8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग कधी लागू होणार याची प्रतीक्षा आहे.अनेकजण त्याची वाट बघत आहेत,काहींनी काही प्लॅन सुद्धा करून ठेवले आहेत.केंद्र सरकार दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करत असतं,पहिल्या वेतन आयोग पासून आताच्या आठव्या वेतन आयोग पर्यंत ही प्रथा पाळली गेली आहे.मध्यंतरी कोरोना महामारीच्या दरम्यानचा कालावधी वगळता प्रत्येक वर्षी डीएमध्ये दोनदा वाढ करण्यात आली असल्याचे कळते.
महागाई भत्ता वाढल्यानं कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांच्या हाती येणारा पगार वाढणार आहे. कर्मचारी दीर्घकाळापासून त्यांच्या डीए वाढीची वाट पाहत आहेत. मोदी सरकार लवकरच कर्मचाऱ्यांचा डीए वाढवू शकते. यासोबतच आठव्या वेतन आयोग साठीही सरकारकडून अपडेट आली आहे.या अपडेटमुळे कर्मचारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते.काळजी वाढू शकते.जाणून घ्या काय आहे ही महत्वाची अपडेट.
सरकार डीए ४ टक्क्यांनी वाढवू शकते
सरकार DA 4 टक्क्यांनी वाढवू शकते. असे झाल्यास डीए ४६ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. सध्या डीए ४२ टक्के आहे.
याचा अर्थ पुढच्या वर्षी जानेवारीनंतर महागाई भत्ता किंवा DR 50 टक्क्यांवर पोहोचू शकतो.
पुढील वर्षापर्यंत, महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार 8 वा वेतन आयोग लागू करणार का? या मुद्द्यावर केंद्र सरकारकडून नुकतीच एक अपडेट देण्यात आलीय.
आठवा वेतन आयोग सरकार आणणार का?
आठवा वेतन आयोग च्या स्थापनेच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेत यासंदर्भात एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सध्या त्यांच्याकडे कोणताही प्रस्ताव नसल्याचं अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांच्याकडून सदर माहिती स्पष्ट करण्यात आलीय. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे.त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची काळजी वाढू शकते.
आता महागाई भत्ता ४२ टक्के आहे
देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सध्या महागाई भत्ता हा ४२ टक्के इतका आहे.हा भत्ता जानेवारी ते जून २०२३ या कालावधीसाठी लागू असणार आहे.त्यांनंतर सरकारकडून जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी डीए वाढविला जाणार असल्याची माहिती समोर आलीय. यावेळीही सरकार डीए 4 टक्क्यांनी वाढवू शकते. असे झाल्यास डीए ४६ टक्क्यांवर पोहोचेल. तसेच, पुढीच्यावर्षी कर्मचाऱ्यांचा डीए 50 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्राने आठवा वेतन आयोग चा मुद्दा बऱ्यापैकी स्पष्ट केलेला आहे.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 29,2023 | 12:35 PM
WebTitle – When will the 8th Pay Commission come into effect