मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.चोरट्यांनी मुंबई शहरातील चक्कं एका लोखंडी पुलाचीच चोरी केलीय.तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा पूल 6 हजार किलो वजनाचा आणि तब्बल 90 फूट लांब आहे. मुंबईतील लोखंडी पूल चोरीला गेल्याची ही बातमी आता लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. ही चोरीची घटना गेल्या महिन्यातील असल्याचे कळतेय याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
मुंबईतील चोरीला गेलेला लोखंडी पूल कुठे होता?
मुंबईतील मालाड पश्चिम मध्ये ही पूल चोरीची घटना घडल्याचे समोर आलंय.
हा तात्पुरत्या स्वरूपाचा लोखंडी पूल गेल्याच वर्षी जून महिन्यात नाल्यावर बसवण्यात आला होता.
ज्यामधून अदानी इलेक्ट्रिसिटीची केबल जाणार होती.
मात्र, यावर्षी एप्रिल महिन्यात नाल्यावर कायमस्वरूपी पूल बसवल्याने हा लोखंडी पूल काढण्यात आला.

दोन लाखांचा होता पूल
या पूलाची एकूण अंदाजे किंमत दोन लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे. हा पूल क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आला होता.
२६ जून रोजी अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता त्यांना हा पूल चोरीला गेल्याचे आढळून आले.
पूल चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली.
या चोरीच्या घटनेचा तपास करताना पोलिसांना समजलं की हा लोखंडी पूल जिथं ठेवण्यात आला होता. त्याठिकाणी सीसीटीव्ही बसवले नव्हते. मात्र, नंतर पोलिसांनी परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यातून पोलिसांना समजलं की काही लोकांनी गॅस कटरच्या साहाय्याने पूल सुमडीत कापला आणि नंतर तो काढून नेला. त्यांनी ही माहिती अदानी इलेक्ट्रिसिटीला दिली नाही.फुटेजमध्ये 11 जून रोजी एक मोठा ट्रक पुलाच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ट्रकच्या नोंदणी क्रमांकावरून त्याचा माग काढला.आणि आरोपीना ताब्यात घेण्यात आले.
अदानीचा चौकीदारच चोर निघाला
या प्रकरणात, अटक करण्यात आलेल्या लोकांपैकी एकजण त्या कंपनीचा कर्मचारी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या कर्मचाऱ्याला अदानी इलेक्ट्रिसिटीकडून हा पूल बांधण्याचं कॉंट्रॅक्ट देण्यात आलं होतं. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, पोलिसांनी चोरीचा सर्व माल जप्त केला आहे.ज्याला जबाबदारी दिली त्यानेच डल्ला मारला.यावरून असंही म्हणता येईल की अदानीचा चौकीदारच चोर निघाला.
क्षणार्धात पत्याप्रमाणे पूल कोसळला
रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याने शनिवारी सकाळी जम्मू शहरातून वार्षिक अमरनाथ यात्रा (अमरनाथ यात्रा 2023) स्थगित करण्यात आली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘खराब हवामानामुळे शनिवारी सकाळी येथील भगवती नगर येथील यात्री निवास बेस कॅम्पपासून प्रवास थांबवण्यात आला.’
जम्मू ते श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग (NH-44) चे वर्णन मोदी सरकारने सर्व ऑल वेदर कनेक्टिविटी प्रदान करणारा रस्ता म्हणून केले होते.
आज पापणी लवते न लवते तोच क्षणार्धात पत्याप्रमाणे पूल कोसळला,माती झाली सगळी.

click here
समान नागरी कायदा फसवणूक, हिंदू राष्ट्राशी जोडणारा अजेंडा – अमर्त्य सेन
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 08 JULY 2023, 20:10 PM
WebTitle – 09 feet long and 6 thousand kg bridge was stolen in Mumbai