राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेलं खरमरीत उत्तर (पत्र)
देशाच्या राजकारणात असे पहिल्यांदाच घडत आहे की एक राज्याचे राज्यपाल सत्ताधारी पक्षासाठी वाट्टेल त्या थराला जाऊन राजकारण करत आहेत. वास्तविक राज्यपाल हे घटनात्मक पद असून राज्यघटनेला अनुसरुन राज्य चालते की नाही, हे पाहणे राज्यपालांचे कर्तव्य असते,राज्यघटनेत हिंदुत्ववाद नाही,आणि त्यानुसार देशही चालत नाही.
हीच आठवण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्या पत्रात केली असून त्यात आवर्जून भारताच्या संविधानात ठळकपणे उल्लेख असणाऱ्या
“धर्म निरपेक्षतेचा” उल्लेख करून प्रश्न विचारण्यात आला आहे की भारतीय राज्यघटनेतील सेक्युलर शब्द आपल्याला मान्य नाही काय?
एखाद्या राज्यपालास असा प्रश्न विचारणे गंभीर आहे. जर तशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर राज्यासाठी आणि देशासाठी सुद्धा हे चिंताजनक आहे.
राज्यपाल पदाबाबत थोडक्यात माहिती घेऊया
राज्यपाल हा राष्ट्रपतींच्या अधिपत्राद्वारे नियुक्त केला जातो.
कोणतीही भारतीय व्यक्ती जीचे वय 35 वर्षे पूर्ण असेल अशी व्यक्ती राज्यपाल पदास पात्र असते.
त्यासाठी इतर कोणतीही शैक्षणिक अट लागत नाही.मात्र राज्यपाल हा राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करू शकतो.
राज्यपाल पद साधारणपणे ज्या दिवशी नियुक्ती होते त्यादिवसापासून पुढे पाच वर्षे गणले जाते.
ज्याअर्थी राज्यपाल हे पद राष्ट्रपतींच्या अधिन आहे. त्यांच्या मर्जीने नियुक्त केले गेले आहे.
त्याअर्थी हे पद संवैधानिक आणि भारतीय घटनादत्त पदांच्या कक्षेत आहे.
त्याचा कोणत्याही राजकीय पक्षासोबत संबंध असू शकत नाही.असे संकेत आहेत.
याचाच अर्थ असा की राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य असू शकत नाही.याशिवाय राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही.अशी व्यक्ती जेव्हा राज्यपालपदाची शपथ घेईल त्या दिवसापासून त्याने आपली *सभागृहतील जागा रिक्त केली आहे असे मानण्यात येईल.
राज्यपालांची शपथ –
राज्यपालांनी शपथ घेताना —
मी (……………………………… ) राज्यपाल म्हणून (……………………………… ) राज्याची कार्य निष्ठेने पार पाडीन
आणि माझ्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायदा यांचे जतन,संरक्षण व प्रतिरक्षण करीन आणि मी स्वत:ला (……………………………… ) (राज्याचे नाव)
जनतेच्या सेवेस व कल्याणास वाहून घेईन.”
वरील शपथेवरून आपणास लक्षात येईल की राज्यपाल हा कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा संस्थेला बांधील नसून भारतीय संविधान आणि राज्यातील भारतीय नागरिक यांची सेवा करणे त्यांच्याशी निष्ठा राखणे हे काम राज्यपालांनी करायचे आहे.
संदर्भ – भारतीय राज्यघटना भाग सहा – राज्ये, कलम – 153 ते 159
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेलं पत्र
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) अनेकदा वादात सापडले आहेत.ते भाजपला मदत करतात असे काही लोकांचे मत आहे.त्यामुळे सोशल मिडियात त्यांच्याविषयी कायम चर्चा होत असते.
by टीम जागल्या भारत
कॉर्पोरेट्स शेती : कॉर्पोरेट्स कंपन्या चा भारतीय शेती वर डोळा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)