राज्यसरकारचा वाझे च्या बाबत मोठा निर्णय: मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन सध्या विरोधकांच्या निशाण्यावर असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली होणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवेदन देण्यासाठी अनिल देशमुख विधानपरिषदेत उपस्थित होते. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली. विरोधक मात्र अटकेच्या मागणीवर ठाम असून यावेळी सभागृहात झालेल्या गदारोळानंतर कारवाई स्थगित करण्यात आली.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात सांगितलं की, “सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल”. निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली होणार असल्याची घोषणा केल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ कायम होता. बदली नाही तर निलंबन करुन अटक करा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.राज्यसरकारचा वाझे च्या बाबत मोठा निर्णय घेण्यात आला.
राज्यसरकारचा वाझे च्या बाबत मोठा निर्णय
कोण आहे सचिन वाझे?
मुंबईतील (Mumbai) घाटकोपरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट (Ghatkopar Blast) प्रकरणातील संशयित आरोपी ख्वाजा यूनुसची (Khawaja Yunus) पोलिस कस्टडीत कथित हत्या झाली होती. ही घटना 16 वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणी एक सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि तीन कॉस्टेबलला निलंबित करण्यात आलं होतं.त्या चौघांना मुंबई पोलिस (Mumbai Police) सेवेत पुन्हा रुजू करून घेण्यात आलं.
सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वझे (Sachin Vaze),कॉस्टेबल राजेंद्र तिवारी (Rajendra Tiwari), सुनील देसाई (Sunil Desai) आणि राजाराम निकम (Rajaram Nikam) या चौघांना 2004 मध्ये निलंबित करण्यात आलं होतं. या सगळ्यांवर ख्वाजा यूनुसची कथित हत्या आणि पुरावे मिटवण्याचा ठपका ठेवण्यात आला होता. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आता तब्बल 16 वर्षांनी या चौघांना पोलिस सेवेत रुजू करून घेण्यात आले.
ख्वाजा यूनुसची कथित हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोपपत्र
सचिन वझे हा 1990 बॅचा पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट आहे. त्याला 2004 मध्ये अटक करण्यात आली होती.
त्याच्याविरुद्ध ख्वाजा यूनुसची कथित हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.
सचिन वझे यांनी नोव्हेंबर 2007 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला होता. परंतु, त्याच्याविरुद्ध हत्येचा खटला सुरू असल्यामुळे त्याचा राजीनामा नामंजूर करण्यात आला होता. तर मराठवाड्यातील परभणी येथील राहणार 27 वर्षीय ख्वाजा यूनुस हा पेशाने इंजीनिअर होता. तो दुबईत नोकरी करत होता. डिसेंबर 2002 मध्ये घाटकोपरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आली होती.
ख्वाजा यूनुस याला चौकशीसाठी औरंगाबादला आणण्यात येत असताना तो फरार झाला होता, असा दावा पोलिसांनी त्यावेळी केला होता. मात्र, पोलिस कस्टडीत असतानाच ख्वाजा यूनुसची हत्या करण्यात आल्याचं सीआयडी चौकशीत स्पष्ट झालं होतं. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई हायकोर्टाने (Bombay Highcourt) आदेश दिले होते.
सीआयडीने या प्रकरणी 14 पोलिसांना दोषी ठरवले होते. मात्र,त्यापैकी सचिन वझेसह तिवारी, निकम आणि देसाई या तीन कॉन्स्टेबलविरुद्ध खटला चालवण्यास सरकारने परवानगी दिली होती. बचाव पक्षानं दावा केला होता की ख्वाजा यूनुसला पोलिस कोठडीतच पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. लॉकअपमध्ये त्याचे कपडे उतरवून त्याला बेल्टने छाती आणि पोटावर जबर मारहाण करण्यात आली होती.
या प्रकरणी सचिन वझे या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं होतं. नंतर त्याने स्वत: 2007 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला होता. मात्र, त्याचा राजीनामा स्विकरण्यात आला नाही. नंतर सचिन वझे याने 2008 नंतर शिवसेनेत सक्रीय कार्यकर्ता म्हणून काम केलं.2020 साली सचिन वझे यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा पोलिस सेवेत रुजू करून घेण्यात आले होते.
गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात हक्कभंग
‘अन्वय नाईक यांच्या केसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाबली असं वक्तव्य देशमुख यांनी केलं,
नाईक यांनी आत्महत्या केली आहे. असं स्टेटमेंट त्यांच्या पत्नी आणि मुलीने दिलं आहे.
तसंच सुप्रीम कोर्टाने याबद्दलचे स्पष्ट अभिप्राय नोंदविलेले आहेत.
हे प्रकरण दाबले असं म्हणणं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान केला आहे.
माझा आणि सुप्रीम कोर्टाचा देशमुख यांनी अवमान केला आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.
तसंच, सुप्रीम कोर्टाचा निकाल गृहमंत्र्यांना माहिती असूनही त्यांनी सभागृहाचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.
सरकारला जाब विचारण्याचा माझा अधिकार आहे त्यापासून माझा हक्क दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे विशेष हक्कभंग समितीकडे हे प्रकरणे देण्यात यावं, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
मराठा आरक्षण प्रकरणी काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांच्याविरोधात सुद्धा हक्कभंग आणणार
‘सभागृहात अशोक चव्हाण यांनी आज मराठा आरक्षण (maratha reservation) संदर्भात खोटे निवेदन केले.
102 ची घटनादुरूस्ती मराठा आरक्षण कायद्याला लागू होत नाही.
अॅटर्नी जनरलसंदर्भातील वक्तव्य चुकीचे केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करणार आहे’,
असं फडणवीस यांनी जाहीर केलं.
हे ही वाचा.. वातावरण तापले : अमित शाह खूनी है च्या घोषणा विधानभवनात
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published on March 10, 2021 14:00 PM
WebTitle – latest Sachin Vaze will be removed from the Crime Branch