मालिकांचे विषय
भौत हार्ड भौत हार्ड
आप झटकेमे फटकेमे
चोरी करके भटकाते ध्यान पब्लिक का
आपकी इस चौकीदारीपे
सबने कुछ लिखा है
पब्लिक को आया है ज्ञान बड़ा
ओ फेकुजी आप कोई फकीर नी यै
सच बोलो सच बोलो फ़ाइल कैसे गायब हुयै
बस इतना ही बोलेंगे
माशाल्ला चौकीदार ही चोर है
इसमें दो राय नैये
बोले तो अपने चोर जैसा कोई हार्ड हार्ड हार्ड हार्ड हार्डिच नैये
लेखन – शीतल सोनवणे
प्रत्येक देशातील “जमीन केंद्री” अर्थकारण आणि त्याच्याशी निगडित सत्ताकारण ठरवणार आहे मानवी सिव्हिलायझेशन , मानवी संस्कृती भविष्यात कशी असेल ते
जमिनीकडे कसे बघायचे ? जमीन एक कमोडिटी आहे , एक खरेदी-विक्री योग्य वस्तू कि एकमेवाद्वितीय गोष्ट ? तिच्या कडे मालकी हक्काने बघावे कि एक विश्वस्त म्हणून, पुढच्या पिढयांना देण्यासाठी ?
जसे कोळीबांधव त्यांना मासे देणाऱ्या जलाशय, नद्या , समुद्राकडे बघतात ? जसे आदिवासी बांधव त्यांना सर्वकाही देणाऱ्या जंगलाकडे बघतात ? तसेचबघावे कि नाही ?
जमिनीचे मालक कोण आहेत ? त्यांच्याकडे किती जमीन आहे ? त्याचा ते कशासाठी उपयोग करतात ?
का हजारो हेक्टर्स जमीन पडून ठेवतात ?
एका बाजूला पर्यावरणातील गंभीर बदलावर उपाययोजना करायच्या झाल्या तर प्रत्येक देशाला जमिनीच्या प्रश्नाकडे बघावेच लागेल
दुसऱ्या बाजूला जमिनींचे काही मूठभर मालकांकडे , कोर्पोरेट्सकडे हस्तांतरण होत जाण्यातून लोकशाही समोर आव्हाने उभी राहणार आहेत
आपल्या देशात तर जातीव्यवस्था जमिनीत गेली हजारो वर्षे चिवट मुळे पकडून उभी आहे
____________________________________
आपल्याला वाटते युरोपात जमिनीचे वगैरे प्रश्न अजिबात चर्चिले जात नसतील
ट्रान्स नॅशनल इन्स्टिटयूटचा अहवाल “ Roots of Resilience” सांगतोय कि युरोपियन देशांमध्ये जमिनीच्या प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवून बरीच जनकेंद्री आंदोलने उभी राहत आहेत (खालील लिंक बघा)
आणि त्यात जमिनीशी संबंधित युरोपियन देशातील तरुण पिढी पुढाकारात आहे
___________________________________
गेली १०० दिवस आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाने मशाल तेवत ठेवली आहे ;
त्यांचा लढा वरकरणी किमान हमी भाव , मार्केट समित्या या मागण्यांशी निगडित असला असे वाटेल,
पण वस्तुस्थिती हि आहे कि हे शेतकरी आपल्या देशातील या शतकातील अर्थव्यवस्था ,
समाजव्यवस्था , पर्यावरण अशा अनेक बाबींना आकार देण्याचे काम करत आहेत
लेखन – संजीव चांदोरकर ( ६ मार्च २०२१)
मालिकांचे विषय
अपरिहार्यपणे नजरेस पडणाऱ्या मालिकांच निरीक्षण.
जय मल्हार , बाळूमामा, ज्योतिबा आणि इतर अनेक वेगवेगळे बाबा बुवा यांच्या मालिका मराठीत आणि प्रादेशिक भाषेत जवळपास प्रत्येक वाहिन्यावर सुरु आहेत. पुराणात जशी त्या त्या देवतेची अफाट स्तुती केलेली असते. त्या नायक नायिकेच्या भक्ताची एक कथा चार पाच एपिसोड पाणी घालून पातळ करू करू वाढली जाते.या मालिकांचा प्रेक्षकवर्ग ज्येष्ठ नागरिक, त्यात विशेषकरून महिला मंडळ असतय.
हा एक सुनियोजित प्रकल्प आहे.जास्तीत जास्त धार्मिक गोष्टी, कथा यांच्यामुळे लोकांचा कर्मकांड, पूजापाठ याकडे ओढा टिकून रहावा आणि घरातल्या ज्येष्ठांवर त्याचा पगडा असेल तर आपसूकच सगळ्या घराला त्याच दावणीला बांधल जात.याचा एक थोडासा वेगळा भाग म्हणजे जिवंत असलेल्या वेगवेगळ्या
कीर्तनकार-प्रवचनकार मंडळीचे आलेले उदंड पीक
कीर्तनकार-प्रवचनकार मंडळीचे आलेले उदंड पीक.
यांच्या प्रवचनाचे विषय भागवतधर्म , विठ्ठलभक्ती सोडून सगळ काही असतात, रामतीर्थकर बाईंचे हे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत जिथे टीव्हीवर यांना कुठल्या तरी देशाबद्दल, धर्माबद्दल द्वेषमुलक बोलायला लाज वाटत नाही.भाळी लावलेला बुक्का नेमक कसल प्रतिक आहे आणि विठ्ठलाच्या नावाने , ज्ञानेश्वर माउलींच्या नावाने गरज करताना त्यांच विश्वात्मक पसायदान विसरून किती कोत्या मनाचे आणि कुपमंडूक झालोय याचीही लाज वाटत नाही.हे टिपिकल अजेंडा राबवणारे भामटे यांना टीव्हीवर संधी देणारे यांचेच भामटे साथीदार.
कौटुंबिक मालिकांच्या नावाने जे काही दळण दळतात ते म्हणजे कोणत्या वाहिन्यात जास्त अक्कलशून्य लोक भरलीत आणि त्यांची प्रतिभा किती हलक्या दर्जाची आहे, मागणीनुसार पुरवठा या गोंडस आवरणाखाली कोण किती जास्त विष समाजात भिनवतो त्याची स्पर्धा.
यांचे लेखक आणि दिग्दर्शक नेमके कुठून शिकून आलेले असतात आणि यांच्या टीमला ‘ क्रियेटीव्ह टीम ‘ म्हणायला कुणालाच शरम वाटत नाही हे आणखी थोर.
टिपिकल सासू सुनेच्या एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या
अतिशय वेगळ्या, सुंदर विषयाला ज्याची मांडणी नीट केली तर मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे करता येतील त्या विषयांची माती करून वळणाच्या पाण्याला गटारीत कस न्यायचं हे यांच्याकडून शिकाव.काळ्या रंगाच्या व्यक्तीला करावा लागणारा संघर्ष, एखाद्या कुटुंबात नवरा, त्याच कुटुंब कमी शिकलेल आणि बायको जास्त शिकलेली, एकल पालकत्व हे विषय चांगल्या पद्धतीने हाताळले तर सकारात्मक संदेश देणारी मालिका, इतरांना स्फूर्ती देणारी मालिका निर्माण होईल पण ही गाबडी त्याच विषयाला टिपिकल सासू सुनेच्या एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या याच गाळात सगळी मालिका नेऊन सगळ्या विषयाचा चिखल घालून ठेवतात.
यातली कटकारस्थान म्हणजे जणू प्रत्यक्षातल्या सासू सुनांना सुरु केलेले ट्रेनिंग सेंटर वाटावेत इतक्या तपशिलात कुणाला तरी खड्ड्यात घालायला केलेल्या कटाचे सीन दाखवले जातात.जणू जन्माला आलेली प्रत्येक स्त्री निव्वळ कट करायलाच जन्माला आलेली आहे.
आणि प्रत्येक मालिकेतल मुख्य पात्र म्हणजे अक्कल गहाण ठेवून वागणारी माणस, कुणीही त्यांना मूर्ख बनवत आणि ते बनतात, डॉक्टर असलेल्या माणसाच्या घरात नुसती चक्कर आली म्हणून बाई गर्भार राहिली म्हणून लोक उड्या मारायला लागतात किंवा आपल्या बायकोला होणार बाळ कुणाच आहे याची डीएनए टेस्ट करावी याच साध लॉजिक या कथित हॉस्पिटलवाल्याला कळू नये, अरे नाट्य निर्माण करायला
लिबर्टी घेणार म्हणजे किती ?
लिबर्टी घेणार म्हणजे किती ? बघणाऱ्या लोकांचा मेंदू अजूनही बाळूत्यात आहे अस समजतात का हि लेखक मंडळी ?
बर या सगळ्या सिरीयल मधली पात्र जी भाषा बोलतात त्याचा आणि सिरीयलच्या कथेचा, स्थळाचा काडीमात्र संबंध नसतो, ग्रामीण भाषा, बोलीभाषा म्हणजे नेमक काय याच आकलन नसलेली लोक सगळा विस्कोट करून टाकतात आणि कलाकार सुद्धा निव्वळ पाट्या टाकत वाचलेले संवाद म्हणतात. धड ग्रामीण नाही धड शहरी नाही असल्या भाषा, हेल काढून बोलल कि ग्रामीण भाषा झाली एवढ तुटपुंज
आकलन दिग्दर्शक आणि कलाकारांच असाव ? आणि अजून एक गंमत म्हणजे हि सगळी तथाकथित क्रियेटीव्ह टीम महा दरिद्री , अकलेची दिवाळखोर असते. यांच्यालेखी महाराष्ट्र म्हणजे पुणे-मुंबई-नाशिक विषय संपला आणि ग्रामीण महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा उसाचा शेतीचा भाग, यापलीकडे उर्वरित महाराष्ट्र किती विविधतेने नटलेला आहे, तिथली बोलीभाषा, त्याचा लहजा, तिथल्या स्थानिक कथा परंपरा इतक्या वैविध्यपूर्ण आहेत पण हे कपाळकरंटे डोळे उघडून बघतच नाहीत त्याच काय ?
आणि का म्हणून सिरीयल बनवणाऱ्या लोकांना नाव ठेवायची ?
अचानक आलेल्या धार्मिक सिरीयल च्या पुराबद्दल काहीच वाटत नाही हेही अवघड.
बाबा, बुवा, देवी, देवता यांच्या सिरीयल धो धो चालतात आणि राजर्षी शाहू, बाबासाहेब आंबेडकर, फुले दांपत्य यांच्यावरच्या सिरीयल प्रायोजकत्व नाही म्हणून बंद पडतात ? हि अवस्था असेल तर कुठल्या तोंडाने सिरीयल बनवणाऱ्या लोकांना नाव ठेवायची ? शाहू महाराज, बाबासाहेब, फुले दांपत्य यांच्या जीवनातल्या खऱ्या घडलेल्या घटना इतक्या अद्भुत आणि नाट्यमय आहेत कि सरळ कानामात्रा वेलांटी न बदलता दाखवल तरी अतिशय सुंदर मालिका निर्मिती होईल, त्याला आपल्याकड प्रेक्षक मिळत नाहीत ?
हा घरात टीव्हीच्या डबड्यासमोर बसणारा कोट्यावधी लोकांचा वर्ग राजकीयदृष्ट्या मतदार आहे आणि सतत आदळणार कंटेंट त्याच मत बनवत या बाबी अनेक राजकीय पक्षांच्या आकलनाच्या पलीकडे आहेत. त्यांना या अचानक आलेल्या धार्मिक सिरीयल च्या पुराबद्दल काहीच वाटत नाही हेही अवघड.
हे विष किती पिढ्या नासवणार आहे आणि त्याला आपण कसे तोंड देणार आहोत ?
लेखन – आनंद शीतोळे
शेतकरी आंदोलनाचा आज १००वा दिवस. ह्या आंदोलनात दोनशेहून जास्त आंदोलनकर्ते शेतकरी शहीद झाले आहेत. गेल्या १०० दिवसांत हे आंदोलन व्यापक झाले आहे. मेनस्ट्रीम मीडियाला जवळपास फाट्यावर मारतच ह्या आंदोलनाचा रथ पुढे जातो आहे.शेतकरी सोशल मीडियावर आंदोलनाची बाजू चतुरपणे आणि भक्कमपणे मांडत आहेत.
अनेक यूट्यूब चॅनल शेतकरी आंदोलनाची इत्थंभूत माहिती देण्याचे, जनजागृतीचे काम अतिशय प्रभावीपणे पार पाडीत आहेत.ह्या सगळ्यातून शेतीच्या संकटाची भीषणता लोकांसमोर येते आहे. म्हणूनच पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशातला शेतकरी ह्या आंदोलनात प्रामुख्याने सहभागी असला,तरी देशातील इतर भागांतला शेतकरीही मनाने आंदोलनासोबत आहे.
शेतकरी आंदोलनापुढे मोदीशायोगींचे उग्र हिंदुत्व तूर्तास तरी हतप्रभ झालेले दिसते आहे.
शेतकऱ्यांचे हे आंदोलन यशस्वी होवो! कारण ते यशस्वी होणे देशासाठी गरजेचे आहे.
लेखन चित्तरंजन भट
#साधू_कोतवाल :- उस्मानाबाद शहरापासून दूर अंतरावर आनंदनगर ,भाग्यनगर या सरकारी वसाहती होत्या आणि त्याच्या आसपास इतरांनीही घरं बांधलेली. दिवसा रमणीय वाटणारा हा परिसर अंधार पडला की गावापासून तुटायचा.त्या तुटलेपणामुळे या वसाहतींमधील कुटुंबं सिनेमाच्या शेवटच्या खेळाला जात नसत. अंधार पडला की, रस्त्याच्या कडेच्या खांबांवरील विजेचे दिवे चांदण्यांसारखे लुकलुकत. रात्री अकराच्या नंतर त्या नीरव शांत अंधाराला चिरत एक धडकी भरवणारी आरोळी कानावर पडायची, तेंव्हा अस्सल चोरानाही धडकी भरायची !
‘सा sssss हे S ब हु ssss शार…..’ पाठोपाठ खर्जातील खाकरण्याचा आवाज आणि लगोलग जाड काठी आपटल्याचा ध्वनी. असं वाटायचं की कुणी अक्राळविक्राळ माणूस आपलं चोरांपासून रक्षण करतोय. उलट त्या आवाजाने झोप चाळवायची, लहान मुलं जागी असतील,तर थरथर कापायची. कित्येक वर्ष त्या भागातील कित्येक मुलांना या आवाजामागच्या धन्याचा ‘धाक’ दाखविला जायचा आणि मुलं गपगुमान ऐकायची ! साडेतीन-चार वाजता हळूहळू काठीचा आवाज आमच्या घराजवळ येऊन थांबायचा.
हेच ते(दादा) साधू कोतवाल
मग परिचित आवाज यायचा,’पाटूळे सायेब…!’ मग आज्जी दार उघडायची,कधी चहासाठी चूल पेटायची किंवा बिड्यांची देवघेव व्हायची,बिड्या वडताना सुख-दुःखाची देवघेव व्हायची. त्या धडकी भरवणाऱ्या आवाजाच्या धन्याचं खरं नाव होतं ‘साधू चव्हाण’ ते उस्मानाबादचे वतनदार मांग होते, त्यांचं घर ‘चव्हाण गल्लीत’ होतं.
कधी बोर्डिंगहून आज्जीकडे आलो, तर तो आवाज काणी पडायचा. त्या दिवशी पगारीचा दिवस असावा. वृद्धत्वाकडे झुकलेले, मध्यम बांध्याचे, रापलेला गोरारंग, शुभ्र पांढरा सदरा, पायजमा, चेहऱ्यावर आणि नजरेत वात्सल्य असलेले एक गृहस्थ सकाळीच घरी आले. त्यांच्या आज्जी-वडिलाशी गप्पा चाललेल्या. शेजारच्या आया-बाया घरात डोकावून जात होत्या आणि बारकी पोरं घरात लपलेली.
आज्जी म्हणाली “हेच ते(दादा) साधू कोतवाल.” माझा विश्वास बसेना. नंतर ते आणि वडील ऑफिसकडे गेले. कदाचित जातबंधू असल्याने त्यांचा ‘स्नेह’ जुळला असावा. नंतर एकमेकांच्या घरी येणं-जाणं सुरु झालं. बऱ्याचदा त्याना साहेबलोकांच्या घरची कामं करायला बोलावीत, तेंव्हा ते तिकडून घराकडे परतताना त्यांना मिळालेल्या वाढणातून काही वाढण देऊन जायचे. निवृत्तीनंतर त्यांच्या जागेवर नाताला अगर जावयाला चिटकवून घेण्याचे प्रयत्न केले गेले.
‘ब्राह्मण’ कोतवाल
त्यांच्या निवृत्तीनंतरही ते येत-जात असत. नंतर शिकल्या-सवरलेल्या तरुणांची भरती कोतवाल म्हणून होऊ लागली .त्यात ‘ब्राह्मण’ कोतवालपण होते. त्यातील काही रात्रीच्या ‘येसकरकीला’ करवादले. कुणी साहेबलोकांच्या घरी ‘सर्व्हंट’ झाले. कुणी इनशर्ट करून कारकुनी करू लागले. साधू कोतावालाना ओळखणारे ‘साहेबलोक’ (त्यात चपराशीपण) भेटले की ते निजामाच्या आमदनीतील प्रथेप्रमाणे ‘आदाब’ करायचे. त्यांना कुणी ‘त्यांच्यासारखा कोतवाल होणार नाही !’ असे म्हणाले की, त्यांची नजर लुकलुकायची ! मलाही त्या वयात कोतवाल व्हावं तर ‘साधू कोतवाला’सारखं; असं वाटायचं.
कोतवाल पदाची भरती निघाली तेंव्हा वडिलांनी मला पण अर्ज करायला सांगितलं होतं,अर्ज कर म्हणून आज्जी विनवणी करीत होती. पण मी काही त्यांचं ऐकलं नाही. नसता मीपण आज आपल्या कर्मभूमीत #शाहू_कोतवाल म्हणून नाणावलेला असतो. तसं झालं असतं तर कशाला इतक्या दूरदेशी पोटासाठी यावं लागलं असतं ?
#आठवणींचा_खकाना
लेखन – शाहू पाटोळे
आज एका स्टॉपवर बस मधे एक ललना चढली. लेडीज सिटवर जाउन बसली. बस मधे फारशी गर्दी नव्हती. मोजून ६ प्रवासी होते. एसी बस असल्यामुळे बस गार गार झाली होती. थोड्या वेळाने ती ललना शिंकू लागली. एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा. . .
शिंकताना प्रत्येक वेळेस ती तोंडावरचा मास्क काढत असे आणि तोंड खाली करुन शिंकत असे. बर शिंकत असताना नाकातोंडावर रुमाल किंवा हात सुद्धा ठेवत नसे. हे पाहून तीच्या पासुन दोन सीट दूर बसलेले जेष्ठ नागरीक खुपच वैतागले. कंडक्टरला म्हणाले तीला सांगा एकतर शिंकताना तोंडावर रुमाल ठेव किंवा मास्क काढू नकोस.
ठिनगी पडली
जेष्ठ नागरिकांचा हा आवाज ऐकून ती ललना वैतागुन पण हसत मागे वळून म्हणाली “काका, नॉर्मल सर्दी आहे. टेंशन घेऊ नका” हे ऐकून जेष्ठ नागरिक काका ऊसळून म्हणाले “तुला काय माहीत करोना आहे कि नाही?. करोनाची टेस्ट करुन घेतलीय का?” एवढ्याने ठिनगी पडली.
बस मधे दोघांमधे जोरदार वादावादी सुरु झाली. जेष्ठ नागरीकांचे म्हणणे तसे बरोबर होते. कंडक्टर सुद्धा ललनेला शिंकताना तोंडावर रुमाल घ्या म्हनून सांगत होता. पण ललना काही ऐकायला तयार नव्हती. शेवटी ड्रायव्हरने गाडी बाजुला लावली. तो ललनेला म्हणाला मॅडम तुमच्या कडे रुमाल नाही का? असेल तर वापरा. नसेल तर सांगा माझ्याकडे एक्स्ट्रा रुमाल आहे. आणि जर तुम्हाला ऐकायचे नसेल तर गाडी थेट पोलिस स्टेशनला घेऊन जातो.
ललनेला ही मात्रा लागू पडली. पुढच्या स्टॉपला ललना बस मधून उतरली पण उतरताना चेहरा वेडावाकडा करत जेष्ठ नागरिकांना काही तरी म्हणाली.ती ललना स्टॉपवरुन उतरल्यानंतर कंडक्टर जेष्ठ नागरिकाशी गप्पा मारु लागला. त्यांची तारिफ करु लागला. प्रत्येक नागरिक अशी काळजी घेउ लागला तरच करोना आटोक्यात असं म्हणाला. जेष्ठ मागरिक म्हणाले “अहो काळजी घेतलीच पाहिजे. त्यात ही एसी बस आहे.
मी कालच करोनाचा पहिला डोस घेतलाय. डॉक्टर म्हणालेत दुसरा डोस घेईपर्यंत काळजी घेतलीच पाहिजे.” हे ऐकून बस मधल्या तुरळक पब्लिकला जेष्ठ नागरिक हायपर होण्याच कारण समजलं.” कंडक्टर म्हणाला “अहो काका, मग तुम्ही तरी उन्हा तान्हात बाहेर का फिरता.? तुम्ही पण काळजी घ्यायला पाहिजे.” जेष्ठ नागरिक म्हणाले हो काळजी घेतली पाहिजे पण शेवटी आपली काम आपणच करायची असतात.” कंडक्टर म्हणाला “हो ते बरोबर आहे. पण घरात मुलं, सुना नाहीत का?” जेष्ठ नागरिक म्हणाले मुलं, सुन, नातवंड असती तर कश्याला घराबाहेर पडलो असतो?” हे ऐकुन कंडक्टर पुढे काहीच बोलला नाही. बस मधली तुरळक गर्दी सुद्धा अधिकच शांत भासु लागली.
लेखन – साक्य नितीन
जर रस्त्यावरचा माणूस भिक मागून बिस्कीटचा पुडा विकत घेत असेल तर… तो सरकारने ठरविलेला उत्पादीत वस्तूंवरचा कर (टॅक्स) भरतो…असे असंख्य गरीब लोक… गावात व झोपडपट्टीत राहणारे लोक अप्रत्यक्ष टॅक्स भरतात… त्यामुळे सरकारला देश चालविण्यास व नागरीकांना सुविधा पुरविण्यास पैस निर्माण होत…
त्यामुळे टिव्हीवर बोंबलणारी कुत्री जर आपल्या बापाच टॅक्स टॅक्स म्हणून जर बोंबलीत असतील तर एकच सांगतो…
फक्त.. ३.२ % च लोक उत्पन्न टॅक्स भरतात… आणि त्यामुळे देश चालत नाही तर अप्रत्यक्ष टॅक्स द्वारे गोळा केलेल्या पैशाने सुद्धा देश चालतो… देशाची सेना चालते… रोड बनतात.. आणि हो… शिक्षण संस्थापण चालतात…पण हाच टॅक्स जेव्हा कांपन्या भरत नाहीत आणि… सरकार ते माफ करते तेव्हा… तुमच्या तोंडाला अडाणी-आंबानी-मल्या इत्यादी ब्राँडचे निप्पल बसते काय…? देशाचा प्रत्येक नागरीक टॅक्स भरतो… चला हटा… हे टॅक्स काय तुमच्या बापाचे नाही… सगळ्या देशाचे आहे
लेखन – सुनील गजकोष
चिपळूण पुरग्रस्तांना महिला बचत गटांनी दिला मदतीचा हात
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published on March 07, 2021 11:30 AM
WebTitle – Social media corner latest & viral post in social media