भारतीय माध्यमांची विश्वासार्हता हा एक चिंताजनक मुद्दा आहे.सशक्त लोकशाहीसाठी माध्यमांची गरज आहे.प्रसारमाध्यमे ही समाजातील विविध प्रश्नावर वाचा फोडण्याचे काम करतात.तसेच नागरिकांना सत्य आणि खात्रीशीर माहिती देण्याचे कर्तव्य पार पाडत असतात.सत्य आणि खात्रीशीर माहिती मिळवणे हा नागरिकांचा हक्क अधिकारच आहे.त्यापासून त्यांना वंचित ठेवता येत नाही.स्टीफन हॉकिंग्स (स्टीफन हॉकिंग) Stephen Hawking यांच्या मृत्यूनंतर झी मिडियाने ब्राह्मण व्यक्ती ब्राह्मण शास्त्रज्ञ म्हणून घोषित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
मात्र भारतीय प्रसारमाध्यमे यात अप्रमाणिक आहेत असे अनेकवेळा दिसून आले आहे.भारतीय प्रसारमाध्यमांनी आपली लोकाभिमुकता सोडून भांवडलशाहीभिमुक वृत्ती अंगीकारली आहे.ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.ज्यातून कायम व्यवस्थेतील वर्गांचे शोषण केले जाते..”ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे कष्टकरी कामगार वर्गांचे शत्रू आहेत” असे वक्तव्य त्यांनी दलित वर्ग कर्मचारी परिषदेत केले होते.ही परिषद १२,१३ फेब्रुवारी १९३८ ला मनमाड येथे झाली होती.राजकीय पक्षाचे धोरण स्पष्ट करण्यासाठी ही दलित वर्ग कर्मचारी परिषद भरविण्यात आली होती.
मानसिक बौद्धिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्यासाठी अनेक पातळ्यांवर आपली प्रसारमाध्यमे काम करताना दिसतात.
प्रसारमाध्यमे ब्राह्मणी भांडवलवादी रचनेस पोषक आणि संरक्षक अशी भूमिका नित्यनेमाने पार पाडत आहेत असे दिसून येत आहे.अशाच भूमिकेतून लोकाना दिशाभूल करणारी माहिती सत्याचा अपलाप करणारी माहिती प्रसारित केली जाते.आणि अशा पद्धतीने समाजातील भोळ्या भाबड्या जनतेस मूर्ख बनवून त्यांना गुलामीच्या दिशेने ढकलत नेले जाते.त्यांचे मानसिक बौद्धिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्यासाठी अनेक पातळ्यांवर आपली प्रसारमाध्यमे काम करताना दिसतात.
मध्यंतरी रामदेव बाबाच्या औषधाचा मुद्दा जो सर्वात अगोदर जागल्या भारत ने उघडकीस आणला
त्यावेळीही भारतीय प्रसारमाध्यमांनी लोकांची दिशाभूल करणारी माहिती रामदेव बाबाच्या हवाल्याने प्रकाशित केली.
त्यावेळीही त्यांनी कोणत्याही प्रकारे अशा महितीचे मुख्य स्त्रोत माहीत करून घेतले नाहीत.
याउलट रामदेव बाबाच्या पतंजली उद्योगास फायदा पोहोचेल अशा पद्धतीने लोकांसमोर बातम्या प्रसारित केल्या.
गोबेल्स नीती
हिटलरचा प्रचारमंत्री जोसेफ गोबेल्स आपल्याला परिचित आहे.लोकांचा ब्रेनवॉश करून
त्यांची दिशाभूल करून असत्य माहिती सत्य म्हणून प्रसारित करत त्याने हिटलरचे साम्राज्य उभे केले.
त्याला बळ आणि संरक्षण पुरवले.आणि त्यामुळेच हिटलरला आपली निरंकुश सत्ता गाजवत लाखों लोकांच्या कत्तली करणे सोपे गेले.
आपली भारतीय प्रसारमाध्यमे हेच काम आज करत आहेत.अशाच कडीचा एक भाग म्हणजे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज Stephen Hawking (स्टीफन हॉकिंग) यांना चक्क “ब्राह्मण” म्हणून लोकांच्या मनात रुजवणे.हा धक्कादायक प्रकार भारतीय प्रसार माध्यमे 21 व्या शतकात सुद्धा बेधडकपणे कोणत्याही विधिनिषेधाशिवाय करू धजतात हे फारच चिंताजनक चित्र आज पाहायला मिळत आहे.अर्थातच आताची जनता ही देवभोळी नाही.ती विचारी आहे.डोळस आहे.त्यामुळे अशा गोष्टी ती उडवून लावताना दिसते.
आता शिकलेली पिढी असल्याने या गोष्टी फारकाळ टिकत नाहीत.
स्टीफन हॉकिंग्स ब्राह्मण ?
स्टीफन हॉकिंग्स (स्टीफन हॉकिंग) Stephen Hawking यांच्या मृत्यूनंतर झी मिडियाने ब्राह्मण व्यक्ती
ब्राह्मण शास्त्रज्ञ म्हणून घोषित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
चिडलेल्या लोकांनी झी समूहावर या मुद्यावरून प्रचंड टीका केल्याने शेवटी त्यांना अशी बातमी असणारे पोस्ट हटवावे लागले.
परंतु विचार करण्यासाठी गोष्ट अशी की जर पूर्वीचा काळ असता आणि इथल्या बहुजन समाजाला जसे शिक्षण घेणे बंदी होती,
प्रश्न विचारण्यास बंदी होती.अशी बंधने असती आणि त्यांना स्वबुद्धीने तर्क
आणि विचार करता आला नसता तर आज भारतीय प्रसारमाध्यमांनी मारलेली ही थाप खरी ठरली असती.
मात्र आता शिकलेली पिढी असल्याने या गोष्टी फारकाळ टिकत नाहीत.
अनेकांनी या गोष्टीवरून झी मिडियाला धारेवर धरले तर काहींनी त्याची खिल्ली उडवली.
कोण आहेत स्टीफन हॉकिंग ?
जगप्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ या दिवशी ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची आई इझाबेल ऑक्सफर्डची वैद्यकीय संशोधन सचिव होती.हॉकिंग यांना संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड विद्यार्थीदशेपासूनच होती. हॉकिंग यांना पहिल्यापासून विज्ञान विषयात रस होता.
गणिताच्या शिक्षकाच्या प्रेरणेमुळे त्यांना विद्यापीठात गणिताचे शिक्षण घ्यावयाचे होते पण त्यांच्या वडीलांना असे वाटत होते कि त्यांनी “युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफर्ड” येथे प्रवेश घ्यावा, त्यांनी १९५९ साली वयाच्या १७ व्या वर्षी कॉसमॉलॉजी हा विषय निवडून प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली.एकदा लंडनमध्ये गणितज्ञ रॉजर पेनरोज यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले.
सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम
तार्यातील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोज यांनी त्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. या प्रबंधासाठी १९६६ सालचे ऍडम्स प्राईझ त्यांना मिळाले. स्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांताची जोड देऊन गृहिते मांडली.
१९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक आणि सापेक्षतावादाचा सिद्धांतची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्या किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले.त्यांनी रिलेटिव्हिटी, ब्लॅक होल, बिग बँग थिअरी समजावून सांगण्यात मोठी भूमिका वठवली होती. त्यांनी आपल्या योगदानातून जगभरातील कोट्यवधी तरुणांना विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी प्रेरित केले.यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले.
द ग्रँड डिझाइन’मध्ये ईश्वराचे अस्तित्व नाकारले
हॉकिंग यांचा बिग बॅंग सिद्धांताचे तज्ज्ञ मानले जातात.त्यांनी विश्व निर्मिती बाबत विधान केले.आणि या विश्व किंवा ब्रह्मांड यात कोणत्याही ईश्वरी शक्ती नाही असे स्पष्ट केले.हॉकिंग हे निरीश्वरवादी (नास्तिक) आहेत.स्टीफन हाॅकिंग यांनी त्यांचे पुस्तक ‘द ग्रँड डिझाइन’मध्ये ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे. अंधारापासून बचावासाठी स्वर्गाच्या कथा रचल्या गेल्या असं त्यांनी म्हटलं आहे.हाॅकिंग यांनी जगाला इशारा देत सचेत केले आहे, मनुष्यप्राण्यांनी स्वत:चे अस्तित्व राखण्यासाठी पुढील १०० वर्षांत अशी तयारी करावी की ज्यामुळे पृथ्वी सहजपणे साेडली जाऊ शकेल. प्रदूषणामुळे पृथ्वी आगीचा गाेळा बनतेय, आणि आपण सर्व हे जाणतो आहोतच.
आज स्टीफन हॉकिंग यांचा स्मृतीदिन त्यानिमित्ताने टीम जागल्या भारत कडून स्टीफन यांच्या संशोधक कार्यास विनम्र अभिवादन
हे ही वाचा… गौतम बुद्ध – एक निसर्गवादी : बुद्ध आणि आजचा महाविद्यालयीन तरुण
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 14, 2021 15 :30 PM
WebTitle – Stephen hawking projected as a brahmin by indian media