प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले,या दरम्यान त्यांचा यांचा टेलीप्रॉम्प्टर (Teleprompter) खराब झाला,हा तांत्रिक दोषाचा मुद्दा उपस्थित झाल्यावर पुढील भाषण देताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काहीसे अडखळले त्यामुळे कालपासून टेलीप्रॉम्प्टर हा शब्द चर्चेत आहे. प्रधानमंत्र्यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करून विरोधक त्यांच्यावर निशाणा साधत आहेत.या समस्येबाबत प्रधानमंत्री कार्यालयाकडून अधिकृतपणे कोणतेही स्पष्टीकरण आले नसले तरी विरोधक याला टेलिप्रॉम्प्टरची समस्या म्हणत आहेत. मात्र,हा तांत्रिक बिघाड वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. कॉँग्रेस नेते राहुल गांधींनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, एवढं खोटं टेलिप्रॉम्प्टरही सहन करू शकला नाही.
टेलीप्रॉम्प्टर म्हणजे काय?
लाल किल्ल्यावरून तुम्ही कधी प्रधानमंत्र्यांचे भाषण ऐकले/पाहिले असेल? तुमच्या लक्षात आले असेल की , प्रधानमंत्र्यांच्या आजूबाजूला काचेचे दोन फलक दिसतात. अनेक लोक याला बुलेट प्रूफ ग्लास समजतात, मात्र वास्तविक ते टेलिप्रॉम्प्टर मशीन असते.
भाषण करताना हा न दिसणारा टेलीप्रॉम्प्टर नेमकं कसं काम करतो?
या प्रकारच्या टेलिप्रॉम्प्टरला Conference Teleprompter म्हणतात. यामध्ये, एलसीडी मॉनिटर तळाशी आहे, ज्याचा फोकस वरच्या दिशेने राहतो. प्रेजेंटर च्या आजूबाजूला काचेचे ग्लास आहेत, जे अशा प्रकारे संरेखित केले आहेत की LCD मॉनिटरवर चालणारा मजकूर त्यांच्यावर प्रतिबिंबित होतो. म्हणजे आपल्याला जे बोलायचे आहे त्याचा मजकूर समोरच्या काचेवर उमटत असतो.अशाप्रकारे प्रधानमंत्री टेलिप्रॉम्प्टरच्या साहाय्याने कोणत्याही अडचणीशिवाय आपले भाषण पूर्ण करतात.अभिनेते किंवा गीतकार देखिल त्यांच्या ओळी बोलण्यासाठी याचा वापरतात. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वक्त्याला त्याचे भाषण लक्षात ठेवावे लागत नाही. जे बोलायचंय ते टेलीप्रॉम्प्टरच्या साहाय्याने तो अगदी सहजपणे बोलू शकतो. भाषण देतेवेळी समोरील श्रोत्यांना तो वाचून काहीतरी बोलतोय असं देखील वाटत नाही.
बोलण्याचा वेग एका ऑपरेटरद्वारे नियंत्रित केला जातो, जो स्पीकरचे भाषण काळजीपूर्वक ऐकतो आणि त्यांच्या भाषणाला फॉलो करतो. जेव्हा भाषणकर्ता आपले भाषण मध्ये थांबवतो. पॉज घेतो, तेव्हा ऑपरेटर काचेवर उमटणारा मजकूर थांबवतो.जेव्हा भाषणकर्ता पुन्हा भाषण द्यायला लागतो ऑपरेटर मजकूर सुरू करतो. मात्र, प्रेक्षकांना या गोष्टी दिसत नाहीत. त्याना फक्त काचेची मागची बाजू दिसते आणि त्यामागे उभा असलेला स्पीकर दिसतो.
टेलिप्रॉम्प्टरची किंमत किती आहे?
या प्रकारच्या टेलिप्रॉम्प्टरची किंमत खूप जास्त आहे.
भारतात, ते 2,78,755 ते 1,712,485 रुपयांच्या किंमतीत खरेदी केले जाऊ शकतात.
त्यांची किंमत आकार आणि जोडीवर अवलंबून असते.
टेलीप्रॉम्प्टरचा शोध कुणी लावला? (Who invented Teleprompter)
टेलीप्रॉम्प्टरचा शोध हुबर्ट श्लाफी आणि फ्री बार्टन ज्युनियर आणि इरविंग बर्लिन कान यांनी १९५० च्या सुमारास लावला होता.(The TelePrompTer Corporation was founded in the 1950s by Fred Barton, Jr., Hubert Schlafly and Irving Berlin Kahn.) बार्टन हा एक अभिनेता होता ज्याने टेलिव्हिजन कलाकारांना मदत करण्यासाठी टेलिप्रॉम्प्टरची संकल्पना सुचवली ज्यांना कमी वेळात मोठ्या प्रमाणात मजकूर लक्षात ठेवावा लागते असे.
टेलीप्रॉम्प्टरचा प्रथम वापर कधी झाला?
1952 मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूवर यांनी शिकागोमधील 1952 च्या रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनला संबोधित करण्यासाठी श्लाफी ने -डिझाइन केलेले स्पीच टेलिप्रॉम्प्टर वापरले. यूएस गव्हर्नर पॉल ए. डेव्हर यांनी शिकागो येथे आयोजित केलेल्या 1952 डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये भाषण केले.
अनेक देशातील राष्ट्राध्यक्ष टेलीप्रॉम्प्टरचा वापर करत असतात
मात्र प्रश्न असा आहे की जर टेलीप्रॉम्प्टरच अचानक खराब झाले तर ऐनवेळी तुमच्याकडे दूसरा प्लॅन/दूसरा पर्याय हाताशी असला पाहिजे.
जय भीम पिक्चर आणखी एक विक्रम,ऑस्कर अकादमी कडून सन्मान
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा, )
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 18, 2022 17: 15 PM
WebTitle – What is a teleprompter How does it work Narendra Modi teleprompter trending