कर्नाटक – कर्नाटक मधिल भाजपचे जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोळी यांचे अश्लील सीडी प्रकरण चांगलेच गाजले होते.त्यामुळे रमेश जारकीहोळी यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.मात्र यानंतर आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. आक्षेपार्ह सीडी प्रकरणातील संबंधित महिलेचं अपहरण झालं असल्याचा दावा पीडितेच्या आई वडिलांनी आता केला आहे.
पीडित महिलेच्या आई-वडिलांनी बुधवारी बेळगाव पोलीस ठाण्यात आपल्या मुलीचं अपहरण झालं असल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच आपला जीव धोक्यात असल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 17 मार्च रोजी बेपत्ता महिलेच्या पालकांनी बेळगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. तसेच आपल्या जीवालाही धोका असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 2 मार्च रोजी आपल्या मुलीचं अपहरण झालं असल्याचा दावा पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे.
व्हिडीओमध्ये दिसणारी महिला माझी मुलगी नाही
2 मार्च याच दिवशी संबंधित अश्लील सीडी उघडकीस आली होती. याच दिवशी आपण आपल्या मुलीशी शेवटचं बोललो असा दावाही पीडितेच्या वडिलांनी केला आहे. याबाबत अधिक माहिती देताना पीडितेच्या वडिलांनी ‘संबंधित व्हिडीओमध्ये दिसणारी महिला माझी मुलगी नाही. कोणीतरी आपल्या मुलीसारख्या दिसणाऱ्या महिलेचा वापर केला आहे.असा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. याबाबतचा खुलासा स्वतः पीडित मुलीने आपल्या आईकडे केला असल्याचंही वडिलांनी सांगितलं आहे. यासंबंधित एक व्हिडीओ तिच्या पालकांनी जारी केला असून त्यामध्ये त्यांनी आपला जीव धोक्यात असल्याचं म्हटलं आहे.
नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे अश्लील सीडी प्रकरण मीडियासमोर आणले आहे.
जारकीहोळी या महिलेचं नोकरी देण्याच्या नावाखाली शोषण करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
कोण आहेत रमेश जारकीहोळी?
जारकीहोळी यांचा कर्नाटक सरकारमध्ये चांगलाच दबदबा आहे.कर्नाटकमधील काँग्रेसचं सरकार पाडण्यात जारकीहोली यांची भूमिका महत्त्वाची होती.
यावेळी काँग्रेसचे १७ आमदार फुटल्यामुळे काँग्रेसचं सरकार पडलं होतं आणि येडियुरप्पा पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.
मातंग समाज अन तरुणांच्या अधोगतीला जबाबदार कोण?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 18, 2021 20:10 PM
WebTitle – Woman in sex CD missing, father files abduction report