राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शुक्रवारी हा दावा केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी दिलेल्या माहिती नुसार या प्रकरणी दखल घेऊन मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ घेऊन मुंबईचे पोलीस प्रमुख विवेक फणसळकर यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.
शरद पवार यांना मिळालेल्या धमकी बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरून मिळालेल्या धमकी ची सरकारने गंभीर दखल घेतली आहे आणि मी स्वत: वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोललो आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेतले जात असून तपासा बाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि आम्ही सर्व त्यांचा आदर करतो. त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल. गरज पडल्यास सुरक्षा वाढवण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पोलिसांना सांगितले की, शरद पवार (८२) यांना फेसबुकवर एक मेसेज आला होता, ज्यामध्ये लिहिले होते की, “तुमचाही नरेंद्र दाभोळकर करू” अजित पवार यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.समाजमाध्यमांवरून जाणीवपूर्वक काही व्यक्ती, काही पक्ष यांना बदनाम करून लोकांच्या मनात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबत माध्यमांशी बोलत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.
अजितदादांनी यावर बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्याबद्दल
न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीने दिलेल्या चुकीच्या बातमीचा दाखला दिला.
पवार साहेब सार्वजनिक जीवनात अनेक वर्ष काम करत आहेत.
त्यांच्याबद्दल कारण नसताना गैरसमज पसरविणाऱ्या, संभ्रम पसरवणाऱ्या बातम्या का केल्या जातात,असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अशा चुकीच्या बातम्या वाचून अनेकजण आपले मत व्यक्त करतात. यातून कारण नसताना बदनामी होत आहे.
वृत्तवाहिनीने दिलगिरी व्यक्त केली ठीक आहे, पण दिलगिरी व्यक्त करण्याआधी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांनी
बातमीची शहानिशा करायला शिकावे, असे आवाहन अजितदादांनी सर्व प्रसारमाध्यमांना केले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी सांगितलं की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. ते म्हणाले, “आम्ही याचा शोध घेत आहोत. तपास सुरू केला आहे.”
अंधश्रद्धेच्या विरोधात लढा देणारे नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात मॉर्निंगवॉक करत असताना,
भ्याड दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
Nikki Yadav Murder :निक्की यादव चा खून,फ्रीजमध्ये मृतदेह;संपूर्ण प्रकरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 09, JUN 2023, 16:52 PM
WebTitle – Sharad Pawar threatens to kill like Narendra dabholkar