प्रकाश आंबेडकर खरंच औरंगजेब च्या कबर वर नतमस्तक झाले? जाणून घ्या सत्य
प्रकाश आंबेडकर खरंच औरंगजेब च्या कबर वर नतमस्तक झाले? जाणून घ्या सत्य…महाराष्ट्रात सध्या औरंगजेब या मुद्यावर जोरात राजकारण सुरू आहे.औरंगजेब हा हॉट टॉपिक आहे.कदाचित 2024 ची निवडणूक औरंगजेब च्या मुद्यावरच लढवली जाईल की काय अशी शंका येण्याइतपत वातावरण तापवले जातेय, एवढंच नाहीतर खाजगी वस्तु असणाऱ्या मोबाईलवर औरंगजेब चे स्टेट्स ठेवले तर महाराष्ट्र पोलिस अटक करतायत,इतकच नाहीतर त्यावर गुन्हे दाखल होऊन दंगल पेटवण्याचा देखील काही समाजकंटक लोकांचा मनसुबा आहे.
दरम्यान,अॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबर वर फुले वाहिली आणि नतमस्तक झाले असा आरोप सतत मीडिया आणि काही समाजकंटक लोक करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करताना दिसतात.परंतु आपल्या देशातील विश्वासार्ह(?) मिडिया आणि सोशल मिडियातील आरोप बाजूला ठेवून वस्तुस्थिती जाणून घेतली तर वेगळेच चित्र समोर येते.
खरं तर आपल्या देशातील गोदी मिडिया विश्वासार्ह राहिलेली नाही.अनेक लोकांवर खुद्द न्यायालयाने ताशेरे ओढलेत,अनेक मोठे ? पत्रकार माफी मागून शिक्षेतून सूट मिळवून पत्रकारिता करत आहेत.अशावेळी या मिडियावर भरवसा ठेवणे म्हणजे दोन हजाराच्या नोटेत चीप असल्याची खोटारडी बातमी खरी मानून स्वत:ला वेड्यात काढून घेणे.
चला जाणून घेऊ नेमकं काय घडलं,दोन फोटो आहेत,त्यातून चित्रं स्पष्ट होईल.
फोटो क्रमांक 1 मध्ये अॅड.प्रकाश आंबेडकर फुले वाहताना दिसतात, ती कबर सुफी संतांची आहे.
फोटो क्रमांक 2 मध्ये अॅड.प्रकाश आंबेडकर उभे असलेले दिसतात ती कबर औरंगजेब ची आहे.
औरंगजेब चं स्वत:साठी मृत्युपत्र
औरंगजेबची कबर उन्हात बांधलीय,म्हणजे त्याला धड छप्पर देखील नाही.म्हणजे आपल्याकडे म्हटलं जातं अमुक तमुकचं घर उन्हात बांधूया तर औरंगजेबची तर कबरच उन्हात आहे.याचाही एक किस्सा आहे.औरंगजेब हजरत ख्वाजा मखदूम सय्यद शाह जैनुद्दीन दाऊद हुसेन शिराजी बैस यांना गुरु मानत असे त्यामुळे त्यांच्या शेजारी आपली कबर असावी अशी त्याची इच्छा होती.
औरंगजेब ने स्वत:साठी मृत्युपत्र लिहिलंय ते इंटरेस्टिंग आहे.शेवटच्या वेळी त्याच्याकडे 350 रु,उरलेले असं म्हणतात, त्यातील केवळ 14:50 साडेचौदा रुपये माझ्या कबरीवर खर्च करा असं त्याने मृत्युपत्रात लिहिलंय.माझी कब्र अतिशय साधी,जशी सामान्य लोकांची असते तशी असावी,ती केवळ मातीची असावी अन त्यावर केवळ एक सब्जा चं झाड असावं असंही त्याने लिहून ठेवलं.हे साडे चौदा रुपये देखील त्याने शेवटी शेवटी जो टोप्या विणायचा नाद लागलेला त्यातून कमावले होते.350 रु त्याने गरिबांना वाटून टाकले.
एकूण कायतर औरंगजेब स्वत:ला सामान्य म्हणून दाखवत होता,टोप्या विणत होता,काही लोक इतरांना टोप्या घालत आहेत.हाही तेच करत होता.पण औरंगजेब चा शेवट खऱ्या फकिरीत झाला.साडे चौदा रुपयात निपटला.काही फकीर मात्र त्यांच्या साधेपणात अमाप पैसा खर्च करतात.असो आपल्या स्वराज्याचा शत्रूच तो,संभाजीराजांना हाल हाल करून मारलं हे सत्य विसरता येत नाही.औरंगजेब ला माफी नाही.पण माहिती असावी म्हणून ही जास्तीची माहिती.आणि खरी वस्तुस्थिती खरं सत्य वाचकांच्या समोर आणणं हे जागल्याभारत चं धोरण आहेच.
मुस्लिम कार्यकर्त्यांची सामूहिक प्रार्थना
मिळालेल्या माहितीनुसार,अॅड.प्रकाश आंबेडकर हे नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने खुलताबादला गेले होते.तिथं एक दर्गा आहे.
त्याचं नाव हजरत ख्वाजा मखदूम सय्यद शाह जैनुद्दीन दाऊद हुसेन शिराजी बैस ख्वाजा दर्गा
हजरत ख्वाजा मखदूम सय्यद शाह जैनुद्दीन दाऊद हुसेन शिराजी बैस ख्वाजा यांना मुस्लिम मान्यतेनुसार 22 वे ख्वाजा मानलं जातं.
वंचित बहुजन आघाडीत असंख्य मुस्लिम पदाधिकारी नेते कार्यकर्ते आहेत.जेव्हा अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यावर ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी वंचित बहुजन आघाडी पक्षातील खुलताबाद तालुका अध्यक्षांनी आणि औरंगाबाद मधील मुस्लिम कार्यकर्त्यांनी ‘अॅड.प्रकाश आंबेडकर / सूजात आंबेडकर यांच्या हस्ते चादर चढवू’ अशी सामूहिक प्रार्थना केली होती.काल त्या लोकांनी आग्रह केल्यानंतर अॅड.प्रकाश आंबेडकर हे दर्ग्यावर तसेच कार्यकर्त्यांच्या हस्ते चादर चढवायला गेले होते.
यात आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या दोन्हीही कबर एकच ठिकाणी आहेत.
त्यामुळे अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी एकाच वेळी या दोन्ही ठिकाणी भेटी दिल्या,
भेटी दरम्यान केवळ दर्ग्यावर चादर चढवली गेली तर दुसरीकडे औरंगजेब च्या कबर ला केवळ भेट देऊन पाहणी केली गेली.
जर नतमस्तक झाल्याचे फोटो व्हिडिओ असतील तर ते सोशल मिडियावर का दाखवले जात नाहीत?
औरंगजेब ची कबर उखडून टाकता येईल काय?
आपणही अनेक ठिकाणी भेटी देत असतो.ताजमहाल हा शाहजहान ने बांधलेला आहे,तिथं आपण सेल्फी काढतो.ही भेट आपल्याला आयुष्यातील अतिशय मौल्यवान भेट वाटते,म्हणून आपण ती अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करतो,ते क्षण फोटो व्हिडिओ मध्ये कैद करतो.इथेही वेगळं काही झालेलं नाही.
विशेष म्हणजे अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीच्या वेळी त्यांच्यासोबत संपूर्ण मीडिया तिथेच उपस्थित होताच,
मात्र गोदी मिडियाच तो,त्याने तेच पसरवलं ज्यामुळे लोकांना सत्य कळणार नाही,
आणि खोटी माहिती लोकांच्यात पसरवून आपले अजेंडे रेटणे सोपे होईल.
आता आणखी एक महत्वाचा मुद्दा अन प्रश्न उरतो की गेली दोन टर्म सत्ता भोगणाऱ्या भाजपला ही कबर उखडून टाकता येईल काय? तिचं अस्तित्व मिटवता येईल काय? केवळ धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण कशासाठी ? असेही देशात अन राज्यात नाव बदलण्याची फॅशन आहेच.सगळं मिटवण्याची फॅशन आहेच,मग ज्या व्यक्तीचे स्टेट्स ठेवल्याने अटक केली जातेय,त्या व्यक्तीची कबर का राखली जातेय? औरंग्याच्या अवलादी कुठून पैदा झाल्या असं खुद्द गृहमंत्री अन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटलं होतं,मग सरकार म्हणून त्यांची जबाबदारी काय? सरकारने कबरीला अभय का दिलेलं आहे? असे बेसिक प्रश्न सामान्य लोकांना देखील पडत आहेत.
आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?
अपने @jaaglyabharat के टेलिग्राम चॅनेल में एड हो जाए,ताजा अपडेट्स पाए ..
First Published by Team Jaaglya Bharat on 19 JUN 2023, 21:40 PM
WebTitle – Did Prakash Ambedkar really bow down at Aurangzeb’s grave? Know the truth