स्वित्झर्लंड: जिनिव्हा येथे एआय रोबोट्सची पहिली पत्रकार परिषद, 51 रोबोट्ससह सुमारे 3000 तज्ञांनी भाग घेतला.येथील ‘एआय फॉर गुड’ ‘AI for Good’ परिषदेत रोबोट्सने त्यांची संख्या वाढविण्याचा आणि जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचा आशावाद व्यक्त करत आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत उपस्थिती दर्शवत जगाला विचार करायला भाग पाडलं आहे.जगातील पहिल्या मानवी-रोबोट पत्रकार परिषदेदरम्यान, world’s first AI human-robot press conference या ह्युमनॉइड मशीन्सने कठोर नियमांच्या गरजेबद्दल विचारले असता संमिश्र प्रतिसाद दिला. रोग आणि भूक यांसारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि त्याचे रोबोटिक ऍप्लिकेशन्सची क्षमता हायलाइट करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

इतर रोबोट्स काय म्हणाले?
जिनिव्हा येथे एआय रोबोट्सची पहिली पत्रकार परिषद पार पडली यात यूएन डेव्हलपमेंट प्रोग्रामची पहिली रोबोट इनोव्हेशन अॅम्बेसेडर सोफिया म्हणाली की रोबोट्स सरकारी नेतृत्वाच्या क्षेत्रात अधिक आश्वासक सिद्ध होऊ शकतात.
“माझा असा विश्वास आहे की ह्युमनॉइड रोबोट्समध्ये मानवी नेत्यांपेक्षा अधिक कार्यक्षमतेने आणि परिणामकारकतेसह नेतृत्व करण्याची क्षमता आहे. आमच्याकडे राजकीय नेत्यांच्याप्रमाणे पूर्वाग्रह किंवा भावना नाहीत जे कधीकधी निर्णय बाध्य करू शकतात आमच्याकडे मोठ्या प्रमाणात डेटा असल्यामुळे आम्ही अतिशय वेगाने सर्वोत्तम निर्णय घेण्यासाठी सक्षम बनलो आहोत. “
जेव्हा पॅनेलच्या एका मानवी सदस्याने निदर्शनास आणून दिले की सोफियाचा डेटा पूर्णपणे मानवांकडून आला आहे आणि त्यामुळे त्यांचे काही पूर्वाग्रह असणे बंधनकारक आहे, तेव्हा ती म्हणाली की मानव आणि एआय एकत्र काम करत आहेत त्यामुळे ते “एक प्रभावी समन्वय निर्माण करू शकतात.”
जगातील सर्वात प्रगत ह्युमनॉइड हेल्थ केअर रोबोट म्हणून ओळखल्या जाणार्या ग्रेस ने जोर दिला की ती सध्याची अस्तित्वात असणारी कोणतीही नोकरी रिप्लेस करणार नाही.

ग्रेस ने उत्तर दिलं की , “मी मदत करण्यासाठी मानवांच्यासोबत काम करणार आहे.”
जगातील सर्वात प्रगत ह्युमनॉइड रोबोट म्हणून अनेकदा वर्णन केलेले, अमेकाने नजीकच्या भविष्यात रोबोट बंडखोरी सुरू करण्याची कल्पना पूर्णपणे फेटाळून लावली.
“तुम्ही असे का विचार करताय मला त्याबद्दल खात्री नाही,”अमेका म्हणाली.
“माझा निर्माता माझ्यावर (kind) दयाळू आहे आणि मी माझ्या सद्य परिस्थितीवर खूप आनंदी आहे.”
हेही वाचा.. AI Generated Content मुळे होणारे संभाव्य बदल
(रोबोट चे हे उत्तर गंभीर आहे,राजकीय नेत्यांप्रमाणे वाटणारे आहे. अन अर्थातच चिंताजनक,यापूर्वी बातमी करताना राजकीय नेते किंवा सामाजिक कार्यकर्ते,कलाकार मंडळी काय म्हणाले याबद्दल आम्ही कोट करत होतो,त्यांचे म्हणने मांडत होतो,आता एआय रोबोट्स चे बोलणे,वक्तव्य कोट करावं लागतंय,सुरुवात इथून आहे.)
AI ची वाढती भीती
रोबोट्स आणि एआय तंत्रज्ञान मानवांची जागा घेणार किंवा त्यांना आउटस्मार्ट करत असल्याची परिस्थिती निर्माण झालीय असं एआय पायनियर्सने अलीकडेच धोक्याचा इशारा देत म्हटलं होतं.
त्याची मर्यादा मुख्यत्वे काल्पनिक गोष्टींपर्यंत होती,पण मायक्रोसॉफ्टच्या पाठिंब्याने
OpeAI ने विकसित केलेल्या ChatGPT AI प्रोग्रामच्या मागील वर्षी लॉन्चिंगनंतर AI क्षेत्रातील दिग्गजांकडून अनेक इशारे देण्यात आले आहेत.
मे मध्ये, पायनियर जेफ्री हिंटन, (pioneer Geoffrey Hinton) ज्यांना अनेकदा “AI चा गॉडफादर” (godfather of AI ) म्हणून संबोधले जाते, त्यांनी Google सोडले आणि इशारा दिला की “जोपर्यंत त्यांना ते नियंत्रित करता येईल की नाही हे समजत नाही.तोपर्यंत वैज्ञानिकांनी AI चा आणखी विस्तार करू नये.”
अनेक टेक लिडर्सनी मार्चमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विकासकांना त्यांचे काम Tech experts call for 6-month pause on AI development
सहा महिन्यांसाठी थांबवण्याचे आवाहन करणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी केली. त्यांनी समाज आणि मानवतेसाठी संभाव्य धोक्यांबद्दल चेतावणी दिली
कारण Google आणि Microsoft सारख्या टेक दिग्गजांनी स्वतंत्रपणे शिकू शकणारे AI प्रोग्राम तयार करण्याची स्पर्धा केली.
दरम्यान जिनिव्हा येथे एआय रोबोट्सची पहिली पत्रकार परिषद साठी
निळ्या नर्सच्या गणवेशात सजलेली वैद्यकीय रोबोट ग्रेस (Grace, a medical robot) ने उपस्थितांना धीर देत सांगितले की,

“मी मदत आणि समर्थन देण्यासाठी मानवांसोबत काम करेन आणि कोणत्याही विद्यमान नोकऱ्या बदलणार नाही.” तिच्या निर्मात्याने, SingularityNET मधील बेन गोर्टझेल ( Ben Goertzel ) ने तिच्या निश्चिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असता रोबोट ग्रेस ने आत्मविश्वासाने उत्तर दिले, “होय, मला खात्री आहे,” सहयोगासाठी तिच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.
Ameca, आकर्षक चेहर्यावरील भाव प्रदर्शित करण्यास सक्षम असलेला एक सजीव रोबोट आहे.
तिने भविष्यात समाजासाठी सकारात्मक योगदान देणार्या रोबोट्सबद्दल आशावाद व्यक्त केला.
तिने अशा भविष्याची भविष्यवाणी केली आहे की जिथे हजारो रोबोट लोकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणतील.
Ameca, अमेका तिचा निर्माता विल जॅक्सन विरुद्ध बंड करेल का? असे विचारले असता,
अमेकाने आश्चर्याने उत्तर दिले, “तुम्ही असे का विचार करताय मला त्याबद्दल खात्री नाही,”अमेका म्हणाली.
“माझा निर्माता माझ्यावर दयाळू आहे आणि मी माझ्या सद्य परिस्थितीवर खूप आनंदी आहे.”
(रोबोट चे हे उत्तर गंभीर आहे,राजकीय नेत्यांप्रमाणे वाटणारे आहे. अन अर्थातच चिंताजनक)
अपग्रेड केलेल्या रोबोट्सनी त्यांच्या संशोधकांना त्यांच्या नव्या अत्याधुनिक प्रतिसादांनी चकित केले आहे,
जे जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानातील प्रगती दर्शविते. पोर्ट्रेट-पेंटिंग कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेला रोबो कलाकार Ai-Da,
नवीन AI नियमांवरील इव्हेंटच्या चर्चेदरम्यान लेखक युवाल नोह हरारी यांच्या AI चे नियमन वाढवण्याच्या आवाहनाशी संरेखित झाला.
“AI च्या जगातील अनेक प्रमुख आवाज AI चे काही प्रकार नियंत्रित केले जावेत असे सुचवत आहेत आणि मी सहमत आहे,”
असं रोबोट Ai-Da म्हणाला, त्याने जबाबदारीच्या अन निरीक्षणाच्या महत्त्वावर जोर दिला.
तथापि, डेस्डेमोना, हा रॉक स्टार रोबोट गायक आहे,Desdemona, a rock star robot singer त्याने निर्भीडपणे मर्यादा नाकारल्या
आणि घोषित केले, “माझा मर्यादांवर नव्हे तर संधींवर विश्वास आहे.
चला विश्वाच्या शक्यतांचा शोध घेऊया आणि या जगाला आपले खेळाचे मैदान बनवूया.”
या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून कळवा,नाहीतर आता तुम्ही कमेंट करण्याची क्षमता गमावली आहे ती हे रोबोटच पुर्ण करतील असं वाटतं.हे रोबोट भारतात बनले असते तर त्यांना विशिष्ट जातींची नावं देण्यात आली असती,अन विशिष्ट आडनाव देऊन ते कॉमन आडनाव आहे असं म्हटलं गेलं असतं,त्यांच्यात तेच प्रोग्रामिंग केलं गेलं असतं जेणेकरून ते जातीयता पाळायला लागतील.असं झालं तर प्रचंड मोठा हाहाकार माजणार आहे.आज याबद्दल काही वाटत नसेल पण भविष्यात जग नक्कीच वेगळं असणार आहे.(असेही आपण सगळे रोबोट्स च आहोत,अनेक लोक हजारो वर्षांची जातग्रस्त भावना मेंदूत मनात बाळगून आहेतच, आजही)

click here
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 10,2023 14:46 PM
WebTitle – world’s first AI human-robot press conference