बंगळुरू: विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी 25 लाखांची भरपाई , येथील एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा बांधकामाधीन इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय ग्राहक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आयोगाने कॉलेज प्रशासनाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आणि नुकसान भरपाई म्हणून 9 टक्के व्याजासह 25 लाख रुपये मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना देण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी 25 लाखांची भरपाई
आयोगाने सांगितले की, तेथे ना दरवाजा बसवला गेला होता ना तेथे कोणी गार्ड तैनात केला होता,
तर अशा ठिकाणी कोणीही प्रवेश करू नये यासाठी किमान एक तात्पुरता दरवाजा आहे याची खात्री करणे
ही कॉलेज प्रशासनाची जबाबदारी आहे.
महाविद्यालय प्रशासन निष्काळजी असून पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यास ते बांधील आहेत.
राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचे (एनसीडीआरसी) NCDRC न्यायमूर्ती राम सुरत राम मौर्य यांच्या खंडपीठाने
निकाल देताना म्हटलंय की, महाविद्यालय सुरू असलेल्या इमारतीच्या दुस-या मजल्यावर विद्यार्थ्यांना जाण्यापासून रोखण्यासाठी
महाविद्यालय प्रशासनाने काहीही व्यवस्था केलेली नव्हती.
कॉलेज प्रशासनाची जबाबदारी
आयोगाने सांगितले की, तेथे ना दरवाजा बसवला गेला होता ना तेथे कोणी गार्ड तैनात केला होता, तर अशा ठिकाणी कोणीही प्रवेश करू नये यासाठी किमान एक तात्पुरता दरवाजा आहे याची खात्री करणे ही कॉलेज प्रशासनाची जबाबदारी आहे. महाविद्यालय प्रशासन निष्काळजी असून पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यास ते बांधील आहेत.
कॉलेज प्रशासनाचा युक्तिवाद फेटाळला
आयोगाने कॉलेज मालक आणि कॉलेज प्रशासनाचा युक्तिवाद फेटाळून लावला, ज्यामध्ये विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणींसह कॉलेज प्रशासनापासून लपून सिगारेट ओढण्यासाठी बांधकामाधीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेली होती, असे म्हटले होते. तिने अनवधानाने काचेच्या फरशीवर उडी मारली आणि काच फुटल्याने ती खाली पडली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
इंस्टीटयूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी संस्थेतील घटना
मृत स्वर्णा जसवंत हिने 2010 मध्ये बेंगळुरू येथील मंडुडा एज्युकेशनल ट्रस्टच्या वोग इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये
बीएसई एफएडी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता.
दुस-या वर्षी, संस्थेचे बंगळुरू ग्रामीण येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत स्थलांतर करण्यात आले.
14 डिसेंबर 2011 रोजी येथे हा अपघात झाला होता.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
राहुल गांधी यांच्या कार्यालयावर हल्ला,तोडफोड,आठजण ताब्यात
महाराष्ट्राचे तीन तुकडे;तीन वेगळी राज्ये करणार – भाजप नेते उमेश कट्टी
अखेर एकनाथ शिंदे यांच्या नव्या Video मुळे सत्तेच्या संभ्रमाला The End
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 25, 2022, 11:00 AM
WebTitle – 25 lakh compensation in case of death of student; Decision of NCDRC