शरद पवार यांनी आज 10-06-2023 शनिवारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी घोषणा केली. 1999 मध्ये शरद पवार आणि पीए संगमा यांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त पवार यांनी ही घोषणा करण्यात आली.शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
शरद पवार यांनी गेल्या महिन्यात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला होता, त्यानंतर पक्षाच्या सदस्यांनी तसेच इतर राजकीय नेत्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली होती.त्यानंतर निर्णयावर फेरविचार करण्यासाठी काही दिवस वेळ देण्याची विनंती त्यांनी केली होती.पवार यांच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या पॅनेलने 5 मे रोजी त्यांचा राजीनामा फेटाळून लावला होता आणि त्यांना पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली होती.आता त्यांनी मुलगी सुप्रिया सुळे यांच्या हाती पक्षाची सूत्रे सोपवली.
सुप्रिया सुळे यांची निवड का?
सुरुवातीच्या वर्षांत सुप्रिया सुळे यांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या घटनेपासून, आपल्या मुलीला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देत सांभाळणारे वडील म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जात होते. पक्षाच्या अनेक महत्वाच्या अन मोठ्या निर्णयांमध्ये सुप्रिया सुळे यांचा कायम सहभाग दिसून आला.
सुप्रिया सुळे यांनी अगदी कमी कालावधीत आपल्या राजकीय करियर मध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये प्रवास दौरे केले,अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहत आल्या. केंद्र सरकार आणि एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला अनेदक फटकारले.
पवारांनी गेल्या महिन्यात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची ऑफर दिली तेव्हा,
पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलेल्या भावनांच्या कल्लोळत सुप्रिया सुळे मात्र शांत दिसत असल्याचे चित्र होते,
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना अर्थात वडील शरद पवार यांना त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली होती.
सप्टेंबर 2006 मध्ये सुप्रिया सुळे राज्यसभा खासदार म्हणून निवडून आल्या,सुप्रिया सुळे यांचा सक्रिय राजकारणाचा प्रवास सुरू झाला.
नंतर 2009 मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा ताबा घेतला,
तरुणांना जोडण्यासाठी आणि राज्यभर जाळे निर्माण करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस ही तरुणींची शाखाही स्थापन केली आहे.
पवारांनी त्यांची मुलगी आणि अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक तरुण नेत्यांना तयार केले आहे.
ते आता पक्षाचे आघाडीचे नेते आहेत.बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, राष्ट्रवादी युवती काँग्रेस
आणि लोकसभा समन्वय, प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, राजस्थान आणि गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्याकडे ओडिशा, पश्चिम बंगाल,
शेतकरी आणि अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नंदा शास्त्री हे दिल्ली राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याची घोषणाही शरद पवारांनी केली.
या घोषणेनंतर, सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी पक्षाचे मनापासून आभारी आहे.
आणि पक्षाने आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा माझा निर्धार आहे.
अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही
शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही.
मात्र,अजित पवार या घोषणेने नाराज नसून त्यांना महाराष्ट्रासाठी काम करायचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे.
आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन!
अशा शब्दात अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
चित्रा वाघ आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार ट्विटर वाद
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 10, JUN 2023, 15:15 PM
WebTitle – Supriya Sule Nationalist Congress party became Executive President