पोषक आहार कुपोषण व भुकबळी चे वाढते प्रमाण : अन्न ही आपल्या जीवनाची मूलभूत गरज आहे, त्याशिवाय जगण्याची कल्पनाही करणे अशक्य आहे. पुरेशा प्रमाणात त्याची उपलब्धता जितकी आवश्यक आहे, तितकेच पोषक घटक आपल्या आहारात योग्य समावेश करणेही महत्त्वाचे आहे. 2019 च्या वर्षाने कोरोना महामारी मुळे, जागतिक यंत्रणांनाही विविध स्तरांवर तीव्र आर्थिक मंदीचा सामना करावा लागला आणि याचा वितरीत परिणाम आपल्या अन्न उपलब्धतेवर झाला . युनायटेड नेशन्स च्या ‘द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड, 2022’ या अहवालात म्हटले आहे की 2019 नंतर जगभरात भुकेचा आकडा झपाट्याने वाढला आहे. 2019 मध्ये जगातील 618 दशलक्ष लोक उपासमारीने झुंजत असताना 2021 मध्ये ही संख्या 768 लक्ष झाली. गेल्या 15 वर्षांपासून उपासमारीच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असताना कोरोनाच्या काळात अभूतपूर्व वाढ दिसून आली.
70.5% भारतीय पोषणापासून वंचित
या संदर्भात, भारताच्या परिस्थितीवर अहवालात असे म्हटले आहे की , 22 कोटी भारतीय लोकांना अजूनही पुरेसे अन्न मिळत नाही. अहवालानुसार, 2021 मध्ये, जागतिक स्तरावर उपासमारीने ग्रस्त 768 लक्ष लोकांपैकी 29 टक्के भारतीय होते. भूक निर्मूलनाची ही गती कदाचित विकसित देशांपेक्षा कमी किंवा शेजारील देशांपेक्षा चांगली असेल, परंतु अहवालात असे दिसून आले आहे की 2021 मध्ये भारतातील एकूण 224 दशलक्ष लोकसंख्या कुपोषित असल्याचे दिसून आले. प्रकाशित सर्वेक्षणानुसार, 70.5% भारतीय पोषणापासून वंचित आहेत.
मोठ्या संख्येने भारतीयामध्ये लठ्ठ होण्याचे प्रमाण वाढत असून महिलांसुध्दा अशक्तपणाने ग्रस्त आहेत. अहवालानुसार, 15 ते 49 वयोगटातील 3.4 कोटी लोक जास्त वजनाच्या श्रेणीत सामील झाले आहेत. तर चार वर्षांपूर्वी ही संख्या अडीच कोटी होती. 2019 मध्ये महिला अशक्तपणाच्या रुग्णांची संख्या सुमारे 172 लक्ष होती, तर 2021 मध्ये भारतातील एकूण 187 लक्ष भारतीय महिला अशक्त असल्याचे आढळून आले.
एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोक पोषणापासून वंचित
ग्लोबल हंगर इंडेक्स-2021′ नुसार, भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा अन्न उत्पादक देश आहे.
दूध, तांदूळ, मासे, भाजीपाला आणि गहू या उत्पादनात आघाडीवर असलेले आणि जगातील सर्वात स्वस्त पौष्टिक अन्न उपलब्ध असल्याने
एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोक पोषणापासून वंचित आहेत, यात शंका नाही.
यामध्ये जिथे पद्धतशीर व्यवस्थापनातील उणिवा समोर येतात, तिथे भारतीय संस्कृतीचे पारंपरिक आहार नियमन हेही एक कारण आहे.
भारतीय संस्कृतीत अन्नाचा देवत्वाशी संबंध आहे. आपल्या परंपरेमध्ये अन्न वाया घालवणे कठोरपणे प्रतिबंधित आहे,
परंतु बदललेल्या जीवनशैलीवर आधारित भव्य उत्सवांमध्ये दिल्या जाणार्या विविध प्रकारच्या पदार्थांचा एक मोठा भाग
आपल्या गरजेपेक्षा जास्त प्रमाणात डस्टबिनमध्ये टाकला जातो, की आपण अनेक गरजू लोकांचा भुकेचा आगडोंब भागवू शकतो.
गुणवत्तेचे मूल्यांकन हा प्रश्नचिन्हाचा विषय
आजही असमाधानकारक आणि अव्यवस्थित सरकारी यंत्रणा ही अत्यंत दूःखत दुर्दैवी विडंबनाची बाब आहे की लाखो लोकांना धान्याची गरज पडली असताना, दरवर्षी लाखो टन अन्नधान्य गैरव्यवहारांमुळे वाया जाते. पोषक आहार आणि मोफत धान्य वाटप योजना आणि सर्व गरजू लोकांपर्यंत पोहोचणे यात खूप मोठी तफावत दीसून येतो तर गुणवत्तेचे मूल्यांकन हा प्रश्नचिन्हाचा विषय आहे. अखाद्य आहारातून संपूर्ण पोषक तत्वांचा पुरवठा आणि निकृष्ट दर्जाच्या,कमी दर्जाच्या धान्यातून संपूर्ण पोषक तत्वांचा पुरवठा कसा शक्य आहे? हा ही एक प्रश्न आहे.
रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अमर्याद वापरामुळे अन्नाच्या नैसर्गिक गुणवत्तेवरही परिणाम होतो, तसेच पोषक घटकांवरही विपरित परिणाम होतो. अॅनिमियासारख्या आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये असामान्य वाढ होण्यामागे संतुलित आहार, प्रमाण इत्यादींसंबंधीची अपुरी माहिती देखील एक प्रमुख कारण आहे. शारीरिक हालचालींचा अभाव आणि ‘जंक फूड’चे प्रमाण यामुळे तरुणांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होत आहे. ‘रेडी टू इट’ या परंपरेचे पालन केल्याने वेळ आणि श्रम वाचू शकतात, परंतु त्याचे दूरगामी परिणाम केवळ कुपोषण आणि आरोग्याशी संबंधित समस्या आणतात. आधुनिक समजली जाणारी जीवनशैली मुळे आपण शारीरिक आणि मानसिक आजारांना कारणीभूत ठरत आहोत.
आधुनिकतेच्या हव्यासापोटी?
उरलेल्या अन्नाचा योग्य प्रकारे उपयोग करणे, वितरण करणे, सेवन करणे हे आपले पारंपारिक संस्कारात नमूद केले आहेत,
त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने केवळ विकारच होतात आणि विकारांपासून आरोग्य आणि पोषणाची अपेक्षा कशी आणि का ठेवता येईल?
गरजेनुसार सेवा देणे आणि अन्न वाटून घेणे ही आपली सांस्कृतिक एकता आहे. तीच प्रणाली सर्वोत्कृष्ट मानली जाऊ शकते
पण आधुनिकतेच्या हव्यासापोटी? आपण हे सगळे गमावून बसलो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
आपण अन्नाचे योग्य प्रकारे नियोजन, वितरण, योग्य साठवण पध्दती अवलंबीली तरच प्रत्येकांच्या ताटात संतुलित पोषक आहार पोहचू शकेल.
सकस आहाराचा अभाव आणि वाढणारी बेरोजगारी
Jai Bhim Movie जयभीम चित्रपटाच्या निर्मात्यांवर गुन्हा दाखल
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 27,2022, 16:55 PM
WebTitle – Nutrition: Increasing rates of malnutrition and starvation