मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी समोर आलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. रश्मी शुक्ला यांनी आपल्यावर कारवाई होऊ म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोर रडल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.तसेच आघाडी सरकारने देखील मन मोठं करुन तेव्हा त्यांना माफ केल्याचं सांगितलं. मात्र, त्या काही दिवसांनी बदनामीचं षडयंत्र रचतील हे माहिती नसल्याचंही आव्हाड म्हणाले. ते मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
“रश्मी शुक्ला यांना जेव्हा फोन टॅपिंगच्या पत्राविषयी समजलं तेव्हा आपण पकडलो गेलो आहोत हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रडल्या. त्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे गेल्या तेथेही त्या रडल्या. त्यांनी माफी मागत कारवाई करु नये, अशी विनंती केली. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार दिलदार आहे. त्यामुळे मन मोठं करुन आघाडी सरकारने तेव्हा रश्मी शुक्ला यांना माफ केलं. मात्र, त्यावेळी याच रश्मी शुक्ला समोर उभ्या राहून नवं बदनामीचं षडयंत्र रचतील हे माहिती नव्हतं.” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार’
“केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत.त्यात कोणत्या प्रकारात फोन टॅप करता येतात याविषयी सांगण्यात आले आहे.फोन टॅप करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांची परवानगी आवश्यक असते.रश्मी शुक्ला यांनी अशा प्रकारची अमुक नंबर साठी परवानगी घेतली होती का? त्याचे उत्तर कुंटे साहेबांनी नाही असं दिलेलं आहे.यात राष्ट्र घातक कृत्य, परकीय देशातील अतिरेकी संघटनेशी संबंध या प्रकारांशिवाय इतर परिस्थिती फोन टॅपिंग करता येत नाही. याला अपवाद येथील शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करु शकतो. त्यामुळे रश्मि शुक्ला यांनी जी कारणं दिली होती ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी ज्या फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या त्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या. परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार करण्यात आला. यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे. हे अनेकवेळा करण्यात आलं.” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
“भाजप साठी काम करत होत्या रश्मी शुक्ला?”
शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखिल प्रयत्न केला होता.
अजून पुरावे काय पाहिजेत.- जितेंद्र आव्हाड
कोण कोणत्या कारणांसाठी फोन टॅपिंगची परवानगी काढता येते?
अ > देशाची एकता व अखंडता
ब > सार्वजनिक सुरक्षिता राखण्यासाठी
क > परकीय देशासोबत मैत्रीचे संबंध
ड > जनतेमध्ये शांतता राखण्यासाठी
क > एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्यास प्रतिबंध करण्यासाठी (उदा. खंडणी,दरोडा इत्यादी)
वरील उद्दिष्टांव्यतिरिक्त अन्य प्रकरणात (उदा. गुन्ह्यांची उकल होणे.इत्यादी दूरध्वनी, भ्रमण ध्वनिंचे अभिवेक्षण (फोन टॅपिंग) करू नये असे मान.अपर मुख्य सचिव ,गृह विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी आदेश पारित केले आहेत.
हिंदू स्त्रियांच्या मालमत्ता संदर्भात ; हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी भाग 2
पुरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात; शालेय वस्तूंचे वाटप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 25, 2021 18:30 PM
WebTitle – Why Rashmi Shukla cried Jitendra Awhad explain reasons behind it 2021-03-24