ट्विटर ने फेसबुक च्या नवीन थ्रेड्स अॅप अन मेटा प्लॅटफॉर्मवर खटला भरण्याची धमकी दिली आहे, Twitter threatens to sue Threads Elon Musk vs Mark Zuckerberg ट्विटरचे वकील अॅलेक्स स्पिरो यांनी फेसबुकचे मालक सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना पाठवलेल्या पत्राचा हवाला देऊन सेमाफोरने बातमी दिली आहे.मेटा सीईओ मार्क झुकरबर्गने एलोन मस्कच्या मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी थ्रेड्स अॅप लॉन्च केले आहे.
थ्रेड्स Threads हे मजकूर Text आधारित सोशल मीडिया अॅप आहे. हे ट्विटर सारखेच आहे. थ्रेड्स लॉन्च झाल्यानंतर फेसबुक चे संस्थापक मार्क झुकरबर्गने Mark Zuckerberg tweet एक ट्विट केलं ज्यामध्ये त्याने एलन मस्क Elon Musk ला ट्रोल केलंय असं म्हटलं जातंय.
मार्क झुकरबर्ग ने 11 वर्षात पहिल्यांदाच ट्विट केले आहे.त्याने याआधी २०१२ मध्ये ट्विट केले होते,
विशेष म्हणजे मार्क २००९ मध्येच ट्विटर जॉईन झाला होता. मार्क झुकरबर्गचे ट्विटर अकाउंट व्हेरिफाईड झालेले नाही.
आता थ्रेड्स लाँच केल्याने, एलोन मस्कने आपला निर्णय बदलला आहे ज्यामुळे गेल्या आठवड्यापासून गोंधळ सुरू आहे.
ट्विटरचे वकील अॅलेक्स स्पिरो यांचा पत्रात गंभीर आरोप
ट्विटरने आपल्या पत्रात गंभीर चिंता व्यक्त करत म्हटलंय की,
“मेटा,ट्विटरच्या व्यापार गुपिते आणि इतर बौद्धिक संपत्तीचा पद्धतशीर, हेतुपुरस्सर आणि बेकायदेशीर गैरवापर करण्यात गुंतला आहे,”
“ट्विटर आपल्या बौद्धिक संपदा अधिकारांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा मानस आहे आणि Meta ने ट्विटरच्या कोणत्याही व्यापार गुपिते किंवा इतर अत्यंत गोपनीय माहितीचा वापर थांबवण्यासाठी त्वरित पावले उचलावीत,” असे पत्रात पुढे म्हटले आहे.
स्पिरोने आपल्या पत्रात, मेटा वर ट्विटरच्या माजी कर्मचार्यांना कामावर ठेवल्याचा आरोप केला आहे.
या कर्मचाऱ्यांना “ट्विटरच्या व्यापार गुपिते आणि इतर अत्यंत गोपनीय माहितीचा एक्सेस होता “,
असे गुरुवारी प्रकाशित झालेल्या सेमाफोर अहवालात म्हटले आहे.
स्पर्धा चांगली आहे, फसवणूक नाही
“थ्रेड्स च्या टेक्निकल टीम मध्ये कोणीही माजी ट्विटर कर्मचारी नाही ,”
असं स्पष्टीकरण मेटा प्रवक्ते अँडी स्टोन यांनी आपल्या थ्रेड्स पोस्टमध्ये दिले आहे.
दरम्यान, ट्विटरचे मालक Elon Musk एलन मस्क यांनी, “स्पर्धा चांगली आहे,मात्र,फसवणूक नाही,”
असं म्हणत या बातमीच्यासंदर्भात एका थ्रेडवर उत्तर देताना स्पष्ट केलंय.
एलॉन मस्क गोंधळात
ऑक्टोबर 2022 मध्ये मस्कने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा ताबा घेतल्यापासून, ट्विटरने मास्टोडॉन आणि ब्लूस्की यांच्याशी स्पर्धा केली आहे.
थ्रेड्सचा युजर इंटरफेस, हा (ट्विटर), मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मशी कमालीचे साम्य असणारा आहे.
इलॉन मस्क यांनी गेल्या आठवड्यातच सांगितले होते की, एखाद्याचे ट्विट पाहण्यासाठी ट्विटर अकाऊंटची आवश्यकता असेल, म्हणजेच जर तुमच्याकडे ट्विटर वर खातं नसेल, तर तुम्ही कोणाचे ट्विट पाहू शकणार नाही. याबद्दल जागल्याभारत ने मागेच बातमी दिलेली होती,ज्यात यातील धोके,आणि एकाधिकारशाहीबद्दल इशारा देण्यात आला होता.आता असे दिसते आहे की थ्रेड्स लाँच केल्यानंतर एलॉन मस्क ने आपला विचार बदलला आहे, असं कळतंय की आता खाते नसतानाही कुणीही ट्विट पाहू शकतो.
एलॉन मस्क Elon Musk यांनी असेही म्हटले होते की ब्लू टिक्स असलेले वापरकर्ते दररोज 6000 पोस्ट पाहू किंवा वाचू शकतील, तर ब्लू टिक नसलेल्यांसाठी ही मर्यादा फक्त 600 पोस्टपर्यंत आहे. इलॉन मस्क म्हणाले की, ही एक तात्पुरती व्यवस्था आहे जी मोठ्या प्रमाणावर डेटा चोरी आणि यंत्रणेतील फेरफार रोखण्यासाठी लागू करण्यात आली आहे.नंतर त्यांनी हाही निर्णय बदलला होता.
थ्रेड्स अॅप बद्दल माहिती
इंस्टाग्रामच्या टीमने थ्रेड्स अॅप लाँच केले आहे. इंस्टाग्राम लोगो थ्रेड्स अॅप मध्येच दिसतो, त्यावर टॅप केल्यानंतर तुम्ही थेट Instagram खात्यात प्रवेश करू शकता. गुगल प्ले स्टोअर आणि ऍपलच्या अॅप स्टोअरवरून थ्रेड्स डाउनलोड केले जाऊ शकतात.दोन्ही अॅप एकमेकांशी कनेक्ट असून ब्ल्यू व्हेरीफाई युजर्स थ्रेडस वर सुद्धा तोच ब्ल्यू बॅज वापरू शकतात अशी सोय देण्यात आली आहे.
जर तुमच्याकडे इंस्टाग्रामवर आधीपासून ब्लू टिक असेल म्हणजेच तुमचे इंस्टाग्राम अकाउंट आधीच व्हेरिफाय केलेले असेल तर थ्रेड्स अकाउंट आपोआप पडताळले जाईल. तुम्ही Apple च्या App Store वरून थ्रेड्स मोफत डाउनलोड देखील करू शकता. थ्रेड्समध्ये, तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम आयडीने लॉग इन करू शकता.
Threads थ्रेड्समध्ये, तुम्ही 500 शब्द मर्यादेपर्यंत पोस्ट करू शकता ज्यात वेब लिंक्स, फोटो (एकावेळी 10 फोटोंपर्यंत) आणि एक मिनिटापर्यंतचे व्हिडिओ समाविष्ट असू शकतात. तुम्ही थ्रेड्समध्ये एखाद्याला ब्लॉक आणि फॉलो देखील करू शकता. जर तुम्ही एखाद्याला इंस्टाग्रामवर ब्लॉक केले असेल, तर ते थ्रेड्सवरही ब्लॉक राहतील.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 07 JULY 2023, 10:38 AM
WebTitle – Twitter threatens to sue Threads Elon Musk vs Mark Zuckerberg