फॅक्ट चेक शेतकरी आंदोलन – कृषी विधेयकावरून देशभरात आंदोलन सुरू झाले आहे.काल 26 नोव्हेंबर संविधान दिन चे औचित्यसाधून शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले,विशेषत:पंजाब,हरयाणा येथील शेतकऱ्यांचा या आंदोलनात मोठ्याप्रमाणावर सहभाग होता. “चलो दिल्ली” हा आंदोलनाचा नारा देत शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करत होते.
दरम्यान,केंद्रातील भाजप सरकारने हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला.पोलिस बळाचा वापर करत आंदोलक शेतकऱ्यांवर बोचऱ्या थंडीत तीव्र पाण्याचे फवारे मारून,तसेच अश्रु धूर आणि बॅरिकेट्स लावून आंदोलक शेतकऱ्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला गेला.
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या (IYC) युवा संघटनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर farmers बळाचा वापर करत अत्याचार केल्याबद्दल भाजप सरकारवर हल्ला करण्यासाठी चार प्रतिमा ट्वीट केल्या आहेत.या प्रतिमावापरल्याने कॉँग्रेसला ट्विटरवर ट्रोल केले जात आहे.
फॅक्ट चेक शेतकरी आंदोलन
दावा –
देशाला अन्न पुरवणाऱ्याना केंद्र सरकार दहशतवाद्याप्रमाणे वागणूक देत आहे,भारत देश हे कधी विसरणार नाही.
सत्य –
ट्विट मध्ये वापरलेल्या दोन प्रतिमा या 2018 सालच्या असून उत्तरप्रदेश दिल्ली सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या आहेत.
VERIFICATION AND METHODOLOGY
आम्ही reverse-image search करून याचा शोध घेतला,त्यावेळी सदर प्रतिमा या द हिंदू या वृतपत्रातील असल्याचे आढळून आले.
दूसरा फोटो हा डेक्कन हेरॉल्ड या वृत्तपत्रात छापून आलेला आहे.
आमच्या फॅक्ट चेक पडताळणीत हे दोन्ही फोटो चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले.
आंदोलक शेतकऱ्यांवर तीव्र पाण्याचे फवारे आणि अश्रु धुराचा करण्यात आला हे सत्य आहे.
मात्र चुकीचे फोटो वापरल्याने कॉँग्रेसला ट्रोल केले गेले.
Comments 1