गोरखपूर न्यूज नावाने एक घाबरवणारा व्हायरल व्हिडिओ “भिकारी के रूप में ५०० लोग,किडनी निकाल ले रहे है,” हा सध्या सोशल मिडियात धुमाकूळ घालत आहे.अनेक पालकांना आपल्या मुलांच्या चिंतेने या व्हायरल व्हिडिओ मुळे लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.धडकी भरली आहे.अशाच एका पालकांनी,राहुल बनसोडे यांनी जागल्याभारत कडे हा व्हायरल व्हिडिओ पाठवून या व्हिडिओ मागील सत्यता पडताळून शहानिशा करण्याची विनंती केली,आमची टीम कामाला लागली.
आम्ही या व्हिडिओ मॅसेजचा बारकाईने अभ्यास केला.त्यावेळी आम्हाला जे सत्य समजलं ते आम्ही आमच्या वाचकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देत आहोत.बने रहे हमारे साथ,कुठेही जाऊ नका.वाचत रहा.ही पोस्ट काळजीपूर्वक वाचा,मग शेअर करा,यामुळे अनेक धास्तावलेले पालक, जीव टांगणीला लागलेले पालक काळजीमुक्त होतील,शिवाय आपली सामाजिक जबाबदारी देखील आहे.समाजात चुकीचे मॅसेज अफवा यावर आपण नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.याशिवाय पोस्ट काळजीपूर्वक वाचून शेअर केल्याने गुगलकडे पॉझिटिव्ह सिग्नल जातात शेअर केल्याने आपली क्रेडीबिलिटी वाढते.या गोष्टी आपण प्रॅक्टिस म्हणून केल्या पाहिजेत.वेबसाइटला न चुकता दिवसातून एकदा तरी भेट दिली पाहिजे,आपणच आपलं माध्यम सक्षम केलं पाहिजे,बळ देऊन मोठं केलं पाहीजे.
भिकारी के रूप में ५०० लोग,किडनी निकाल ले रहे है व्हायरल व्हिडिओ मधिल दावा
कोणत्याही अनोळखी व्यक्तीसाठी जसे की भंगारवाला,फेरीवाला,बाबा किंवा कुणी भिकारी यापैकी कुणीही असो त्यांच्यासाठी दरवाजा खोलू नका,त्यांच्याशी चर्चा करू नका.त्यांना चुकूनही म्हणू नका की “आता घरात कुणीही नाही,” नंतर या किंवा चले जाव,घरात कुत्रा असेल तर त्याला सोडून द्या.मेन गेट खोलू नका,तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या.सतर्क रहा,सुरक्षित रहा,आम्हाला खबर मिळाली आहे की भिकाऱ्यांच्या वेशात ५०० लोक निघाले आहेत,रस्त्यात जो भेटेल त्याला कापत सुटले आहेत,
व्हायरल होणारा हा वरील फेक व्हिडिओ
यातील सहा सात लोकांना पकडण्यात आलं असून त्यानीच ५०० लोक अशा पद्धतीने आले आहेत अशी गोष्ट कबूल केल्याचा दावा करण्यात आलाय,यासाठी बांधवांनो तुमचा जेवढा मित्र परिवार आहे नातेवाईक आहेत,त्यांना हा व्हिडिओ पाठवा,शेअर करा,ही पंधरा ते वीस जणांची टोळी असून ते रात्री येतात,लहान मुलांचा रडण्याचा आवाज येतो,तेव्हा दार उघडू नका,हा मॅसेज तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा,दोन दिवसांच्या आत आपल्या विभागात हा मॅसेज व्हायरल होऊन पसरला पाहिजे,आपली सुरक्षा आपल्या हातात,जनहित में जारी,गोरखपूर पोलिस,असा मॅसेज पोलिसांच्या हवाल्याने मोठ्याप्रमाणावर शेअर केला जात आहे.
VERIFICATION AND METHODOLOGY
भिकारी सुटले असून ते किडण्या काढत असल्याचा व्हायरल व्हिडिओ फेक
सोशल मिडियात व्हायरल झालेला हा व्हिडिओ एडिट केलेला असून त्याला वॉईस ओव्हर देऊन पुन्हा प्रसारित करण्यात आलेलं आहे.व्हिडिओ मधिल आवाज पोलिस अधिकाऱ्यांचा नसून हा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करणाऱ्या व्यक्तीने जाणीवपूर्वक हे केलेलं आहे.आम्ही जेव्हा इंटरनेटवर शोध घेतला तेव्हा आम्हाला केवळ एक व्हिडिओ आढळून आला.ज्यात फॅक्ट चेक करण्यात आलं होतं परंतु त्यामध्ये विस्तृत माहिती नव्हती,म्हणून आम्ही अधिक माहिती घेतली.
“हा व्हिडिओ 2019 चा आहे. व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे नाव डॉ. कौस्तुभ असे असल्याचे समजले.त्यावेळी ते पोलीस अधीक्षक (शहर) होते. सध्या त्यांची पोस्टिंग महाराजगंजमध्ये येथे असल्याचे कळते. विशेष म्हणजे त्यावेळीही ही क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. वास्तविक, त्यांनी फेक न्यूजविरोधात वक्तव्य केले होते. जे नंतर संपादित आणि बदलले गेले.”
आता आपण पाहूया त्यांचा ओरिजिनल व्हिडिओ
गोरखपूर न्यूज ने हा व्हिडिओ प्रसारित करून एडिट व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची प्रशासनाला विनंती केली आहे.
निष्कर्ष
“भिकारी के रूप में ५०० लोग,किडनी निकाल ले रहे है,” हा सध्या सोशल मिडियात धुमाकूळ घालत आहे,
सदर व्हायरल व्हिडिओ फेक असल्याचे आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
- टीम जागल्या भारत