नाशिकच्या दान पारमिता फाउंडेशन तर्फे कार्यशाळेचे आयोजन
नाशिक प्रतिनिधी-
बोरिवली येथील नॅशनल पार्क मधील कान्हेरी बुद्ध लेणी येथे धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली,
येथे दोन हजार वर्षापूर्वीचे शिलालेखांचे लिप्यांतर आणि अर्थ समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांवरून आलेले विद्यार्थी हातात पेन घेऊन शिलालेख वहीवर उतरवत होते. बुद्ध लेणीं मधील बौद्ध संस्कृती आणि भिक्खुंचे आयुष्य जाणून घेत होते.
दान पारमिता फाउंडेशन अंतर्गत अशोकन स्क्रीफ्ट संस्थेच्या माध्यमातून ह्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद
कार्यशाळेत धम्मलिपी विद्यार्थी मोठ्या संख्येने शिलालेखाचा अभ्यास करण्यासाठी नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, मनमाड, नालासोपारा, पालघर, ठाणे, बदलापूर, कल्याण, पुणे व मुंबई , नवी मुंबईतील विद्यार्थी आले होते. कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी बुद्ध लेणीं तसेच प्राचीन भाषा व लिपि यांचे अभ्यासक सुनील खरे आले होते,चैत्यस्तुपाच्या विहारात कार्यशाळेची सुरवात सुजय जाधव यांच्या निवेदनाने त्रिसरण पंचशील ग्रहण करून करण्यात आली.
सांस्कृतिक अतिक्रमणे आपण रोखली पाहिजेत – सुनील खरे
बौद्ध संस्कृतीने भारत देशाला खूप परिपूर्ण केले आहे, दगडामध्ये कोरण्याचं शिल्प सर्वप्रथम या देशाला बौद्ध संस्कृतीने दिले आहे तसेच सर्वात प्रथम लिखाणाची सुरवात सम्राट अशोकांनी शिलालेखाद्वारे केली आहे, त्याच्या पूर्वी भारतात लिखाणाचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीये. याचाच अर्थ, बौद्ध संस्कृतीने आपल्या देशाला वैभवशाली वारसा दिला आहे, आणि हा वारसा आपण जपला पाहिजे, प्रत्येक रविवारी जवळच्या बुद्ध लेणींवर आपण सहपरिवार गेले पाहिजे असे आवाहन यावेळी सुनील खरे यांनी ह्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले. महाराष्ट्रातील अनेक बुद्ध लेणींचे नामकरण किंवा अतिक्रमण हे विकृत मानसिकतेतून झाले असून, त्यामुळे भारतातील या सर्वात प्राचीन ठेवा आपली ओळख हरवत चालला आहे. ही सांस्कृतिक अतिक्रमणे आपण रोखली पाहिजे असेही ते म्हणाले.
शिलालेखाचे वाचन सर्व विद्यार्थ्यां कडून करून घेण्यात आले,आलेल्या पदाधिकारी यांचा सन्मान सूर्यकांत ढवळे यांनी पंचशील असलेली शाल देऊन केला, संपूर्ण लेणी , शिल्पकला, स्थापत्य कला, धम्मलिपि याबाबत माहिती सुनील खरे , संतोष आंभोरे व सूर्यकांत ढवळे यांनी दिली,यावेळी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे धम्मलिपिचे लेखी पेपर घेण्यात आले, सर्वांचे अभिप्राय फॉर्म भरून घेतल्या गेले, अशोक कालीन धम्मलिपि वर्णमाला सर्व आलेल्या अभ्यासकाना निशुल्क देण्यात आल्या, धम्मलिपि विद्यार्थ्यांना धम्मलिपि सर्टिफिकेट वितरण ह्यावेळी करण्यात आले.
बौद्ध संस्कृतीचे सर्व सण उत्सव लेणींवर जाऊन साजरे केले पाहिजेत – सुनील खरे
या कार्यशाळेत सर्वांनी घरून टिफिन आणले होते, कार्यशाळा संपन्न झाल्यावर लेणी परिसराच्या बाहेर सर्वानी स्नेह भोजणाचा आस्वाद घेतला,
आपण आपल्या परिवारातील सर्वानी बुद्ध लेणींवर गेले पाहिजे, धम्मलिपी सर्वानी शिकली पाहिजे, अतिक्रमणे थांबवण्यासाठी प्रत्येक पौर्णिमा व बौद्ध संस्कृतीचे सर्व सण उत्सव लेणींवर जाऊन साजरे केले पाहिजे असे आवाहन दान पारमिता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व लेणी संवर्धक सुनील खरे यांनी प्रस्ताविक करताना केले,यावेळी दान पारमिता फाउंडेशनचे लेणी संवर्धक राहुल खरे, प्रवीण जाधव, संतोष आंभोरे, श्वेता पवार, मंदा खरात, सुरेश कांबळे, सुजय जाधव, संतोष जाधव, आकाश हजारे, बिपीन गायकवाड, ज्योती हिरे, मानसी उके, जयश्री कराडकर, चंदा बोके, रुपाली गायकवाड, वंदना सूर्यवंशी , तुकाराम मोरे, गणेश शेलार व संपूर्ण महाराष्ट्रातुन धम्मलिपि विद्यार्थी व लेणीं संवर्धक मोठया संख्येने उपस्थित होते.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
लुम्बिनी मध्ये लिप्यांतर केल्यामुळे बुद्धांचे जन्मस्थळ निश्चित झाले- प्रा.इंगळे
मनसर विश्व विद्यापीठ येथे MBCPR टीम तर्फे कार्यशाळा संपन्न
नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जेव्हा हिटलरने माफी मागितली
Thich nhat hanh:थिच न्यात हन्ह बौद्ध दृष्टिकोणास मूर्तरूप देणारे भिक्खू
श्रीलंका : आशियातील सर्वात प्रसिद्ध हत्ती नंदुगमुवा राजा चं निधन
भगवान बुद्धांचा मृत्यू कोणता पदार्थ सेवन केल्याने झाला? जाणून घ्या..
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 28, 2022 14:05 PM
WebTitle – Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group