महिलांना ६० दिवसांची विशेष प्रसूती रजा – केंद्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने (Central Government) प्रसूती रजेबाबत नवीन आदेश जारी केले आहेत. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या (DOPT) नवीन आदेशानुसार, प्रसूतीनंतर लगेचच नवजात बाळाचा मृत्यू झाल्यास सर्व महिला कर्मचाऱ्यांना (Women Employees) 60 दिवसांची विशेष प्रसूती रजा (Maternity Leave) दिली जाईल. डीओपीटीचे (DOPT) म्हणणे आहे की या परिस्थितीत रजेसाठी अनेक अर्ज आले होते. यानंतर नवा आदेश जारी करण्यात आला आहे.
महिलांना ६० दिवसांची विशेष प्रसूती रजा
विभागाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी या प्रकरणाचा विचार केल्यानंतर 60 दिवसांची विशेष प्रसूती रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मृत नवजात अर्भकाच्या जन्मामुळे किंवा प्रसूतीनंतर लगेचच त्याचा मृत्यू झाल्यामुळे आईला होणारा धक्का लक्षात घेऊन हा आदेश काढण्यात आला आहे. आदेशानुसार, एखाद्या महिला कर्मचाऱ्याला मृत बालकाचा जन्म किंवा मुलाचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच 60 दिवसांची विशेष रजा दिली जाईल.
वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नाही
डीओपीटीच्या आदेशानुसार, जर एखाद्या केंद्रीय महिला कर्मचाऱ्याने आधीच प्रसूती रजा घेतली असेल
आणि मृत मुलाचा जन्म होईपर्यंत किंवा मुलाचा मृत्यू होईपर्यंत तिची रजा चालू राहिली असेल.
अशा परिस्थितीत, ती महिला कर्मचाऱ्याकडे उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही रजेमध्ये बदलली जाऊ शकते.
यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज भासणार नाही.
विभागाच्या आदेशानुसार, जर महिला कर्मचाऱ्याने प्रसूती रजा घेतली नसेल, तर अशा स्थितीत तिला मृत मुलाच्या जन्म तारखेपासून किंवा मुलाच्या मृत्यूपर्यंत 60 दिवसांची विशेष प्रसूती रजा मिळेल. प्रसूतीनंतर 28 दिवसांच्या आत नवजात बालकाचा मृत्यू झाल्यास हा नियम प्रभावी मानला जाईल.
विशेष रजा कधी आणि कशी मिळेल?
सदर आदेशामध्ये अनेक अटी आणि नियम जोडण्यात आले आहेत. विशेष प्रसूती रजेची सुविधा फक्त त्या महिला कर्मचाऱ्यांना उपलब्ध असेल ज्यांना दोनपेक्षा कमी मुले जिवंत आहेत. तसेच या रजेचा लाभ घेण्यासाठी बाळाचा जन्म रुग्णालयात होणे आवश्यक आहे. खासगी रुग्णालयात इमर्जन्सीमध्ये बाळाचा जन्म झाला, तर अशावेळी तातडीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक असते. सरकारी रुग्णालयात प्रसूती झाल्यास तातडीचे प्रमाणपत्र देण्याची गरज भासणार नाही.
सरकारी रेशन घेण्यासाठी आणली मर्सिडीज;व्हायरल व्हिडिओ मागील सत्य
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 09,2022, 17:20 PM
WebTitle – Women will get special leave of 60 days; government stamp on demand