देशात दलितांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. महाराष्ट्र असो कर्नाटक असो गुजरात मध्यप्रदेश सगळीकडे अत्याचारांची मालिका सुरूच आहे. गुजारतेतील बनासकांठा नंतर पाटण येथे महीसागर जिल्ह्यातील एक तथाकथित उच्चजातीयवादी हॉटेल मालक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी दलित ऑटो रिक्षा चालकास एवढी अमानुष मारहाण केली की त्यात ऑटो चालकाचा मृत्यू झाला. हा रिक्शा चालक डाळ बाटी खाण्यासाठी हॉटेल मध्ये गेला होता. त्यावेळी त्याने डाळ कमी दिल्याचे निदर्शनास आणून दिले आणि डाळ मागितली त्यांनंतर रिक्षा चालक आणि जातीयवादी हॉटेल मालक व कर्मचारी यांच्यात वाद झाला. भांडणात जातीयवादी हॉटेल मालकाने आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी रिक्षा चालकास जातिवाचक शब्द उच्चारले त्यामुळे प्रकरण वाढलं मात्र यात जातीयवादी हॉटेल मालक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी रिक्शा चालकास एवढी मारहाण केली की त्याचे आतडे फाटून गेले यातच त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदविन्यात आला आहे.
गुजरात दलित रिक्शा चालकास मारहाण काय आहे प्रकरण जाणून घ्या?
लिंबडिया हे गुजरातच्या बाकोर प्रदेशातील गाव आहे. ही घटना या गावात घडली आहे. पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार, दलित समाजातील “ऑटो रिक्षा चालक वांकर 7 जून रोजी रात्रीचे जेवण करण्यासाठी हॉटेल मध्ये पोहोचले होते. जेवणानंतर त्यांनी हॉटेलच्या कर्मचार्यांना घरी घेऊन जाण्यासाठी अन्न पार्सल करण्यास सांगितले. जेव्हा वांकर जेवल्यानंतर बिल पे केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण पे केलेल्या बिलपेक्षा कमी प्रमाणात पार्सल देण्यात आलेलं आहे.तेव्हा पार्सल डब्यात भरलेल्या अन्नाचे प्रमाण कमी वाटल्याची तक्रार करत त्यावर वांकर यांनी आक्षेप घेतला की त्यांच्याद्वारे बिलाच्या रकमेपोटी भरल्या गेलेल्या रकमेपेक्षा खूपच अन्न पार्सल मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यावेळी हॉटेल मालक आणि कर्मचारी यांनी वाद घालायला सुरुवात केली आणि त्याच्याविरूद्ध जातीवादी शेरेबाजी करण्यास सुरवात केली. यानंतर त्यांनी वांकर यांना अमानुषपणे मारहाण केली,ही मारहाण इतकी अमानुष होती की ज्यामुळे त्यांचे आतल्या आत आतडे फाटून गेले होते.यातच रिक्षा चालक वांकर यांचा मृत्यू झाला.
एका पोलिस अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार,रिक्षा चालक वांकर हॉटेलमधून घरी परतले
आणि त्यांनी घडलेल्या या घटनेबद्दल कुटुंबाला सांगितले.
ते म्हणाले की, रात्री वांकर यांच्या पोटात प्रचंड वेदना होत असल्याची तक्रार केली,
त्यानंतर त्यांची पत्नी त्यांना महिसागरमधील सरकारी रुग्णालयात घेऊन गेली.
त्यानंतर वांकर यांना पंचमहल जिल्ह्यातील गोड्रा शहरातील रुग्णालयातशिफ्ट करण्यात आले.
तेथून त्याना वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात नेण्यात आले.
मृत्यूनंतर 302 हे हत्येचे कलम
पोलिस अधिकाऱ्यानी म्हटलं की रिक्षा चालक वांकर यांचे एसएसजी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यात आले,मात्र त्यांचा जीव वाचवता आला नाही. ते म्हणाले की, भारतीय दंड संहितेचा कलम -323 (इच्छापूर्वक दुखापत), 404 (मुद्दाम अपमान करणे), 506 (2) (गुन्हेगारी धमकी) आणि 114 (गुन्हेगारी धमकी) या दोघांविरूद्ध. (उकसावने व्यतिरिक्त), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधित) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत नोंदणीकृत आहे. यासोबत रिक्षा चालक वांकर यांच्या मृत्यूनंतर याप्रकरणी 302 हे हत्येचे कलम देखील जोडण्यात आले आहे.
दलित नेते आणि कॉंग्रेस पक्षाचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी आरोपींना “जातीयवादी गुंड” म्हटलंय,
आणि त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली.गुन्हेगारांना जर अटक झाली नाही,तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
दोन्ही आरोपींना अटक होईपर्यंत मृताचे शेवटचे संस्कार केले जाणार नाहीत.असे त्यांनी म्हटले आहे.
सावित्रीबाई फुले वसतिगृहात मोना मेश्राम तरुणीची हत्या अपडेट
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 11, JUN 2023, 15:45 PM
WebTitle – A Dalit auto rickshaw driver killed in gujrat by hotel owner and staff