कराची : पाकिस्तान मध्ये पुन्हा एकदा हिंदूंच्या सामूहिक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलतान जिल्ह्यातील या घटनेत अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करत (पाकिस्तान मध्ये) हिंदू कुटुंबातील 5 जणांची हत्या केली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू आणि शीखांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलं आहे. पीडित हिंदू कुटुंब मुलतान जवळील रहीम यार खान शहरापासून 15 कि.मी. अंतरावर अबू धाबी कॉलनीत राहत होतं. घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू व कुऱ्हाडीसह आणखी काही शस्त्रे जप्त केली आहेत. या घटनेतील आरोपींची अद्याप ओळख पटलेली नाही.
अशा आशयाची बातमी मराठी हिन्दी इंग्रजी सर्वच भाषांतील माध्यमांनी दिली होती.बातमीमध्ये पाकिस्तानातील हिंदू शीख समाजात दहशतीचे वातावरण असल्याचा उल्लेख आवर्जून केला गेला.शीख जोडीला मुद्दाम घेतले केवळ हिंदू घेतल्याने संशय येऊ शकतो म्हणून.मात्र या दाव्यात तथ्य होते का हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करत (पाकिस्तान मध्ये) हिंदू कुटुंबातील 5 जणांची हत्या केली आहे.
मराठीत सुद्धा असेच वार्तांकन केले गेले,हिंदू कुटुंबावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला.
या घटनेनंतर पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू आणि शिख धर्मियांमध्ये दहशत पसरली आहे.
#BREAKING पाकिस्तानच्या मुलतान जिल्ह्यात हिंदू कुटुंबावर अज्ञातांनी हल्ला करून
एकाच कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून हत्या केली.
या घटनेनंतर पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू आणि शिख धर्मियांमध्ये दहशत पसरली आहे.
इंग्रजी मध्ये सुद्धा असेच वार्तांकन केले गेले.
यानंतर भाजपने हा मुद्दा थेट आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यात हस्तक्षेप करून
पाकिस्तान ज्याप्रकारे सत्ता चालवत आहे त्यावर जगातील सर्वच आंतरराष्ट्रीय संघटनांनी आक्षेप घेतला पाहिजे.
अशी मागणी केली.खासकरून युनायटेड नेशन ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशनने दखल घेतली पाहिजे.
BJP demands UNHRC must take note of crimes against Hindus in Pakistan.
दावा –
पाकिस्तान मध्ये हिंदू कुटुंबातील 5 व्यक्तींवर अज्ञातांकडून हल्ला करून खून करण्यात आला.
सत्य –
ही घटना असत्य असून कुटुंब प्रमुख रामचंद याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी आणि मुलांची हत्या केली आणि नंतर स्वत:ही आत्महत्या केली.
VERIFICATION AND METHODOLOGY
आमच्या टीमने पाकिस्तान मधिल मुलतान जिल्ह्यातील रहीम यार खान येथील स्थानिक मिडियाच्या बातम्या तपासल्या,याशिवाय https://thelogicalindian.com फॅक्ट चेक रिपोर्ट तपासला तसेच https://www.altnews.in यांचा फॅक्टचेक रिपोर्ट तपासला
अल्टन्यूज कडे या घटनेची एफआयआर कॉपीच सापडून आली,ज्यामध्ये मृतक स्त्रीच्या भावाने जबाब नोंदविला आहे.
वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे समजून आली
कुटुंब प्रमुख राम चंद याचा मेहुणा तिरथ राम याने पुढीलप्रमाणे पोलिसांकडे जबाब नोंदविला आहे.
“माझ्या बहीणीचे पती राम चंद यांनी त्यांची पत्नी लक्ष्मीमाई,मुले प्रेम कुमार, अंजली माई आणि आणिका माईची चाकू आणि कुऱ्हाडीच्या सहाय्याने हत्या केली,तसेच त्याने स्वत:लाही जखमी केले.ही माहिती मिळताच मी जीना राम, बराड राम आणि चित्रराम यांच्यासमवेत घटनास्थळी गेलो आणि पाहिले की माझी बहिण लक्ष्मी माई, त्याचा मुलगा प्रेम कुमार आणि तिची मुली अंजली माई आणि अनीका माई मयत आहेत.त्यांच्या गळ्यावर चाकूचे ठसे होते. राम चंद यांना त्याच्या भावाने रुग्णालयात हलवले. राम चंद माझ्या बहिणीवर संशय घ्यायचा. त्याने रात्री पत्नी व मुलांची कुऱ्हाड व चाकूने हत्या केली आणि नंतर चाकूने स्वत:आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र राम चंद यांचेही रुग्णालयात निधन झाल्याची माहिती नंतर मला मिळाली.”
रहीम यार खान येथील स्थानिक चॅनेल ने जेव्हा राम चंद यांच्या बहिणीला याबाबत विचारले तेव्हा तीने सांगितले की तिचा भाऊ राम चंद 35-36 वर्षांचे होता आणि तो बराच काळापासून टेलरचं दुकान चालवत होता,मात्र गेले दोन वर्षे काम करणे बंद केले होते. यातूनच दोघांमध्ये खटके उडत होते,पत्नी मुलांचे संगोपन करण्यासाठी काम करत होती.
देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न
भारतीय मिडिया आणि भाजप या प्रकरणात धार्मिक ध्रुवीकरणाचा एंगल शोधत होते.मिडियाने तसा प्रयत्न सुद्धा केला.त्यावेळी अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या.काहीकाळ भारतात वातावरण तणावाचे झाले होते.प्रश्न असा आहे की इतर देशातील गोष्टी सुद्धा आता आपल्या देशातील लोकांच्या जीवन मरणाशी जोडून राजकारण खेळला गेला.आपल्याच देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला?
पाकिस्तान कडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया,हिंसक घटना आणि आपल्या देशात ते इतर मार्गाने पसरवू पहात असलेली दहशत अशांतता या गोष्टीना उत्तर देण्यास आपले सुरक्षाबल सक्षम आहे,मात्र चुकीच्या दाव्याने आपल्या देशात काही लोक आणि मिडिया अशांतता पसरवू पाहते हे जास्त चिंताजनक आहे.यापासून नागरिकांनी सजग राहिले पाहिजे.
- टीम जागल्या भारत
First Published on March 10 , 2021 00 :20 AM
WebTitle – fact check 5 Hindu Family Murder in Pakistan