कलिरा अतिता हा हवामान बदलाच्या परिणांमावर आधारित ओडिसी भाषेतील चित्रपट,चक्रीवादळ येण्याच्या पाच दिवस आधी सातावया या गावातील गुणू हा तरुण आपल्या उद्ध्वस्त झालेल्या गावाकडे परततो त्यावेळी त्याला आपल्या इतिहासातील त्या क्षणांची आठवण होते ज्यावेळी एक धर्मगुरु त्याला सारखे भेटत राहातात. निर्मनुष्य झालेल्या किनाऱ्यावर आश्चर्यकारकरित्या बचावलेला गुणू, त्याचे अस्तित्व आणि निसर्गाच्या तांडवासमोर त्याने जगण्यासाठी केलेला संघर्ष या सर्वांमुळे त्याच्यावर झालेल्या मानसिक आघाताचे आणि मानवी विजयाचे चित्रिकरण या चित्रपटात केले आहे.
या चित्रपटाची संकल्पना कशी निर्माण झाली?
कलिरा अतिता याविषयी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक नीला माधब पंडा म्हणाले की ,समुद्राच्या पाण्यात सापडलेल्या एका हातपंपाची अतिशय धक्कादायक आणि भीतीदायक बातमी यासाठी कारणीभूत आहे. 2006 मध्ये एकदा माझ्या वाचनात एक बातमी आली त्यामध्ये समुद्राच्या पाण्यात दहा फूट लांबीचा एक हातपंप मी पाहिला. त्याबाबत मी आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हे सर्व समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे परिणाम होते हे मानायला कोणीच तयार नव्हते.83 मिनिटांच्या या चित्रपटात एका घटनेने हादरून गेलेल्या माणसाच्या भावनांचे चित्रिकरण आहे ,ज्याचे गाव समुद्राने गिळंकृत केल्यावर तो भूतकाळातच राहात असतो.
कलिरा अतित ऑक्सर साठी नामांकन पुढीलप्रमाणे आहे category 4 best picture, Best Actor, Best Director
हेही वाचा.. भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने
हेही वाचा.. भीमा कोरेगांव चा इतिहास मोठ्या स्क्रीनवर
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 20 , 2021 11:1 5 am
Web Title – kalira atita movie selected for Oscar nomination