अमरावती : महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो,त्यातही कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस अशा पुरोगामी विचारांचे पक्ष असल्याचे सांगितले जाते.प्रत्यक्षात मात्र असे चित्र समाजात दिसून येत आहे.राज्यात कॉँग्रेस राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांची सत्ता आहे.मात्र या सत्तेच्या काळात बौद्ध दलित समाजावरील अन्याय अत्याचारात वाढच होताना दिसून येत आहे.अशीच एक घटना चांदुर रेल्वे तालुक्यातील दानापूर या गावामध्ये घडली असून येथील सुमारे शंभर बौद्ध बांधवांनी गावातील जातीयवादी लोकांच्या जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ नेहमीच्या त्रासाला कंटाळून गाव सोडलं अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.यावेळी या बांधवांनी गावालगतच्या पाझर तलावावर आश्रय घेतला असून, पून्हा गावात परतणार नाही असाही निर्णय घेतला आहे.
नेमका प्रकार काय?
शेतरस्त्याच्या मुद्यावरून सुरू झाला अत्याचार.दानापूर येथील दलित बांधवाची दानापूर शेत शिवारात शेती आहे. याच शिवारात मुख्य सरकारी पांदणाच्या एक शेत पलीकडे या बौद्धांची शेती आहे. परंतु गावातील गावगुंड तथाकथित उच्च जातीयांनी या बौद्ध बांधवांच्या शेतात जाणारा पिढीजात वहीवाटीचा रस्ताच बंद करून टाकला.त्यामुळे त्यांची शेतीची कामे,मशागत व इतर शेती कामे खोळंबली. ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप या बौद्ध बांधवांनी केला आहे.जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ 100 बौद्धांनी गाव सोडलं.गाव सोडून गेलेले सर्व लोक आता लगतच्या पाझर तलावालगत थांबले आहे या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कॉलेजला जाणाऱ्या मुलींवर अत्याचार
शिक्षणासाठी कॉलेजला जाणाऱ्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप
यावेळी अन्यायग्रस्त गावकऱ्यांनी केला.पोलिसांनी त्यावेळी तीन जणांना अटक केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
पोलिसांचे नेहमीप्रमाणे बेजबाबदार वागणे; बघ्याची भूमिका
सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना कवळूनही पोलिसांनी या घटनेत केवळ बघ्याची भूमिका घेतली.
कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने अन्याय अत्याचार वाढत गेले.
पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर प्रकरण एवढे चिघळले नसते.असे मत गावकरी मांडत आहेत.
तसेच पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा गंभीर आरोपही अन्यायग्रस्त गावकऱ्यांनी केला आहे.
दीड लाखाचे सोयाबीन चे पीक पेटवून दिले
जातीयवादी गुंडांनी बौद्ध शेतकरी बांधवांचे काढणी केलेले दीड लाखाचे सोयाबीनचे हाताशी आलेले पीकही पेटवून देऊन त्यांचे आर्थिक नुकसान करण्यात आल्याची माहिती अन्यायग्रस्त गावकऱ्यांनी दिली आहे.
कायदा आणि न्यायव्यवस्थेला आव्हान
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 23, 2021 16 :42 PM
WebTitle – 100 Buddhists leave village to protest communal oppression