भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी बुधवारी एक व्हिडिओ ट्विट केला ज्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले एका महिलेसोबत दिसत आहेत. पटोले यांनी हा भाजपचा चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटलंय आणि त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय.
छायाचित्रांचा वापर करून तयार केलेला हा व्हिडिओ मेघालयातील चेरापुंजी येथील हॉटेल पोलो ऑर्किडचा आहे.
यामध्ये एक पुरुष महिलेच्या खांद्यावर हात ठेवून बसलेला दिसत आहे.
ही व्यक्ती महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.
चित्रा वाघ यांनी लोकप्रतिनिधीच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस पक्षाकडे केली आहे. त्याला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, हा माझ्यावर चारित्र्यहीनतेचा आरोप आहे. सत्य लवकरच बाहेर येईल. आमची कायदेशीर टीम या प्रकरणी कारवाई करेल.
काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं
भाजप नेत्याने व्हिडिओ शेअर करत ‘काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं’ असं म्हटलंय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘मी कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकावत नाही. हा व्हिडिओ आधीच व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला एका व्यक्तीने टी-शर्ट आणि पँट घातलेले छायाचित्रात दिसत आहे. त्यानंतर ती व्यक्ती एका महिलेच्या खांद्यावर हात ठेवून बसलेली दिसते,यानंतर एका हॉटेलचा फोटो येतो.
कारवाईवर काय म्हणाल्या चित्रा वाघ ?
नाना पटोले यांनी कायदेशीर कारवाईचे संकेत दिल्यानंतर,चित्रा वाघ यांनी त्यांची बाजू मांडली, त्या म्हणाल्या, ‘हा व्हिडिओ मिळाल्यावर मला धक्काच बसला. मी ते पुन्हा तपासले आणि तो व्हिडिओ अनेक ठिकाणी व्हायरल झाल्याचे आढळले. सोलापूर असो, रायगड असो, नाना पटोले असोत वा कोणताही पक्ष, लोकप्रतिनिधी असताना तुमच्या जबाबदाऱ्या अनेक पटींनी वाढतात. प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. लोकप्रतिनिधींकडून जनतेने काय शिकले? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.मी फक्त व्हिडिओ शेअर करून नानांना प्रश्न विचारला आहे.यामुळे माझी काय चूक झाली? मी कोणत्याही कारवाईला घाबरत नाही,मी त्यासाठी तयार आहे.
महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी कमालीची खालावली : नाना पटोले
नाना पटोले यांना या व्हिडिओबाबत विचारले असता, हा भाजपचा अजेंडा असल्याचा आरोप त्यांनी केला. याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचेही नाना पटोले म्हणाले. मुंबईला रवाना होत असताना नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले.”महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खालावली आहे. माझी वैयक्तिक बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. आमची कायदेशीर टीम याचा तपास करत आहे. गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचीही आमची तयारी आहे.”
मोदींवर टीका केल्यानंतर नाना भाजपच्या निशाण्यावर आहेत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजपविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आहेत.
यापूर्वी त्यांनी प्रधानमंत्री मोदींवर जोरदार शब्दांत टीका केली होती.
त्यामुळे त्यांच्याविरोधात भाजपने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले होते.
मात्र, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापू शकते.
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
मोहम्मद जुबेर ला जामीन,ट्विट करण्यापासून रोखू नये – कोर्ट आदेश
मुलगा होण्याचा नवस पूर्ण वडिलांनी मंदिरात नेऊन तरुणाचा नरबळी दिला
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 21, 2022, 15:34 PM
WebTitle – will-take-legal-action-on-the-allegation-of-character-assassination-by-chitra-wagh-bjp-leade-nana-patole