हरियाणा मधिल पानिपत शहरातील प्राचीन श्री देवी मंदिरात शुक्रवारी शहरातील सर्व ब्राह्मण आणि सनातन धर्म संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. श्रीकृष्ण जन्माष्टमी, करवा चौथ असे सण वार दोन दिवस साजरे करणे हा या बैठकीचा मुख्य मुद्दा होता. त्यात ब्राह्मणांनी सनातन धर्म संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना एकमुखाने विरोध करत दोन दिवस सनातन धर्म संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून उत्सवात गोंधळ घालणारी परिस्थिती निर्माण करत असल्याचा आरोप केला.
या मुद्यावरून ब्राह्मण संघटना आणि सनातन संघटनेच्या अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.
दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वादावादी झाली आणि अखेर सनातन संघटनेचे पदाधिकारी सभा मध्येच सोडून तिथून निघून गेले.
यानंतर ब्राह्मणांनी प्रत्येक सण शास्त्रानुसार साजरा करण्याचे ठरवले आहे.
सनातन धर्म संघटनेच्या कागदावर लिहिलेली तारीख वैध मानली जाणार नाही
दैनिक भास्कर ने दिलेल्या वृत्तानुसार,याबाबत अधिक माहिती देताना ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष आचार्य लालमणी पांडेय म्हणाले की, सनातन धर्म संघटनेचे पदाधिकारी अनेकदा सणांच्या तारखा स्वत:च्या मन मर्जीने निवडत आले आहेत. अशा तारखा निवडताना त्यांनी ब्राह्मणांशी सल्ला मसलत किंवा चर्चा केलेली नसते.
यामुळे ब्राह्मण समाजाला सण साजरे करण्यात अडचणी तर येत आहेतच शिवाय लोकांमध्ये सुद्धा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आज झालेल्या बैठकीत सर्वानुमते आता शास्त्रानुसारच सण साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला. सनातन धर्म संघटनेच्या कागदावर लिहिलेल्या तारखांनुसार सण साजरे केले जाणार नाहीत.
उत्सवाची तारीख अशा प्रकारे लोकांना सांगितली जाईल
अध्यक्ष आचार्य लालमणी पांडेय यांनी सांगितले की, शास्त्रानुसार संपूर्ण वर्षाचे कॅलेंडर तयार केले जाईल. शहरातील प्रत्येक मंदिरात या तारखा चिकटवल्या जातील. या तारखांचा प्रचार आणि प्रसार माध्यमांद्वारेही केला जाईल. या सर्व तारखा शास्त्रानुसार ठरवल्या जातील.या सर्व तारखा बनारस, अयोध्या, वृंदावनसह सर्व धार्मिक स्थळे आणि तीर्थक्षेत्रांसाठी वैध असतील. सनातन धर्म संघटनेचे सदस्य धर्मग्रंथाचे पालन करतील, तर त्यांच्या विचारांचेही स्वागत आहे, असे ते म्हणाले. अन्यथा, त्यांच्या दिलेल्या तारखांना सण उत्सव साजरे केले जाणार नाहीत.
राजू श्रीवास्तव ऑटो रिक्शा चालक ते कॉमेडी स्टार पर्यंतचा प्रवास
केंद्रीय तपास यंत्रणा च्या गैरवापराच्या विरोधात बंगाल विधानसभेत ठराव पास
जात मुद्यावरून अंत्यसंस्कार करण्यास रोखले; बाहेरच करावा लागला विधी
मराठा समाजाविषयी वादग्रस्त व्यक्तव्य ; किरणकुमार बकाले निलंबित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 23,2022, 19:45 PM
WebTitle – Brahmin-Sanatana Dharma organization conflict over celebrating Hindu festival