अयोध्या: अयोध्या राम मंदिर मध्ये स्वच्छता करणाऱ्या बीए विद्यार्थिनीवर 9 जणांनी केलेला सामूहिक बलात्कार! 5 जण अटकेत : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिर मध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या 20 वर्षीय युवतीने 9 जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. पीडिता बीएच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. अयोध्येच्या कॅंट पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, 16 ते 25 ऑगस्ट दरम्यान तीन वेगवेगळ्या प्रसंगी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. कॅंटचे प्रभारी निरीक्षक (एसएचओ) अमरेंद्र प्रताप सिंह यांनी सुरुवातीला सांगितले की, 2 सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आणि 3 आरोपींना अटक करण्यात आली.
विद्यार्थिनी अयोध्येत राम जन्मभूमीवर स्वच्छता कर्मचारी
यानंतर, शुक्रवारी दुपारी अयोध्येचे पोलिस अधीक्षक (शहर) मधुवन सिंह यांनी आणखी दोघांना अटक झाल्याचे स्पष्ट केले आहे. सिंह यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या लोकांची ओळख वंश, विनय, शारिक, शिवा आणि उदित अशी झाली आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, “पकडण्यात आलेल्या लोकांपैकी तीन जणांवर एफआयआर दाखल झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच अटक करण्यात आली आणि उर्वरित दोघांना नंतर अटक करण्यात आली आहे. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.” पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडित महिलेने असा दावा केला आहे की, “ती अयोध्येत राम जन्मभूमीवर स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते आणि एका स्थानिक महाविद्यालयात बीएच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे.”
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 127(2) (बळजबरीने कैद करणे),
75 (लैंगिक अत्याचार) आणि 70(1) (सामूहिक बलात्कार) अंतर्गत सात जणांवर आणि दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
अयोध्याची गँगरेप पीडिता अखिलेश यादव यांना भेटली, म्हणाली- एफआयआर परत घेण्यासाठी दबाव आणला जातोय
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 14,2024 | 10:48 AM
WebTitle – A BA student who was cleaning the Ram temple in Ayodhya was gang-raped