महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात आज 13659 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 9913 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2099207 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 99008 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.21% झाले आहे.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनोचा उद्रेक वाढला आहे.ठाणे येथे सुद्धा मोठ्याप्रमाणावर रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे (Thane 16 Hotspot) शहरात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाचा प्रसार शहरातील काही भागात झपाट्याने वाढत आहे. ( Lockdown declared in 16 hotspots in Thane city) ठाण्यात कोरोनाबाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असले तरी रूग्णसंख्या वाढतीच राहीली आहे. त्यामुळे शहरातील हॉटस्पॉटची संख्या पुन्हा १६ झाली आहे. तेव्हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या १६ हॉटस्पॉटमध्ये ३१ मार्चपर्यत लॉकडाऊन कायम असल्याचे महापालिकेने काढलेल्या अध्यादेशात स्पष्ट केले आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.
१६ हॉटस्पॉट
या हॉटस्पॉटमधील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १६ हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये आजपासून (९ मार्च) लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१) आई नगर, कळवा
२) सूर्या नगर, विटावा
३) खरेगाव हेल्थ सेंटर
४) चेंदणी कोळीवाडा
५) श्रीनगर
६) हिरानंदानी इस्टेट
७) लोढा माजीवाडा
८) रुणवाल गार्डन सिटी, बालकुम
९) लोढा अमारा
१०) शिवाजी नगर
११) दोस्ती विहार
१२) हिरानंदानी मिडोज
१३) पाटील वाडी
१४) रुणवाल प्लाझा, कोरेस नक्षत्र, कोरेस टॉवर
१५) रुणवाल नगर, कोलबाद
१६) रुस्तमजी, वृंदावन
महाराष्ट्र कोरोना अपडेट : यामध्ये परिमंडळ एकमधील कळवा प्रभाग समिती क्षेत्रात विटावा,आईनगर,सुर्यनगर,खारेगाव परिसर हे हॉटस्पॉट आहे.तर,परीमंडळ दोनमध्ये चेंदणी कोळीवाडा,वागळे व श्रीनगर परिसर हॉटस्पॉट आहेत. परिमंडळ ३ मध्ये सर्वाधिक हॉटस्पॉट असून यात माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील,बाळकुम,लोढा व लोढा आमारा, हिरानंदानी इस्टेट, हिरानंदानी मेडोज गृहसंकुले आणि लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात दोस्ती विहार,शिवाई नगर,कोरस टॉवर, कोलबाड, रुस्तुमजी ‘ वृदांवन येथे लॉकडाऊन ३१ मार्च.पर्यत ठेवण्यात आला आहे. हॉटस्पॉट वगळता इतर ठिकाणी राज्य शासनाच्या नियमांतर्गत सर्व व्यवहार सुरळीत राहतील असेही अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published on March 10, 2021 21:58 AM
WebTitle – latest corona update Maharashtra lockdown declared in 16 hotspots in thane city