व्हाट्सअप ची नवी पॉलिसी काय आहे? आजच्या काळात सोशल मिडिया हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.अन्न वस्त्र निवारा मानवाच्या या तीन मूलभूत गरजा होत्या,त्यात सोशल मिडिया ही चौथी मूलभूत गरज मानवाने स्वत: तयार केली आहे.आज कुणाकडे मोबाईल नाही आणि त्यातही मोबाईल मध्ये विविध प्रकारचे एप्स नाहीत असं आढळून येणे जवळपास दुरापास्त बाब आहे.
मोबाईलचा वापर
मोबाईलचा शोध,वापर हा प्रामुख्याने संवाद,माहितीची देवाण-घेवाण यासाठीचा होता.त्यामध्ये हळूहळू एवढी प्रगती झाली की मोबाईल हे आपलं सेकंड होम सेकंड लाईफ झालं.एवढं महत्व खचितच इतर कोणत्या गोष्टीला मिळालं.मोबाईल थिएटर पासून किचन पर्यंत गाण्यांच्या बैठकीपासून बँकेच्या व्यवहारासाठी हॉस्पिटल भाजी व्हिडिओ मेकिंग पर्यंत,अशी एकही गोष्ट सुटली नसेल ज्यात मोबाईलचा वापर ‘व्यवहारासाठी’ होत नाही.
हे व्यवहार करण्यासाठी मोबाईल मध्ये त्या त्या सेवेशी संबंधित “एप्स” मोबाईल मध्ये डाउनलोड करावे लागतात.हे एप्स डाउनलोड करताना अशा एप्सना काही विशिष्ट परमिशन द्याव्या लागतात.
आपण फेसबुकचे उदाहरण घेऊया –
तुम्हाला घाबरवणे तुमच्या मेंदूत भीतीचे भूत घुसवणे
फेसबुक चा वापर करताना या काही परमिशन्स आपल्याला अलाऊ कराव्या लागतात.फेसबुक तुमच्याकडे तुमच्या कॅमेऱ्याचा एक्सेस मागत आहे. फोन स्टोरेजचा म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये फोटो फाइल्स जिथे सेव्ह होतात त्या फोल्डर/ फोटो गॅलरीचा एक्सेस मागत आहे. फेसबुक तुमचे लोकेशन जाणून घेऊ इच्छित आहे.
नवख्या माणसाला आणि तुम्हाला घाबरवायचं असेल तेव्हा,अरे बापरे! फेसबुकला कशाला हव्यात माझ्या लोकेशन डिटेल्स? कशाला हवा माझ्या स्टोरेजचा एक्सेस? फेसबुक माझा कॅमेरा एक्सेस का मागत आहे? असे प्रश्न तुमच्यासमोर टाकले की तुमची पाचावर धारण बसेलीच समजा.
आपल्याकडे प्रसार माध्यमे ही अघोरी विद्या नरपिशाच्चमुंजा बुवा बंगालीबाबा टाईप असल्याने तुम्हाला घाबरवणे तुमच्या मेंदूत भीतीचे भूत घुसवणे हाच पोटापाण्याचा उद्योग असल्याने ते हा व्यवसाय ईमानेइतबारे करत आले आहेत.
लोकाना खरी सत्य माहिती मिळणे हा त्यांचा अधिकार आहे हक्क आहे. ती त्यांना त्याच स्वरूपात मिळाली पाहिजे.परंतु भारतात तसे होत नाही.कोरोनाबाबत सुद्धा आपल्याकडे हाच खेळ खेळला जात आहे.
व्हाट्सअप पॉलिसी
आताही काही दिवसांपासून भारतीय मिडियाने लोकांमध्ये ही भीती पसरवणे सुरू केले आहे.त्यांची हेडलाईनचं अशी आहे.”पॉलिसी एक्सेप्ट करा अन्यथा व्हाट्सअप डिलिट करा,तुमच्याकडे पर्याय नाही” हिंदी मराठी इंग्रजी सगळीकडे हा प्रकार पाहायला मिळेल.
या भीतीने नव्या व्हाट्सअप पॉलिसी बाबत लोक सोशल मिडियातही बोलत आहेत.बंद करा ह्यांव करा त्यांव करा.हे काय नवं आहे का?
व्हाट्सअप ची नवी पॉलिसी काय आहे?
नवी व्हाट्सअप पॉलिसी जाणून घेण्याअगोदर आपण जुनी पॉलिसी माहीत करून घेऊ,थोडक्यात असं की जुन्या पॉलिसी मध्ये तुम्ही तुमचा नंबर,तुमचे लोकेशन,तुमच्या फोटो गॅलरी चा एक्सेस,मायक्रोफोन एक्सेस,कॅमेरा एक्सेस इत्यादि म्हणजे जवळपास सर्वच प्रकारचे एक्सेस अगोदरच व्हाट्सअप ला दिलेले होते.आहेत.
आता नव्या पॉलिसी मध्ये काय आहे?
तर अगोदर एक गोष्ट जाणून घेऊ की व्हाट्सअप चा मालक मार्क झुकेरबर्ग आहे.तसेच फेसबुकचा मालक देखील मार्क झुकेरबर्ग आहे. आणि इन्स्टाग्रामचा मालक देखील मार्क झुकेरबर्गच आहे.या सर्वांचा मालक एकच असल्याने या सर्व सोशल प्लॅटफॉर्मवर येणारे युजर्स (पब्लिक) यांना या तीनही सेवा एकत्रित मिळाव्यात आणि सर्व एकाच ठिकाणी “मर्ज” व्हावेत हा यामागचा एक हेतु आहे.
हा हेतु समोर ठेवून नवीन पॉलिसीमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटीग्रेशन वाढवले आहे.मुळातच एक लक्षात घ्यायला हवं की ही दोन्ही प्लॅटफॉर्म अगोदरपासूनच इंटीग्रेशन मोडवर होते.*जेव्हापासून फेसबुकची त्यावर मालकी अस्तित्वात आली.तुम्ही एकाचवेळी दोन्ही प्लॅटफॉर्मवर तुमच्या पोस्टस शेअर करू शकत होतात.याचा अर्थ या प्लॅटफॉर्मचा एकत्रितपणे डाटा फेसबुककडे अगोदरपासूनच जतन केलेला आहे.
व्हाट्सअप ची नवी पॉलिसी
व्हाट्सअप ची नवी पॉलिसी इथे जाणून घेता येईल.नवी पॉलिसी ही प्रामुख्याने व्हाट्सअप पेमेंट फीचरशी रिलेटेड आहे.यामध्ये तुम्ही आर्थिक व्यवहार कसे करत आहात.त्याच्याशी निगडीत माहिती गोळा केली जाईल.अनुमान असे आहे की युरोपियन देशांनी फेसबुकवर याबाबत काही बंधने घातली आहेत.त्यामुळे फेसबुकने सर्वच देशातील पॉलिसी बदल केला आहे.यासोबतच थर्ड पार्टी एप्लीकेशनसोबत तुमचा डाटा/माहिती शेअर केली जाणार आहे.ती तशीही पूर्वी होतच आली आहे.आर्थिक व्यवहार होणाऱ्या प्लॅटफॉर्मची इत्यंभूत माहिती गोळा करणे क्रमपात्र असते.
मोबाईल एप्लीकेशन्स एवढे एक्सेस का मागत असते? अशी माहिती गोळा का करते?
वर आपण पाहिलं की फेसबुक आणि अशाचप्रकारे इतर मोबाईल एप्लीकेशन्स आपल्याकडे वेगवेगळ्याप्रकारे एक्सेस परमिशन मागत असतात.मध्यंतरी या संदर्भाने कॅमेरा एक्सेस,गॅलरी एक्सेस,स्पीकर,मायक्रोफोन एक्सेस असल्या परमिशनवर लेखावर लेख पाडले जात होते,त्यात टीव्ही पत्रकार भीतीची भर घालत असतात,दोन हजार च्या नोटेमधली चीप आजही त्यांना खरी वाटते.असे लोक समाजाला नेहमी भीती विकत राहतात आणि मिसगाईड करत राहतात.
मुळात असे एक्सेस तुम्हाला काम सोप्या रीतीने करता यावं म्हणून असतं.तुम्ही मोबाइलवर फोटो काढता,तो फेसबुकला किंवा व्हाटसेप आणि तत्सम एप,साइटवर आपलोड करता तेव्हा ते सहज होतं त्यात आपल्याला काही वाटत नाही.पण हे सहज होण्यासाठी तुम्हाला अगोदर परमिशन द्यावी लागते.ती दिल्याने तुमची फोटो गॅलरी कनेक्ट झाली आणि फोटो सर्च करता आला.अन्यथा तुम्हाला मोबाइलवरुन फोटो अपलोड करता येणार नाही.
हे सूत्र सर्वच फीचर साठी जसं की मायक्रोफोन,कॅमेरा इत्यादीसाठी लागू असते.जर तुम्ही या गोष्टिना एक्सेस दिला नाही तर त्याद्वारे तुम्हाला त्या मोबाईल एप्लीकेशन मध्ये काम करता येणार नाही.त्यामुळे कोणतेही एप चालवायचे असेल तर तुम्हाला त्या एपसाठी सर्व परमिशन्स देणे भाग असते.
हे सगळं खरं असलं तरी या गोष्टींचा मिसयुज होऊ शकतो का?
अर्थातच,याचं उत्तर हो असं आहे.मोबाईल एप्लीकेशन्स स्टोअरवर असे संशयास्पद एप्स देखील असतात.जे तुमचा डाटा एक्सेस करून तुम्हाला मोठं नुकसान करू शकतं.गुगलचं म्हणाल तर गुगल अशा काही एप्सवर स्वत: बंदी घालते आणि आपल्या प्लेस्टोअर मधून असे एप डिलिट करते.मात्र तरीही अशा एप्सवर पूर्णपणे नियंत्रण गुगलला सुद्धा शक्य होत नाही.
विविध कंपन्यांच्या प्रमाणे प्रत्येक मोबाईलसाठी वेगवेगळ्या प्रकरके एप्स स्टोअर असतात एड्रॉईड मोबाईलसाठी वेगळे एपल फोनसाठी वेगळे iOS सिस्टम आणि APK फाईल,यातही आता सॅमसंग प्रमाणे काही कंपन्यानी स्वत:चे एप स्टोअर आणली आहेत.
परंतु,ज्या मोठ्या कंपन्या असतात त्या तुमच्या डाटाचा मिसयुज करत नाहीत.असं एका पातळीपर्यंत म्हणता येईल.*मिसयुजचा अर्थ तुम्हाला वैयक्तिक नुकसान करणे.परंतु त्या तुमचा डाटा इतर थर्डपार्टीला विकत असतात.हेही तेवढेच खरे आहे.
डाटा विकतात म्हणजे नेमकं काय?
डाटा विकतात म्हणजे नेमकं काय? तर सर्वात अगोदर तुमचा मोबाईल क्रमांक,ईमेल आयडी,तुमचे नाव,वय,जेंडर,इत्यादी शिवाय काही प्रकरणात तुमचे बिहेवियर पॅटर्न मोठ्या कंपन्या,याचा अर्थ इथे प्रसिद्ध कंपन्या असा घ्यायला हवा.बिगशॉट फेसबुक/व्हाटसेप/ट्विटर/इन्स्टाग्राम हे आहेतच,परंतु असेही काही एप्लीकेशन्स आहेत जी मोठ्याप्रमाणावर लोकप्रिय आहेत.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.कारण शेवटी हा एक व्यवसाय आहे. आणि तो निरंतर चालू राहावं अशी कोणत्याही व्यावसायिकाची धारणा असते.त्यामुळे मोठ्या कंपन्या आणि लोकप्रिय कंपन्या तुमचे बँक खाते लुटून बदनाम होणार नाहीत.किंवा तुमचे फोटो व्हिडिओ विकून बदनाम होणार नाहीत.गोत्यात येणार नाहीत.
हे मोबाईल एप्लीकेशन्स कुणीही बनवू शकतो,अगदी सामान्य व्यक्ती देखील,त्यासाठी कोणत्याही विशेष अहर्तेची गरज नसते.अर्थातच एप्स डेव्हलपरसाठी कोडिंगचे ज्ञान असणे अनिवार्य जर स्वत:बनवत असाल तर डेव्हलपरला पैसे देवून तुम्ही कोडिंग न येताही स्वत:चं एप बनवून ते प्लेस्टोअर मध्ये अपलोड करू शकता.गुगल प्लेस्टोअर मध्ये असे एप अपलोड करण्यासाठी गुगल तुम्हाला वनटाईम $25 चार्ज करते.म्हणजे जवळपास अठराशे रुपये शुल्क आकारणी करते.त्यानंतर तुमचे एप युजरला डाउनलोड करण्यास उपलब्ध होते.
एक युजर म्हणून आपण काय समजून घेतलं पाहिजे?
एक गोष्ट आपण मुळात लक्षात घेतली पाहिजे तुम्ही कोणत्याही वेबसाईट ,मोबाईल एप्लीकेशन आणि गुगल ब्राउझर वर स्वत:ची माहिती देता,म्हणजे थोडक्यात लॉगिन करता तेव्हा तुम्ही तुमची माहिती त्यांना स्वत: दिलेली असते.गुगल हा अजूनतरी सर्च इंजिन मध्ये एकमेव सोपा सरळ आणि लोकप्रिय पर्याय आहे.सर्वांच्या माहितीचा,
आपण सहजपणे म्हणतो गुगल कर.. एवढं ते अंगळवाणी पडलेलं आहे.त्याला इतर काही सर्च इंजिन्स हळूहळू टक्कर द्यायला धपडपत आहेत.परंतु सध्यातरी इंटरनेटच्या जगात गुगल ‘दादा’ आहे.त्यामुळे गुगलबद्दल बोलू.गुगलकडे तुमची सगळी माहिती इत्यंभूत आहे.त्याचं मशीन लर्निंग प्रोग्रामिंग सर्वात स्ट्रॉग आहे.
त्यामुळे थोडक्यात असं समजा की तुम्ही गुगलमध्ये जेव्हा पहिलं लॉगिन करता,ईमेल बनवता आणि सर्व्हिस वापरायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही अक्षरश: नग्न झालेले असता.अर्थात ही गोष्ट फक्त तुमच्या अन गूगलच्या मध्ये असते,तिसऱ्या व्यक्तीला त्याबद्दल गुगल सुद्धा कधी सांगत नाही.सांगू शकत नाही.
बिहेवियर पॅटर्न
परंतु तुमच्या काही गोष्टी गुगल स्वत:साठी वापरत असते.तुमचं बिहेवियर पॅटर्न गुगलला माहीत असतं,तुमची आवड तुम्ही कुठे जाता कुठे विझीट करता,तुम्ही कोणत्या हॉटेल मध्ये जेवायला गेलात हे सगळं गुगलच्या मशीनला नोंद होत असतं. अर्थातच तसा एक्सेस तुम्हीच गुगलला दिलेला आहे.हेही लक्षात घ्यायला हवं.
यात घाबरून जाण्यासारखे काहीच नाही.सुरुवातीला या गोष्टी नव्या आहेत तेव्हा लोकाना वाटतं अरे बापरे याला कसं समजलं मी इथे गेलो ते,(टिपिकल इंडियन पब्लिक) किंवा मग आम्ही चर्चा केली टीव्ही घ्यायचा आहे आणि काय आश्चर्य माझ्या न्यूजफिडमध्ये चक्क टीव्हीची जाहिरातच आली की (टिपिकल भोळसट भारतीय पब्लिक) हे काहीतरी डेंजर आहे.मला ट्रॅक केलं जातं आहे.माझ्यावर सर्व्हिलांस आहे.someone is spying on me तर यात घाबरून जाण्यासारखे काहीच नाही.
अगोदर दीर्घ श्वास घेऊन आपण मनात एकच गोष्ट आणायची आपण काही प्रधानमंत्री नाही आहोत. मोठे सेलिब्रेटी किंवा कुख्यात डॉन किंवा मग टोकाचं काहीतरी मोठ्ठा कांड केलेलं असं काही नाही,आपण आहोत सामान्य व्यक्ती.हे लिहिन्याचे कारण एवढेच की तुम्हाला या भीतीतून बाहेर काढणे.
अन्यथा तुम्ही सामान्य जरी असलात तरीही- तुमची खाजगी माहिती, खाजगी क्षण,तुमचं वैयक्तिक आयुष्य हे इतर कोणत्याही व्यक्तीच्या तुलनेत कमी नाही. अगदी प्रधानमंत्री असले तरी त्यांचा आणि तुमच्या माहितीची वॅल्यू एकच ती अमूल्य असं समजा.
परंतु मग हे का होत आहे? असा प्रश्न येतोच.तर गुगल आणि इतर हे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत.
तुम्हाला अधिकाधिक चांगली आणि क्वीक सर्विस देणे हे त्यांचं काम आहे.
तुम्ही टीव्हीची चर्चा केलीय,तुम्हाला नविन टीव्ही घ्यायचा आहे.
यासाठी तुम्ही शोरूम मध्ये जाल,आजूबाजूंच्या दुकानात जाल.यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढावा लागेल.
हेच काम मशीन लर्निंगने केलं.त्याला आपण AI सिस्टम देखील म्हणू शकतो हा तांत्रिक शब्द सध्या प्रचलित आहे.
artificial intelligence हे तुमच्या बिहेवियरला ट्रॅक करत असतं,तुम्ही काय काय कुठे करता
,तुम्ही काय पाहता,तुम्ही काय सर्च करता,तुम्हाला काय आवडतं,तुम्ही सतत कोणती गोष्ट जास्त बघता.
तुम्ही पुढे काय करणार आहात? हे सगळं सगळं ट्रॅक होत असतं.यात घाबरून जाऊ नये.
असं का करावं लागतं ? हमको ट्रॅक क्यू किया जा रहा है भाई ?
सोपं उत्तर – रीव्हेन्यू मॉडेल
तुम्ही एक रीव्हेन्यू मॉडेल आहात.तुम्ही कस्टमर आहात,ग्राहक,कंपन्यांच्या भाषेत customer is a king ग्राहक हाच राजा.
मग या राजासाठी घातल्या जातात पायघड्या.
राजाला काय हवं काय नको हे सगळं चुटकीसरशी पुढ्यात आणून ओतलं जातं.
थोडक्यात तुम्हाला रेड कार्पेट ट्रीटमेंट दिली जाते.
काय घाबरताय मग? बरं वाटलं का आता?
कंपन्या हे का करतात ? कारण नफा कमवायचा आहे. आणि त्याहीपेक्षा मुद्दा असतो मेंटेनन्स.
समजण्यासाठी आपण आपलंच उदाहरण घेऊया.जागल्याभारत हे वेबपोर्टल सुद्धा एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे.
आम्ही तुम्हाला कंटेंट सर्व्ह करतो.विविध प्रकारची विविध क्षेत्रातील माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येतो.
हे करत असताना आम्हाला ही साईट अपटूडेट ठेवावी लागते.साईटचं रजिस्ट्रेशन,
नोंदणीपासून डोमेन नोंदणी,ट्रेडमार्क,व्यवसाय,आणि सर्वात मोठा मुद्दा सर्व्हर
या साईटवर प्रकाशित होणारी सर्वच्या सर्व माहिती ही एका सर्व्हरवर सेव्ह केली जाते.स्टोर असते.
आपण जेव्हा गुगल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून ही माहिती वाचण्यासाठी काही किवर्डस टाईप करतो.
किंवा थेट साईटवर येवून माहिती शोधतो.तेव्हा तुमची रिक्वेस्ट सर्व्हरला जाते,
सर्व्हर ती रिक्वेस्ट घेऊन तुम्हाला ती माहिती दाखवायला सुरुवात करते.
आपल्याला ते पेज दिसतं,त्यावर लेख/मजकूर असतो हे आर्टिकल/कंटेंट म्हणजे सर्व्हरने आपल्याला उपलब्ध करून दिलेली माहिती,
आता ही माहिती अगोदर कुणीतरी लिहिणारा असेल नंतर ती इथे भरणारा असेल.सेव्ह/जतन करणारा असेल.
रीव्हेन्यू मॉडेल
हे सगळं करत असताना किती सायास असतात हे आता तुमच्या लक्षात आलं असेल,तर मग या सगळ्या गोष्टीसाठी पैसे लागतात.
सर्व्हरचे ठराविक भाडे असते.इथं ती अपलोड करणारे.व्यक्ती असतील त्यांचे मानधन असते.
साईटवर इतर विविध सुविधा असतात त्यांचे वेगवेगळे भाडे आकारले जाते.
या सगळ्या गोष्टी सामान्य माणसांना परवडणाऱ्या नसतात.
म्हणजे वाचक या गोष्टीसाठी नेहमी पैसे मोजू शकत नाहीत.तसे करताही येत नाही.
म्हणजे समजा की तुम्ही पुस्तक विकत घेऊन वाचता,किंवा एखादे वर्तमानपत्र विकत घेऊन वाचता,
त्यातील मजकुराबद्दल तुम्ही पैसे मोजलेले असतात.तसं सोशल साईट्स वेब पोर्टल्स एप्स यांना दरवेळी पैसे द्यावे लागत नाहीत.
मग यांचा खर्च कसा निघणार? मेंटेनन्स कसा निघणार मग त्यासाठी असते हे रीव्हेन्यू मॉडेल.
तुम्हाला आपल्या साईटवर देखील काही जाहिराती दिसत असतील.
या जाहिराती गुगल एडसेन्सद्वारे प्रोव्हाईड केल्या जातात.आणि त्यातून मग साईटचा खर्च निघत असतो.
अर्थातच फक्त जाहिरात दिसली आणि त्यातून हजारो रुपये मिळाले असे होत नाही,
त्याचं आणखी वेगळं आणि फार अवघड गणित आहे.
फक्त हे बेसिक समजून घ्या की हे काम कसं करतं आणि का करावं लागतं.
आता याला जोडून तुमची टीव्ही वाली जाहिरात उदाहरण म्हणून पाहा.
जर तुम्ही टीव्हीची चर्चा करत होता आणि तुम्हाला कारची जाहिरात दिसत राहिली
तर तुम्ही टीव्ही सोडून तुमचा निर्णय बदलून कार विकत घेणार आहात का?
किंवा इथे काहीही घेता येईल विमान ट्रेन हॉलिडे पॅकेज कपडे शूज,तुमची गरज काय आहे?
टीव्ही तर मग ग्राहकराजाच्या पुढ्यात तेच पेश केले जाणार ज्याची त्याला गरज आहे.
हे सगळं असं काम करतं,आशा आहे तुम्हाला हे समजलं आहे.
यातल्या कसोट्या आणि धोके?
एवढ्या वर्षात मोबाईल कंपन्यानी तुमचा वैयक्तिक काय डाटा लिक केला? तो कुठे वापरला हे अजून तरी सिद्ध झालेलं नाही.म्हणजे असं की मिसयूज काय केला? तुम्हाला आजवर काय खड्डा पडला.नुकसान झालं? उदाहरणार्थ तुमचे फोटो कुठेतरी वापरले,तुमचे बँक खाते रिकामी केले.पासवर्ड चोरले,असल्या केसेस अजून तरी कधी दिसलेल्या नाहीत.तसे कधी होत नसते.कारण वर म्हणल्याप्रमाणे ग्राहक राजाला वस्तु विकून कंपन्याना नफा कमवायचा आहे.कोंबडी कापून व्यवसाय संपवून टाकायचा नाही.
ही गोष्ट चीन च्या संदर्भात सुद्धा लागू आहे.त्यावेळीही लोकाना वेड्यात काढलं गेलंय. टिकटॉकने हे केलं ते केलं. त्यावेळी एक्स्पर्ट वाळूत तोंड खुपसून बसले होते.सामान्य लोकांचा डेटा काय असतो? तो इतर देश कशाला वापरतात ? त्यातून तुमच्यावर अणुबॉम्ब टाकणार होते का? तुम्हाला लुटणार होते का? एवढे उथळ छपरी चाळे “देश” करत नसतात मग तो चायना का असेना,हा सगळा उथळ देशभक्तीचा दर्जेदार नमुना होता.हा बावळटपणा सगळीकडे करून ठेवलेला आहे.म्हणजे सर्वच देशात.हे मुद्दाम केले जाते.एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी आणि नागरिकांना मूर्ख बनविण्यासाठी.
तुम्ही डेटा आहात
वाईट हे की आपल्याकडे त्यात ज्याना यातली माहिती आहे. जे या क्षेत्रात काम करतात तेही काहीच बोलत नाहीत,पब्लिकला खरं सांगत नाहीत,हे सगळं कशाला असतं सरळ सोपी गोष्ट. हे मार्केट आहे.तुम्ही डेटा आहात.तुमचे बिहेवियर पॅटर्न मशीनला माहीत असावं हा सगळा खटाटोप आहे.”मार्केटसाठी” हा सगळा बाजार आहे.या आहेत कसोट्या.
तुम्ही टिकटॉक वापरत होता? याचा अर्थ तुम्ही चीनला तुमचा डाटा दिलेला आहे.तो त्यांच्याकडे सर्व्हरवर आजही असेल.काय केलं तुमचं ? मी स्वत: टिकटॉक वापरत होतो.आजवर माझ्या खात्यातून काहीही गेलेलं नाही.माझं एक पैशाचं नुकसान झालेलं नाही.तसं इतर कुणाचेही झालेलं नाही.देशभक्ती सुरक्षा याच्या भीतीखाली बागुलबुवा उभा केला गेला.
टिकटॉकचा बागुलबुवा
टिकटॉकचा बागुलबुवा हा टिक टॉक सर्वात जास्त आणि प्रचंड वेगाने लोकप्रिय होत होते आणि त्यातही त्यावर भाजप विरोधी कंटेंट जास्त येवू लागला होता म्हणून बॅन केलं असं मला वाटतं,यात देशभक्ती देशाची सुरक्षा किंवा चीनला धडा शिकवणे असले काहीही दिसून येत नाही,तसे ते खरे असते तर चीनकडून आपले सैनिक मारले गेले असले आणि आपली शेकडो एकर जमीन चीनने बळकावली असली तरीही दिल्ली-मेरठ रेल्वेचे काम चीनलाच पुन्हा देण्यात आले आहे.हा कसला सर्जिकल स्ट्राइक आहे चीनचे कंबरडे मोडण्याचा? हे फक्त त्यांनाच माहीत असावे,ती बातमी इथे पाहा.
समजा आपण असं गृहीत धरूया टिकटॉककडे आपला सर्वच प्रकारचा डेटा गेला आहे.फारच टोकाच्या स्थितीपर्यंत चीनने काय केले असते? सगळ्या नागरिकांचे बँक खाती खाली केली असती? ब्लॅकमेल केले असते? पैसे उकळले असते? युद्ध केलं असतं बरं हे युद्ध कोणत्या बेसवर? चीन अमेरिकेला मागे सारत महासत्ता होऊ पाहत आहे.तो हे पाकीटमार धंदे करू शकतो का? एवढी बेसिक गोष्ट लक्षात घेता येत नाही का? या कसोट्या आपण पडताळून पाहिल्या का? का नाही पाहिल्या? चीनने यात आपला डाटा इतर कंपन्यांना जाहिरातीसाठी विकला असेल यात काहीही दुमत नाही,ते रीव्हेन्यू मॉडेल.
आपला डेटा आपणच निवडून दिलेल्या सरकारने काही पैशासाठी खाजगी कंपन्यांना विकला
आता हे जर डेंजर आहे भीतीदायक धोकादायक आहे तर मग
आपला डेटा आपणच निवडून दिलेल्या सरकारने काही पैशासाठी खाजगी कंपन्यांना विकून मोकळे झाले आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?
इथे पाहा – मोदी सरकारने आपला डाटा विकून कमावले कोट्यवधी रुपये.
या अगोदर आपला डाटा वोटर आयडी कार्ड/पॅनकार्ड/आधार कार्ड याच्यात जोडलेला आहे.आणि मध्यंतरी झालेली गंमत आरोग्यसेतू एप ज्यातून करोडो लोकांचा डाटा गेला आणि नंतर सांगण्यात आलं की सरकारचा आणि या एपचा काही संबंध नाही.तर हे सगळं असं चालू आहे,थोडक्यात नागरिकांचा डाटा निवडून दिलेल्या सरकारकडे देखील सुरक्षित नाही. हे यातून स्पष्ट होते.
यातले धोके –
संशयास्पद एप्स,वेब पोर्टल्स साईट्स/तुमचा डाटा चोरू शकतात.तुमच्या बँक खात्याची आणि पासवर्डची डिटेल्स चोरू शकतात.तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात.तुमचे न्यूड फोटो/व्हिडिओ चोरून पोर्नसाईट्सला विकू शकतात.(हे न्यूड फोटो/व्हिडिओ ते काढत नाहीत,तुम्हीच काढून गॅलरीत ठेवलेले असू शकतील,पुन्हा हेच की घाबरू नका आणि असले काही उद्योग करू नका) काही कसेस मध्ये काही एप्सचे कॅमेरे तुमचे खाजगी क्षणांचे चित्रण सुद्धा तुमच्या नकळत करू शकत असतील.करतील.तसे करता येवू शकते.
यासाठीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे.संशयास्पद एप्स डाउनलोड करू नयेत.त्यांचे रीव्ह्यू अगोदर वाचून काढावेत.शक्यतो जास्त डाउनलोड संख्या असणारे एप्स डाउनलोड करावेत.अर्थातच जर एखादे एप नवे असेल तर डाउनलोड संख्या कमी असू शकते. तेव्हा त्यांच्यावर अन्याय नको,आणि तुम्ही एखादी चांगली सर्व्हिस भीतीने घेऊ नये त्यापासून वंचित राहावं असेही नको.
काही महत्वाच्या गोष्टी
यामुळे एप्स घेतल्यावर काही गोष्टी करायच्या.सिक्युरिटीमेजर्स चेक करायचे,आपण एप कशासाठी घेतो आहोत?आपल्याला त्याची खरच गरज आहे का? आपण ते वापरणार आहोत का? कित्येक एप आपण कितीतरी महीने उघडून पाहिलेलेच नसतात,अशा एपची गर्दी कशाला? एपवर काही संशयास्पद हालचाल दिसते का? आपल्या फोनमधील काही गोष्टी विचित्रपणे बिहेव करू लागल्या आहेत का? या गोष्टीबद्दल आपण सजग असायला हवं.
मोबाईल हॅक होतो डाटा चोरला जातो असं ठासून बोलणारे ईव्हिएम बद्दल मात्र नेहमी ते कधीच हॅक होत नाही ते पावन पवित्र आहे असा पवित्रा घेताना अनेकदा दिसले आहेत.
याबद्दल काळजी घेण्यासाठी काय करायचं यासाठी हे दोन लेख वाचून काढा.
डिजिटल युगातली गुन्हेगारी आणि घ्यावयाची काळजी
मोबाईल हेरगिरी
सरकारी पातळीवर काय करता येईल?
सरकारच स्वत: नागरिकांचा डेटा विकत आहे,पण तरीही सरकारने याबाबत काही कडक निर्बंध नियम जारी करावेत,युजरचा डेटा त्याच्या परवानगीशिवाय कुठेही वापरण्यासाठी युजर कडून संमती मिळवणे बंधनकारक केले पाहिजे.इथं एक गोष्ट लक्षात घ्यावी.तशी ती प्रायव्हसी पॉलिसी मध्येच येत असते म्हणा.परंतु हा मुद्दा खाजगी गोष्टी स्पेसिफीकली युजरचे फोटो/व्हिडिओ या संदर्भात आहेत.याशिवाय बँकखाते इत्यादि संवेदनशील गोष्टीत जर छेडछाड केली.डेटा चोरला तर यासाठीची नुकसानभरपाई आणि शिक्षा जबर असावी.कंपनीवर कायमस्वरूपी बॅन असावं.कडक शिक्षा आणि डिजिटल व्यवसाय करण्यास प्रतिबंध असावा,या गोष्टी करणे सोपे आहे. आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे.
आशा आहे सरळ सोप्या भाषेत असणारा हा लेख तुम्हाला समजला असेल यातील महत्वाच्या गोष्टी समजल्या असतील त्या कशा काम करतात आणि यातून घाबरण्यापेक्षा सजग स्मार्ट कसे बनता येईल हे शिकायला मिळाले असेल.लेख आवडल्यास अनुकूल प्रतिकूल कोणत्याही स्वरूपातील.प्रतिक्रिया नक्की कळवा.आज घडीला माझे स्वत:चे दोन एप्स गुगल प्ले स्टोअर वर लिस्टेड आहेत.तुम्हाला योग्य नेमकी आणि सत्य माहिती देणे हा तुमचा अधिकार हक्क आहे आणि आमचे कर्तव्य.
11/01/2021
हेही वाचा.. डिजिटल युगातली गुन्हेगारी आणि घ्यावयाची काळजी
हेही वाचा.. मोबाईल हेरगिरी
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on JAN 01, 2021
Web Title – new-whatsapp-policy-2021-social-media-platform