मातंग समाज अजूनही खुप अज्ञानात आहे.अंधश्रध्दाळू आहे.जुनाट चालिरीती,रुढी व परंपरेचा फालतुचा अभिमान बाळगणारा आहे.काही सन्माननिय अपवाद सोडले तर सगळीकडे हीच स्थिती आहे.अजुनही मातंग ऋषी,आमचा पहिला मान ह्या व ईत्यादी चुकीच्या व बेसलेस गोष्टींचा उदोउदो करणारा आहे.तशातच मातंग समाजातील अर्धवट ज्ञानी लोक हा चुकिचा ईतीहास सांगुन मातंग समाजाला अजून अंधारात ढकलत आहेत.सगळ्यात वाईट काय तर मातंग समाज बौध्दांचा तिरस्कार करतो.
बौध्दांनी मातंगांच्या हक्काच्या नोकऱ्या पळवल्या हा निराधार आरोप केला जातो.एस.सी कोट्यातल्या १३% आरक्षणात ५९ जाती समुदाय आहेत.बौध्दांना त्यातील केवळ ०.२१% आरक्षण मिळत आहे.यावरून बौद्ध समाजाची बदनामी कोण का करत आहेत हे लक्षात घ्यावे.या आरक्षणात अ ब क ड अशी वर्गवारी करुन एस.सी. कोट्यातील १३% आरक्षणात वेगळे असे मातंग समाजाला आरक्षण मिळावे अशीही मातंग समाजातील काहीजन मागणी करत असतात. वेगळे आरक्षण मागणे आणि त्याबद्दल लढा उभारला जाणे याबाबत बोलावते धनी इतर कुणीतरी असावेत असा संशय घेण्यास वाव आहे.अनुसूचित जातीत समावेश झाला असल्याने मातंग समाजाला वेगळे आरक्षण मिळण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.
जात उतरंडीमध्ये बौध्द आणि मातंग समाज एकाच पायरीवर आहे
अनुसूचित जातीतील इतर जातींच्या मुलांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी मातंग समाजातील मुलांनी प्रयत्न केले पाहिजेत. स्पर्धा परीक्षा, बँका, रेल्वे, शासकीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षा याची तयारी केली पाहिजे तरच टिकाव लागू शकतो. तसेही आजकाल ओपनचे मेरीट आणि अनुसूचित जातीच्या आधारावर आरक्षण असलेले मेरीट यात खूप कमी फरक असतो हे ध्यानात घेऊन सचोटीने अभ्यास करून यश संपादन केले पाहिजे. बौध्दांनी आमच्या वाटणीच्या नोकऱ्या गिळंकृत केल्या हा आरोप करण्याऐवजी त्याठिकाणी आपण कसे पोहचू शकतो याचा सकारात्मक विचार केला पाहिजे.
जात उतरंडीमध्ये बौध्द आणि मातंग समाज एकाच पायरीवर आहे. दोन्ही समाजाच्या समस्या सारख्याच आहेत. दोन्ही समाजावर सारख्याच प्रमाणात अन्याय आणि अत्याचार होत असतात. दोन्ही समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, मानसिक पिळवणूक समान पातळीवर होते. बौध्द आणि मातंग समाज जर एक झाला तर खूपच आशादायी चित्र निर्माण होण्याची भीती आपल्या विरोधकांना वाटते त्यामुळे आपण कधीच एकत्र येऊ नये यासाठी ते आपल्यात वाद निर्माण करतात हे आमच्या लक्षात आले पाहिजे.
खेडेगावात आणि शहरातही बौध्द आणि मातंग समाजाची अपरिमित हानी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
दोन्ही समाजातील युवक व्यसनांच्या आहारी जात असल्याचे दिसते.
कमालीची बेरोजगारी, दारिद्रय, दुःख, अशिक्षितपणा, देवभोळेपणा, नेतृत्वाची वानवा या समस्या बौध्द आणि मातंग समाजात समान आहेत. यातुन मार्ग काढण्यासाठी आता दोन्ही बाजूंनी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी मातंग समाजाचा राजकीय फायद्यासाठी वापर केला आहे
काही मातंग कट्टर हिंदुत्ववादी आहेत, इतके कट्टर हिंदुत्ववादी की त्यांना ते गुलामीचे जीवन जगतात याची जाणीव नाही.
काही मातंग जैनधर्माच्या बाजूने आहेत. जैन धर्माचे पालन करतात आणि इतरांनी पण करावे यासाठी प्रयत्नशील असतात.
जैनधर्मीय लोक मातंगांना जवळ करतील का हा संशोधनाचा विषय आहे, याबाबत न बोललेलेच बरे.
मातंग समाजाला सर्वात जवळचा धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म.
धर्म कोणताही असो किंवा नसो पण आपल्या जीवनात त्यामुळे काही फरक पडणार आहे का?
किंवा पडला आहे का याचे विचारमंथन करणे गरजेचे आहे हे मातंग समाजाला कधी समजणार?
बाबासाहेब बोलले होते की जर त्यांना मुलगी असती तर तीचा विवाह मातंगाशी केलाअसता
एक गोष्ट अगदी खरी आहे की मातंग समाजातील अनेक नेते अनेक वर्षांपासून विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले आहेत. बौध्द समाजाच्यापेक्षाही जास्त आमदार मातंग समाजातील असल्याचे चित्र अनेकदा दिसले आहे, असे असतानादेखील मातंग समाजातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्या लोकप्रतिनिधींनी काय केले याचा जाब विचारण्यासाठी मातंग समाजाने कधी कष्ट घेतले आहेत का हा प्रश्न उपस्थित होतो. सर्वच राजकीय पक्षांनी मातंग समाजाचा राजकीय फायद्यासाठी वापर केला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. बौध्दांना सोबत घेणे हे प्रस्थापित राजकीय पक्षांना अडचणीचे असते कारण बौध्द समाज हा आपल्या हक्क आणि अधिकारासाठी जागरुक असतो. बौध्द समाजातील नेतृत्व हो ला हो करत नाही, पर्याय म्हणून मातंग, चर्मकार यांना निवडणूकीत निवडून आणले जाते हे वास्तव आहे.
वाईट वाटते की मातंगांना दिशा देणारे नेतृत्व अलिकडच्या काळात निर्माण झाले नाही.हा अभाव आताचा नाही तर पहिल्यापासुनच आहे.वस्ताद लहुजी साळवे,अण्णाभाऊ साठे हे दोन अपवाद सोडता मातंग समाजात उल्लेखनिय असे कुणीच नाही.विस्कळीत समाज,ख्रिश्चन व हिंदू धर्माचा प्रभाव,कमीत्वाची भावना,बौध्द समाजाप्रती असूया,आपल्याच जातभाईंच्या रोषाची भिती ही मातंग समाजाच्या सामाजिक प्रगतीच्या आड येणारी कारणे आहेत.बाबासाहेब बोलले होते की जर त्यांना मुलगी असती तर तीचा विवाह मातंगाशी केलाअसता.असे बोलण्यामागचा उद्देश काय असावा त्यांचा?
बौध्दांनी मातंग समाजाला बरोबर घ्यावे
मातंग समाजाने बौध्द समाजाबरोबर सामाजिक चळवळीत सक्रियतेने उतरावे,मातंग समाजाची उन्नती व्हावी हा हेतु होता.
जसा आजचा मातंग समाज आहे तसेच अण्णाभाऊ साठे देखील होते.त्यांना त्यांची चूक शेवटीशेवटी उमगली.
त्यावेळी अण्णाभाऊंनी बाबासाहेबांचे कार्य जाणले.तसाच आजचा मातंग युवकही बाबासाहेंबाच्या पासुन दूरच आहे.
काहीजन तर अण्णाभाऊंना बाबासाहेबांच्या पंगतीत बसवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
बाबासाहेब व अण्णाभाऊ हे दोन वेगवेगळी व्यक्तिमत्वे आहेत.दोघांचेही कार्यक्षेत्र व वाटा भिन्न होत्या.बाबासाहेब की अण्णाभाऊ हा उभा वाद करणे चूकच आहे.त्यामुळे मातंग व बौध्द समाज वेगवेगळा होतो.जर बौध्द असुन मातंगांना कमी लेखण्याची वृत्ती असेल तर तिथे बौध्दामंध्ये अजुनही हिंदूमंधला मनु जिवंत आहे हे समाजावे.तसेच बौध्द बांधवाचा तिरस्कार करुन हनुमान किंवा तत्सम देवदेवतांचा उदोउदो होत असेल तर तिथेही मांतगांमध्ये हिंदू धर्मातला मनु जिवंत आहे असेच म्हणावे लागते.बौध्दांनी मातंग समाजाला बरोबर घ्यावे तसेच मातंग समाजाने हिंदू व ख्रिश्चन समाजाची जू खांद्यावरुन टाकुन द्यावा हेच खुप महत्वाचे आहे.”दे दाण सुटे गिऱ्हाण” म्हणायचे पण आपल्याला लागलेले गिऱ्हाण कधी सुटणार हा विचार मातंग समाजातील विचारवंतांनी व नेत्यांनी करण्याची वेळ आली आहे.
पुरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात; शालेय वस्तूंचे वाटप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on SEP 02, 2021 20:56 PM
Web Title – Who is responsible for the decline of Matang community and youth?
सुरवातच इतकी टोकदार केली तर मातंग बांधव पोस्ट वाचतील का?
पोस्ट मातंग बांधवांना जागरूक करण्यासाठी नसून फक्त चूका दाखवण्यासाठीच आहे अस वाटत आहे…. आणि लिखाण पूर्णपणे आम्हि बौद्ध बरोबर अशा धाटणीचे वाटत आहे….