आम्ही भारतचे लोक we the people of india
दिडशे वर्षाच्या गुलामीतून १९१४७ साली देश स्वतंत्र झाला.आपण स्वतंत्र झालो.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताची लोकशाही पुरस्कृत राज्यघटना लिहिली.समता,स्वातंत्र्य,बंधुता आणि न्याय या वैश्विक मुल्यांवर आधारित आपली राज्यघटना म्हणजे आपलं भारतीय संविधान.
आपल्या सर्वांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा!
त्याद्वारे आपण राष्ट्रीय एकात्मता,नागरिकांचे मुलभूत स्वातंत्र्य जसे कि सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय,मनाप्रमाणे व्यक्तिगत धर्म धारण,श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य,अभिव्यक्त होण्याचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आणि पर्यायाने देशाची एकता अबाधित राखण्याचे आणि समान संधी उपलब्ध करून देण्याचे आव्हान पेलले आहे ते आजतागायत आपण साध्य करून घेतो आहोत.हळूहळू काही परिणामकारक उद्दिष्ट्ये पूर्णत्वास येतीलही.
भारतीय राज्यघटनेची सुरुवात जीला ‘उद्देशिका’ म्हणले जाते तीत “आम्ही भारताचे लोक” या वाक्याने सुरवात व्हायला हवी असा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचाच आग्रह होता.हा मुद्दा जेव्हा त्यांनी घटनासमितीमध्ये मांडला तेव्हा समितीमधील अनेक सदस्यांनी यावर आक्षेप घेत ते “देवाच्या नावाने” असावे अशी आग्रही भूमिका घेतली काही सदस्यांनी विविध देवदेवातांची नावेही सुचविली होती,परंतु डॉ.बाबासाहेब मात्र आपल्या मुद्यावर ठाम राहिले.भारतीय संविधान हे विशिष्ट देव-धर्म आणि त्यांच्याविचारसरणीवर आधारित नसून सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.सरतेशेवटी हा मुद्दा मतदानाला ठेवला गेला आणि ‘देव विरुद्ध लोक’ यात लोकांचा विजय झाला.लोकशाहीचा विजय झाला.
भारतीय संविधान हे देशाप्रती म्हणजे भारतीय लोकांप्रती अपर्ण करण्यात आले.हे अभूतपूर्व होते.
आपली राज्यघटना हि जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हणून गौरविली जाते ती याच वैशिष्ट्यांसाठी.
”ठेविले अनंते तैसेची रहावे“ या उक्तीप्रमाणे न ठेवता घटनाकारांनी आपली राज्यघटना ही लवचिक ठेवली आहे.
ही त्यांची भविष्यातील आधुनिक भारताची जडणघडण ओळखणारी दुरदृष्टीच होती असे म्हणले पाहिजे.
काळानुरूप आपण त्यात बदल करू शकतो अर्थात राज्यघटनेत करावयाचे बदल हे फक्त त्यातील कलम आणि उपकलम यातच करायची सोय आहे,घटनेच्या मूळ चौकटीला हात लावता येणार नाही अशी व्यवस्था घटनाकारांनी करून ठेवली आहे ज्यामुळे भारतात लोकशाही आजही भक्कम आहे अभेद्य आहे.
हे नागरिकांनीही लक्षात घ्यायला हवे कि घटना दुरुस्ती होते तेव्हा नेमके काय होते तर काही कलमे जर गरजेची नसतील किंवा सद्यस्थितीत त्यांची परिणामकारकता आणखी वाढवायची असेल तर तशी दुरुस्ती करावी लागते.तसेच यासाठी संसदेत २/३ बहुमत सिद्ध करावे लागते.दुरुस्ती याचा अर्थ घटना बदलली असा होत नाही.वस्तुतः घटनेचा मूळ ढाचा म्हणजे मसुदा बदलता येत नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे.यामुळेच भारतीय लोकशाही अजून अभेद्य टिकून आहे.आज ६५ वर्षे आपला देश निर्धोकपणे कोणत्याही अडथळ्याविना प्रगतीपथावर मार्गक्रमण करतो आहे.हे या लोकशाही पुरस्कृत राज्यघटनेमुळे,यादरम्यान अनेक पेचप्रसंग आले,आणले गेले.७५ सालची आणीबाणी,९२ चे बाबरी पतन कांड ९३ चे बॉम्स्फोट,जातीय दंगली,गुजरात धार्मिक दंगल हे काही ठळक प्रसंग देशात घडले आणि ते लोकशाहीने मनावर ओरखडे सोसत पचविले.
अशा घटना भविष्यात आणखी उद्भविण्याची शकता नाकारता येत नाही.त्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार असायला हवे.डॉ.बाबासाहेब म्हणत लोकशाही म्हणजे केवळ प्रजासत्ताक किंवा संसदीय कार्यप्रणालीचे सरकार नसून सहजीवनाने राहण्याची पद्धती आहे. अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची व्याख्या “लोकांनी,लोकांचे,लोकांसाठी चालविलेले शासन” अशी तर डॉ.बाबासाहेबांनी “लोकांच्या सामाजीक आणि आर्थिक जीवनात रक्तविहीन मार्गाने क्रांतीकारक बदल घडवून आणणारी शासन व्यवस्था“अशी केली आहे.
लिंकन याच्या व्याख्येत आपल्या देशाचा विचार करता पुरेशी सुस्पष्टता दिसून येत नाही बाबासाहेब नेमके बोट ठेवून बदल आणि दृष्टीकोन सुचवतात.आपल्या शिक्षण व्यवस्थेत यातही सावळा गोंधळ असून शालेय पाठ्यक्रमात आपल्याला पहिली व्याख्या जाणीवपूर्वक शिकविली जाते.जी अर्थात चुकीची आहे.लोकशाही हि भारतीय नागरिकांच्या मुलभूत हक्क अधिकारांचे संरक्षण करणारे कवचकुंडल आहे.देशाची मालक आणि पहिली हकदार हि इथली सामान्य जनता आहे.त्यामुळे या देशात कोणत्याही गोष्टीत बदल करावयाचे असतील तर जनतेची भूमिका हीच अंतिम असते.त्यासाठी ती आपले प्रतिनिधी म्हणून काही लोकांना निवडून संसदेत पाठवते.
यासाठी निवडणुका आणि मतदान नव्हे तर “मताधिकार” या दोन प्रमुख माध्यमाद्वारे हि प्रक्रिया पार पाडली जाते.
सत्ता मिळविण्याचा स्त्रोत हा प्रामुख्याने केवळ जनता आहे.म्हणजे सगळी भिस्त ही जनतेवरच अवलंबून आहे.
यासाठी In a Democracy The People get the Government they Deserve.असे बोलले जाते.
त्यामुळे मतधिकार बजावणे हा किती महत्वाचा आणि गंभीर मुद्दा आपल्या जीवनाशी निगडीत आहे याची कल्पना येते.
लोकशाहीत धर्मनिरपेक्ष सरकार म्हणजे
“सरकारचा कोणताही धर्म असणार नाही.तसेच सरकार कोणत्याही एका धर्माशी बांधील असणार नाही.सरकार हे निरपेक्ष असेल.” असा खरा अर्थ आहे.
याचा अर्थ ते देशातील सर्व नागरिकांचे रक्षण करताना काळा-गोरा, हिंदू-मुस्लिम, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता निरपेक्ष भावनेने सर्व नागरिकांचे रक्षण करेल.मदत करेल व त्यांच्या सामाजीक आर्थिक प्रगतीसाठी कटिबद्धता स्विकारून कार्य करेल.परंतु आपल्यादेशातील राजकारण्यांनी या धर्म निरपेक्षतेचा अर्थ म्हणजे “सर्वधर्म समभाव” असा उलटा लाऊन अनेक घोळ घालून ठेवले आहेत त्यामुळे सरकार कुणाचेही असो या सूत्रावर सर्वांनी देशाची धर्मनिरपेक्षताच बदलवून टाकली.आणि भारत हे धर्म निरपेक्ष राष्ट्र न बनता सत्तेवर असणाऱ्या लोकांचे उदारमतवादी सहिष्णू वगैरे बिरूद मिरवून धोरण राबविणारे राष्ट्र बनले.
लोकशाहीत जसे सरकार मताधिक्क्याने सत्तेवर येते तसे एक प्रबळ विरोधी पक्ष असणेहि गरजेचे असते.
सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याची महत्वाची भूमिका हि विरोधी पक्षाची असते.
आणि विरोधी पक्षाच्या भूमिकेची कदर करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य हे सत्ताधारी पक्षाचे आहे.
लोकशाही टिकविण्यासाठी आणि निरोगी राखण्यासाठी दोघांमध्ये सामंजस्याच वातावरण असणे गरजेचे आहे.
देशहितापेक्षा पक्षिय हिताला महत्व देणे हे लोकशाहीला दुरावस्थेकडे घेऊन जाणारे आहे.
आज देशात नेमकी हीच उलट परिस्थिती निर्माण झाली आहे.
सत्तेवर असलेला पक्ष हा भगवी झूल पांघरून अनेक जात-धर्मात तेढ निर्माण करण्यासारखे निर्णय घेतो आहे.हे इथे प्रकर्षाने नमूद करावे लागेल.
जर आपल्या देशात लोकशाही नसती तर कल्पना करा या देशाची काय अवस्था सत्तेत असणाऱ्या कोणत्याही सत्ताधारी पक्षांनी केली असती.
त्यामुळे हि लोकशाही आणि त्याअनुषंगाने मिळालेली हि अधिकाराची कवचकुंडले सामान्य नागरिकांनी प्राणपणाने जपली पाहिजेत.कोणत्याही जाचक बंदी विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा घटनादत्त अधिकार सामान्य जनतेला आहे.राजकीय पक्ष आणि सत्ताधारी पक्षानेही हे लक्षात घ्यायला हवे कि आपण लोकशाहीत राहतो आहोत.आणि म्हणून सर्वाना लोकशाहीचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी हि सारखीच आहे.
भले आपल्या मनात आपल्याला इथे हिटलरशाही,हम करे सो कायदा वगैरे आणण्याची राबविण्याची स्वप्ने पडत असतील तशी स्वप्ने पाहण्यात काही हरकत नाही पण ती कृतीत उतरविणे हे बेकायदेशीर आहे.
आणि हे “देशद्रोही” कृत्य आहे हे लक्षात घ्यावे.
त्यामुळे लोकशाही हि सर्वांसाठी एक अपरिहार्य व्यवस्था आहे.
त्याशिवाय कुणालाही गत्यंतर नाही.
भले तिच्याबद्दल कितीही नाके मुरडा नकोशी म्हणा आणि डोळे मिटून हिटलरशाहीची फॅसिझमची स्वप्ने पहा.
परंतु जगण्यासाठी आणि आपल्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी सर्वाना लोकशाहीशिवाय पर्यायच नाही.
ON RECORD: डॉ. आंबेडकरांच्या संविधान निर्मिती योगदानाबद्दल
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 26 , 2020 08:03 AM
WebTitle – We The People of India