भारतात लोकशाही आहे.असं आपण म्हणतो.भारतात विविधता आहे असेही आपण म्हणतो.आणि या विविधतेत एकता आहे.Unity in diversity असा आपला दावा असतो.परंतु सत्ताधारी भाजप पक्षाच्याच नेत्यांकडून वारंवार या एकतेसमोर कडवे आव्हान उभे केले गेल्याचे आपण पाहत आलो आहोत.न्यूज लॉन्डरी या वेबसाईट ने नुकतेक अशा पद्धतीचे एक प्रकरण उजेडात आणले असून मागील वर्षापासून हे प्रकरण सुरू असल्याचे दिसत आहे.कपिल मिश्रा च्या टुलकिट ने खळबळ उडाली आहे.
कपिल मिश्रा टुलकिट
दिल्लीतील भाजप नेते कपिल मिश्रा (Kapil Mishra BJP Delhi ) यांनी हिंदू ईकोसिस्टम नावाचा सोशल मिडियात आणि प्रत्यक्ष ग्राऊंडलेव्हलवर ग्रुप तयार केला असून यात अनेक तरुणाना भर्ती केल्याचे ते स्वत: व्हिडिओ मध्ये सांगत आहेत.
https://twitter.com/HinduEcosystem_/status/1342480402804400130
कपिल मिश्रा कोण आहेत?
कपिल मिश्रा अगोदर आम आदमी पार्टी मधून दिल्लीतील सहाव्या विधानसभा निवडणुकीत यश प्राप्त केले होते,नंतर आम आदमी पार्टी चे प्रमुख अध्यक्ष अरविन्द केजरीवाल (Arvind kejriwal) यांच्यावर 20 करोड रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता,त्यावेळी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली नंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.
दिल्लीतील दंगली मध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप असून दंगल भडकवणे,दंगलीला प्रोत्साहित करणे हिंसक भाषण इत्यादी आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत.त्यावरून त्यांची पोलिसांनी चौकशी देखील केली होती.पोलिस चौकशीत मिश्राने आपल्यावर आरोप फेटाळले होते.
न्यूज लॉन्डरीने या खुलशात खळबळजनक माहिती उजेडात आणली असून व्हाटसेप ग्रुप मधील चाट आणि इतर साहित्य,अजेंडे आणि नॅरेटीव्ह बद्दलची चर्चा याबद्दलची माहिती यात समोर आली आहे.सदर हिंदू ईकोसिस्टम ग्रुपची स्थापना प्रामुख्याने मुस्लिम ,शीख आणि ख्रिश्चन यांच्या विरोधातील आघाडीसाठी करण्यात आल्याचा दावा अनेक लोक करत आहेत.
कॉँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी हा गंभीर आरोप करत प्रश्न विचारला आहे की कपिल मिश्रा यांच्या हेट फॅक्टरी टूल किटमुळे जातीय हिंसा भडकावण्यामुळे भारताला धोका होत नाही का?
दिल्लीच्या पोलिस कमशिनरनी यात लक्ष घालावे असे आवाहनही कॉँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे.
निवृत्त जनरल हरचरणसिंह पनाग यांनीही याबाबत ट्विट केले असून हे गंभीर असल्याचे म्हटले आहे.
तसेच हिटलरच्या वेळचा एक नेता हेनरिच हिमलर (Heinrich Himmler) ने 1930 साली प्रपौगंडा केला
तशाप्रकारचेच हे कृत्य असल्याचे म्हटले आहे.
निवृत्त जनरल हरचरणसिंह पनाग यांनी आपल्या सैन्यातील कार्यकाळात मोठ्या मोहीम कामगिरी केली असून
ते अभिनेत्री गुल पनाग हिचे पिता आहेत.ते सोशल मिडियात अॅक्टिव असतात.
आणि आपले विचार कोणत्याही दबावाविना मांडत असतात.
By – Team jaaglya bharat
हेही वाचा.. मी न्यायालयात जाणार नाही,तिथे न्याय मिळत नाही – माजी न्यायाधिशांचे धक्कादायक वक्तव्य
हेही वाचा.. पत्रकार लेखक मार्क टुली
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 16, 2021 14:00 pm