उर्फी जावेद माध्यमांच्या हेडलाईन्समध्ये येणे ही काही नवीन गोष्ट राहिली नाही. उर्फी तिच्या असामान्य ड्रेसिंग सेन्समुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्री उर्फी जावेद वादात असल्याचे दिसत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी स्वत: मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन उर्फी जावेद ची तक्रार करत तिच्यावर कठोर कारवाई करण्याचे आवाहनही केले आहे.
यावरून आता उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ असा सामना गेले काही दिवस माध्यमे
आणि त्यामुळे सोशल मिडियात रंगताना दिसत असून उर्फी जावेद सुद्धा आता आक्रमक पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा उर्फी जावेद संदर्भात आक्षेप काय आहे?
उर्फी जावेद विचित्र ड्रेस घालून मुंबईच्या रस्त्यांवर मोकळेपणाने फिरत असल्याचे महाराष्ट्रातील भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलंय. त्यामुळे तिला असं करण्यापासून रोखावं, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ केलीय. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटही केले आहे, जे जोरदार व्हायरल होत आहे.उर्फी जावेद वरील या तक्रारीमुळे सोशल मीडिया यूजर्स मध्येही अनेक मतभेद असून अनेक युजर्स उर्फी च्या बाजूने उभे असल्याचे दिसते. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, “माननीय पोलीस आयुक्त आणि मुंबईचे सहआयुक्त यांची भेट घेतली आणि उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी केली.”
उर्फी जावेद ने भाजप नेत्या चित्रा वाघ यांना उत्तर देत कोंडी केली
उर्फी ने उत्तर देताना म्हटलंय की,ह्या राजकारण्यांना काही कामच उरलं नाही.हे किंवा यांचे वकिल मूर्ख आहेत का?
मला जेल मध्ये टाकण्यासाठी घटनेत कलमच नाही.अश्लीलता, नग्नतेची व्याख्या व्यक्तीनुरुप बदलते,
मिडियाचं लक्ष वेधण्यासाठी यांचा हा सगळा खटाटोप सुरू आहे.चित्रा वाघ यांनी मी काही कल्पना सुचवते,
मुंबतील देहव्यापार, लैगिंक बाजारावर काम करा.बेकायदा डान्स बार बंद वर काम करा,
मुंबईतील बेकायदा वेश्याव्यवसाय विरुद्ध काम करा.चित्रा वाघ यांनी आपली संपत्ती उघड केली तर
मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे असं उर्फीनं म्हटलंय,यासोबतच इंस्टाग्रामवर स्टोरी टाकत
तिनं चित्रा वाघ वर निशाना साधला. त्यानंतर वारंवर उर्फी ने इतर काही पोस्ट करत
चित्रा वाघ यांच्यावर सातत्याने प्रश्नाचा भडिमारच सुरू केला.
एवढं बोलून उर्फी थांबली नाही.यानंतर तिने थेट भाजप जॉइन करणार असल्याचे सुतोवाच करून टाकले.सोबतच तिने पूजा चव्हाण केस मध्ये आरोप असलेले आमदार संजय राठोड यांचा उल्लेख करत थेट कोंडीच करून टाकली.”भाजप जॉइन केल्यानंतर चित्रा वाघ यांच्यासोबत मैत्री करण्यासाठी मी उत्सूक आहे. भाजप पक्षात प्रवेश घेण्यापुर्वी चित्राजी तुम्हाला संजय (संजय राठोड) आठवतो का? भाजपात प्रवेश केल्यानंतर तर तुमची खुप जवळची मैत्री झाली होती. तुम्ही तर त्याच्या सर्व चुका विसरुन गेल्यात ज्यासाठी एनसीपीमध्ये गोंधळ घातला होता.”असा खोचक टोलाही तिने लगावला आहे.
एवढच नाहीतर आम्ही आता लवकरच बेस्ट फ्रेंड बनणार असं दुसरं ट्विट सुद्धा तिने केले आहे.
इतर ट्विटर युजर्स सुद्धा चित्रा वाघ यांचे संजय राठोड यांच्या संदर्भातील जुने व्हिडिओ शेअर करून चित्रा वाघ यांना प्रश्न विचारायला लागले आहेत.
आता उर्फी जावेद खरच भाजप मध्ये गेल्यास चित्रा वाघ तिच्या विरुद्ध बोलणे थांबवून मैत्री करतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नोट बंदी निर्णय चुकीचा होता,न्या. बी. वी. नागरथना
केतकी चितळे चा राग अनावर, ट्रोलर ला शिवी देत म्हणाली xx
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on JAN 03,2023 21:28 PM
WebTitle – Will Urfi Javed join BJP? Will Chitra wagh become a best friend?