राजकीय नेते राजकीय मुद्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात.राजकारणात राजकीय नेते राजकीय मुद्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात.कधी कधी त्याची परिणीती चर्चेचा स्तर ढळून खालच्या पातळीवर जाणारी ठरते,दुसरीकडे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती असा काहीतरी प्रकार काही नेते अधून मधून बोलत असतात.खासकरून पोट निवडणूक आल्यावर,ही राजकीय संस्कृती नेमकी काय आजवर काही स्पष्ट झालेलं नाही,भाजपच्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते जितेंद्र आव्हाड या दोघांमध्ये सध्या ट्विटरवर मोठा वाद पाहायला मिळत आहे.
चित्रा वाघ आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात ट्विटर वाद काय आहे?
जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा येथील 400 मुलांच्या धर्मांतर मुद्यावर पत्रकार परिषदेत बोलताना अपशब्द वापरले,ते म्हणाले
“जर कुणी धर्मांतर झालेल्या दोन मुलांची नावं सांगितली तर xx ढेंगेखालून जाईन ” असं वक्तव्य केल्याने
त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हटलं की “सत्ता गेल्याने डोक्यावर परिणाम झाल्याचे म्हटले,
तसेच अशा विकृतींना वेळीच आवर घाला आणि यांना येरवड्याच्या रूग्णालयात दाखल करा असेही म्हटले.
यावर प्रत्युत्तर देताना आव्हाड यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. आव्हाड ट्विट मध्ये म्हणाले,
ताई मी कुठली ही शिवी दिली नाही ….. फक्त मला munmy कोणाची तोंड उघडायला लावू नका … मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे … तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है …. हमाम मै सब नंगे है …….Baपूआर्मस्ट्राँग ….. आठवत असेल ना …ह्या पुढे स्वभावा प्रमाणे वागीन… एंटी चैम्बर … मधले “विनोद”…. आत्ता बस
आपण खूप खालच्या पातळी वार जाऊन बोलता … माझा स्वभाव आपल्याला माहित आहे …मी सहन करतो … पण मला त्यानी बोलावे ज्याचे हात स्वछ आहे …. अजून खूप बोलू शकतो …. बहिणीला संभाळून घेत आलो … पण……
हे ट्विट केल्यानंतर चित्रा वाघ भडकल्या,त्यांनी ट्विट करत म्हटलं “मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा गिधाड आहेस तू ..तुमच्यासारख्या गिधाडांना मी सोडणार नाही आणि आत्ताही तुम्हाला पुरून उरणार”
त्यांचं पूर्ण ट्विट खालील प्रमाणे
म्हणूनच तुमचा मेंदू सडल्याचं मी बोललेय जितेंद्र आव्हाड. आणि तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं.
माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय,
तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी यापूर्वीही अशा प्रसंगांना सामोरे गेलेय.
बहिण म्हणून चारित्र्य हनन करणारी तुमच्या सारखी औलाद महाराष्ट्रात जन्माली आली हेच दुर्देव आहे.
माझा राजकीय प्रवास तुमच्यासारखा नाही. तुम्ही जेव्हा ‘कुलू मनाली’ करत होता तेव्हा माझा संघर्ष सुरू होता.
परमारच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आणि त्यातून वाचवा म्हणत किती जणांचे किती वेळा पाय धरलेत हे सर्वांना माहिती आहे. तुमच्या बॉडीगार्डची आत्म हत्या होती की हत्या केली तुम्ही त्याची ही चौकशी व्हायला हवी तुमचा पीए कशामुळे तडीपार झाला, हेही लपून राहिलेलं नाही पण मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाहीये तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे ते पोलिसच बाहेर काढतील..
मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा गिधाड आहेस तू ..तुमच्यासारख्या गिधाडांना मी सोडणार नाही आणि आत्ताही तुम्हाला पुरून उरणार
खुद को इज्जतदार बोलते हुए इज्जत औरत की उतारते हैं. आपकी तृष्णा कभी तृप्त नहीं होती है, आप रावणकाल के भूखे और लंघे हैं. आप हमाम के बाहर भी नंगे हैं….
@Awhadspeaks..आव्हाड नाहीसचं तू हाड हाड आहेस आणि तीच तुझी लायकी आहे
राजकीय मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर तुझं थोबाड बंद ठेव माझ्या नादी लागू नकोस हे लक्षात ठेव”
Nikki Yadav Murder :निक्की यादव चा खून,फ्रीजमध्ये मृतदेह;संपूर्ण प्रकरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 09, JUN 2023, 13:18 PM
WebTitle – Chitra Wagh and Jitendra Awad had a heated Twitter debate