चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फासणारे मनोज गरबडे आहेत तरी कोण? या लेखात आपण ते जाणून घेणार आहोत.
मनोज गरबडे हा समता सैनिक दलाचा हार्डकोर वैचारिक कार्यकर्ता… याच्या नसानसात आंबेडकरवाद भिनलेला…
बौद्धेतर लोकांमध्ये आंबेडकरवाद रुजविण्याचा नेहमीच कसोशीने प्रयत्न करणारा…
जयंतीला केवळ बाबासाहेबांच्या फोटो ऐवजी अख्ख्या शहरात त्यांच्या विचारांचे फ्लेक्स लावणारा… माता रमाई जयंती असो की शिव, शाहू, फुले ते सर्व महापुरुषांचे अनोखे कार्यक्रम राबवणारा…
ब्लड फॅार बाबासाहेब… थेंब अभिवादनाचा अंतर्गत ५७६ रक्तदानाच्या बॅग जमा करणारा…
हल्लीच… संविधान दिनानिमित्त आरएसएस, व्हीएचपी, बजरंग दल, एबीवीपी, युवा सेना या सारख्या कट्टरवादी संघटनांना खुल्या चर्चेत निमंत्रित करणारा…
या संविधान दिनानिमित्त त्याने खुल्या चर्चासत्रात यांना देखील आमंत्रित केले होते –
विश्वस्त संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, आळंदी,
आलमगीर शाही मस्जिद, चिंचवडगाव,
फादर – आमृत, दु:खीतांची सांत्वन करनारी माता चर्च, पिंपरी,
फादर – लॅझर्स, सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च – चिंचवड,
दलजितसिंग खालसा – बाबा सितलदार दरबार,पिंपरी,
बेहन आकांक्षा व मुकुल जी
ब्रम्हकुमारी सेंटर – पिंपरी चिंचवड…
विहारांसोबतच…
चर्च, मंदिर, गुरुद्वारा, मस्जिद, स्कूल, कॉलेजेस मध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन घडवून आणणारा…
कायम सामाजिक सलोखा जपण्याचा कसोशीने प्रयत्न करणाराला आज या सिस्टीम ने गुन्हेगार ठरवले आहे…
असे अनेक पैलू आहेत… जे इथे मांडता मांडता शब्द अपुरे पडतील…
अश्या अनेक आंदोलनात त्याने स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतले आहेत… तो कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाही… त्याची टीम देखील सदैव सोबत असते त्याच्या पाठीशी…
तो आंबेडकरी एकजुटीसाठी नेहमीच तळमळ करत असतो… पण आज तर खुद्द त्याच्यासाठी समाज एकवटला आहे…
इथली कायदेशीर लढाई तर आपण लढूच… पण समाजात असे अनेक मनोज आहेत… त्यांना देखील तुमची साथ हवी असेल, तेव्हा अश्या मनोज च्या पाठीशी उभे रहा…
जो पर्यंत या सिस्टीमचे बळी असे मनोज होत राहतील तो पर्यंत… ही धगधगती पेटती आग थंड होऊ देऊ नका…
शाई फेक अन मारहाण नेत्यांना कधी कधी झाली ? जाणून घ्या.
Video:न्यायमूर्ती जितेंद्र मिश्रा यांच्या व्हायरल व्हिडिओ मागील एक खुलासा
man of hole आणखी एक आदिवासी समाज जगातून पूर्णपणे मिटवला गेला
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 13,2022, 13:20 PM
WebTitle – Who is Manoj Garbade throwing ink on Chandrakant Patil?