन्सिलर साव धलीवाल यांनी सांगितले.
भारताच्या या सुपुत्राचा जगभरात होणारा गौरव सन्मान हा तमाम भारतीय नागरिकांच्या मनात आनंद आणि अभिमान फुलवणारा आहे.
भारताची राज्यघटना लिहून भारतातील प्रत्येक घटकास नागरिकास समता आणि स्वातंत्र्य बहाल करणाऱ्या या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना टीम जागल्या भारत विनम्र अभिवादन करत आहे.
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
हे ही वाचा.. संविधान समजून का घ्यायचे?
वाचा.. संविधानामुळे भारतीय स्त्रिया गुलामीतुन मुक्त
भारताचे संविधान: मानवी हक्कांचा प्रखर जाहीरनामा
जागतिक महिला दिन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आपण
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महिला वर्ग
First Published on APRIL 03, 2021 14 : 05 PM
WebTitle – B.R. Ambedkar Equality Day celebrating in Canada Burnaby since last year 2021-04-04-3