नाशिक: सध्या देशात जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला पडून वेगळीच चर्चा आणि त्यावरून राजकारण सुरू आहे.मस्जिदवरील भोंगे,नंतर हनुमान चालीसा,नंतर ज्ञानवापी मस्जिद आणि आता हनुमान जन्मस्थळ नेमकं कुठं यावरून वाद सुरू झाला आहे.हनुमान जन्मभूस्थळ नक्की कुठे याचा वाद सोडवण्यासाठी आज नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.त्यात नाशिकचे महंत चिडले, हा माणूस बोगस आहे असं म्हणत त्यानी गोविंदाचार्यांवर चॅनलच्या माईकचा बूम ( दांडा ) उगारला, मग गोविंदाचार्यांनी काठी उगारली.धार्मिक सभा पवित्र आणि ज्ञानी लोकांची विद्वान पंडित लोकांची सभा आणि तिथे शास्त्रार्थ चालतं असा सामान्य लोकांचा समज होता,मात्र या घटनेने त्याचे फोलपण समोर आले.
हनुमान जन्मस्थळ बाबत नेमका वाद काय?
हनुमान चं जन्मस्थळ अंजनेरी आहे की, किष्किंदा यावरुन सध्या नाशिकमध्ये महंतांमध्ये वाद सुरू आहे. किष्किंदाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी जन्मस्थळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हनुमानाच्या जन्मस्थळाचा विषय लावून धरला. यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वरच्या ग्रामस्थांनी आणि साधूसंतांनी विरोध केला आहे. गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी केलेल्या दाव्याचा विरोध अंजनेरी येथील ग्रामस्थांनी केला होता.
गोविंदानंद यांच्या या दाव्यानंतर नाशिक आणि त्रंबकेश्वर येथील काळाराम मंदिराचे पुजारी सुधीर दास, अनिकेत शास्त्री देशपांडे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, सनातन वैदिक धर्म सभाध्यक्ष भालचंद्र शाउचे, नविनगिरी महाराज, भक्तीचरण दास, देवांग जानी यांनी या चर्चांमध्ये सहभाग घेतला. सुरुवातीला गोविंदनंद हे सिंहासनावर बसले होते. तेव्हा त्यांना विरोध करणाऱ्या साधू, संतांनी समान आसनावर बसण्याची मागणी केली. त्यावरून वाद सुरू झाला. या घटनेवरून नाराज झालेले नाशिक जिल्ह्यातील साधू निघून गेले.
या अगोदर या दोन राज्यात सुद्धा वाद झालाय
आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यात देखील हनुमान जन्मस्थळ नेमकं कुठं यावरून वाद झालाय.
हनुमानाचा जन्म आंध्रप्रदेशातील तिरूमाला च्या सात टेकड्यांवरील सप्तगिरी अंजनाद्री मध्ये झाला असल्याचा दावा केला गेला होता,
तर कर्नाटक मधिल हंपीजवळच्या किष्किंदामधल्या अंजनाद्री टेकड्यांवर हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा करण्यात आलाय.
वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कलम 144 लागू
आज झालेल्या धर्मसभेत हनुमान जन्मस्थळाबाबतचे विविध पुरावे दाखले सादर केले जाणार होते,त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हनुमान जन्मस्थळाच्या वादावर धर्मसभेत नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होतं मात्र वाद मिटवण्याऐवजी हमरी तुमरी सुरू झाल्याने त्यातून काही निष्पन्न झालं नाही, दरम्यान, खबरदारी म्हणून नाशिक पोलिसांनी शहरात कलम 144 लागू केले आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
मुस्लिम धर्मीय शेख जफर बनले चैतन्य सिंह राजपूत,राजपूतांचा विरोध
हैदराबाद एन्काऊंटर : चकमक बनावट,पोलिसांवर खुनाचा गुन्हा – कोर्ट
‘हे घर विक्रीसाठी आहे’ आंबेडकरी समाजाने घरांबाहेर लावले बॅनर
MP:दलित वराच्या वरातीवर दगडफेक,सरकारने पाडली बुलडोझरने घरे
विधवा प्रथा : समाज मनाचा दृष्टिकोन अन् मानसिकता बदलली पाहिजे..
ज्ञानवापी मशिद मुद्यावर विरोधी पक्ष गप्प का आहे?
भगवान बुद्ध आणि माझा खास संबंध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 31, 2022 17:17 PM
WebTitle – Nashik Hanuman birthplace dispute; Quarrel between priest and Shankaracharya; Mike threw up