मुंबई: आयपीएल चा इतिहास हा अनेक चमकदार खेळाडूंनी भरलेला आहे, पण यावेळीच्या लिलावात अवघ्या 13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजस्थान रॉयल्सने या तरुण फलंदाजासाठी तब्बल 1.10 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले आहे. आयपीएलमध्ये स्थान मिळाल्यानंतर वैभव सूर्यवंशी हा आता सर्वांत तरुण करोडपती खेळाडू ठरला आहे.
युएईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल मेगा लिलावामध्ये वैभवची किंमत 30 लाख रुपयांच्या बेस प्राइसपासून सुरू झाली. मात्र राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये वैभवसाठी जोरदार चढाओढ झाली होती मात्र शरतेशेवटी राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटी रुपयांची अंतिम बोली लावत हा खेळाडू आपल्या संघात सामील करून घेतला.
13 वर्षांचा वैभव सूर्यवंशी कोण आहे?
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील मोतीपूर गावचा रहिवासी असलेला वैभव सूर्यवंशी एक उत्कृष्ट डावखुरा फलंदाज आहे. त्याने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंडर-19 यूथ टेस्ट सामन्यात फक्त 58 चेंडूत शतक झळकावत विक्रम रचला होता. भारताकडून यूथ टेस्टमध्ये सर्वांत जलद शतक करणारा वैभव हा खेळाडू ठरला आहे.
वडिलांनी सांगितला मुलासाठीचा संघर्ष
वैभवचा प्रवास हा संघर्षांनी भरलेला आहे. त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी सांगितले की, मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी 2021 मध्ये त्यांच्या गावातील शेती विकली होती. “आमच्या मुलाला क्रिकेटमध्ये मोठे स्थान मिळावे यासाठी आम्ही आर्थिक अडचणी झेलल्या. आम्हाला आमच्या मुलावर विश्वास होता, त्यामुळेच त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व केले,” असे संजीव सूर्यवंशी यांनी सांगितले.
12 व्या वर्षी रणजी पदार्पण
वैभवने पहिल्यांदा लोकांचे लक्ष वेधले तेव्हा तो फक्त 12 वर्षांचा होता. बिहारकडून खेळताना त्याने रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे त्याने त्यावेळी अनेकांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळेच त्याला भारतीय अंडर-19 संघात स्थान मिळाले.
अजूनही कुटुंब आर्थिक अडचणीत
वैभवचे वडील सांगतात की, “मुलासाठी शेती विकल्यानंतरही आमच्या कुटुंबाला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मात्र आता आयपीएलमुळे परिस्थिती बदलेल अशी आम्हाला आशा आहे.”
वयावरून झाले वाद, वडिलांचे स्पष्टीकरण
वैभव सूर्यवंशीला 1.10 कोटी रुपयांची रक्कम मिळाल्यानंतर काही जणांनी त्याच्या वयावर शंका उपस्थित केली. मात्र, त्याच्या वडिलांनी बोन टेस्ट रिपोर्ट्स सादर करत त्याच्या वयाचा संभ्रम दूर केला.
आयपीएलमधील सर्वांत तरुण खेळाडूंपैकी एक
आयपीएलमध्ये खेळलेल्या काही सर्वांत तरुण खेळाडूंची नावे अशी आहेत:
प्रयास रे बर्मन: 16 वर्षे 157 दिवस
मुजीब उर रहमान: 17 वर्षे 11 दिवस
रियान पराग: 17 वर्षे 175 दिवस
सरफराज खान: 17 वर्षे 177 दिवस
अभिषेक शर्मा: 17 वर्षे 177 दिवस
वैभवची मोठी संधी
राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना जर वैभवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले, तर तो आयपीएल इतिहासातील सर्वांत तरुण खेळाडू ठरेल.
शुभेच्छांचा वर्षाव
वैभव सूर्यवंशीच्या संघर्षमय प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली असून त्याच्या यशासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 26,2024 | 19:44 PM
WebTitle – vaibhav-suryavanshi-ipl-13-year-old-crorepati-struggle-story